Shweta Tiwari MNS Shalini Thackeray: राज ठाकरेंचं नाव घेत श्वेता तिवारी आक्रमक बोलली; आता मनसेची पहिली प्रतिक्रिया, शालिनी ठाकरे म्हणाल्या...
MNS Leader Shalini Thackeray on Shweta Tiwari: शालिनी ठाकरे यांनी श्वेता तिवारीच्या आरोपांवर सोशल मीडियातून थेट प्रतिक्रिया दिलीये.

Shalini Thackeray Shweta Tiwari: प्रसिद्ध अभिनेत्री श्वेता तिवारीला (Shweta Tiwari) सध्या ऑनलाइन ट्रोलिंगला सामना करावा लागत आहे. तिनं ऑनलाइन ट्रोलिंगबाबत संताप व्यक्त केला आहे. तसेच आपल्या अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवर (Social Media) स्टोरी पोस्ट करुन आपला संताप व्यक्त केला. 'स्वत:ला मराठी माणूस आणि राज ठाकरेंचे (Raj Thackeray) समर्थक म्हणणाऱ्या व्यक्तीकडून शिवीगाळ केली जात आहे', असं अभिनेत्रीने म्हटलं. दरम्यान, या प्रकरणावर आता महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी शालिनी ठाकरे (Shalini Thackeray) यांनी आपल्या अधिकृत सोशल मिडिया अकाऊंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी पोस्टच्या माध्यमातून श्वेता तिवारीला थेट प्रत्युत्तर दिलं आहे.
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांची श्वेता तिवारीसाठी सणसणीत पोस्ट (Shalini Thackeray Gives a Strong Reply to Shweta Tiwari)
View this post on Instagram
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या पदाधिकारी शालिनी ठाकरे यांनी अभिनेत्री श्वेता तिवारीने केलेल्या आरोपांवर थेट प्रतिक्रिया दिली आहे. शालिनी ठाकरे यांनी आपल्या पोस्टमध्ये म्हटलं की, 'मी राजसाहेबांच्या पक्षाची एक पदाधिकारी आहे. आमचा पक्ष हा महाराष्ट्राच्या अस्मितेचा पक्ष आहे. छत्रपती शिवाजी महाराज आमचे दैवत आहेत. स्त्रियांचा सन्मान करणे हे आमच्या संस्कारात आणि रक्तात भिनले आहे. एखाद्या विकृत माणसाने महिलेशी गैरवर्तन केले तर त्याला धडा शिकवण्याची ताकद मनसेच्या मनगटात आहे'.
'राजसाहेब आणि त्यांचे पदाधिकारी, महिलांचा किती आणि कसा सन्मान करतात हे मला सांगायची गरज वाटत नाही. संपूर्ण महाराष्ट्र हे जाणून आहे. कोणत्याही महिलेला अपशब्द बोलणे हे चूकच.... पण फक्त कोणाचातरी फोटो राजसाहेबांसोबत आहे म्हणून त्याच्या वागण्याचा संबंध राजसाहेबांशी जोडणे हा शुद्ध मूर्खपणा आहे. मी पुढे एवढंच म्हणेन की कलाकारांनी समाजात इतर महिलांवर होणाऱ्या अत्याचारांवर सुद्धा आवाज उठवावा आणि सरकारला प्रश्न विचारावे'.
'बलात्काराच्या आरोपींना हार तुरे घालणाऱ्यांचा निषेध करा, महाराष्ट्रातून गायब होणाऱ्या तरुण मुलींबद्दल सरकारला प्रश्न विचारा, 2014 पासून सुरू झालेल्या वाईट ऑनलाईन ट्रोलिंगबद्दल सरकारला जाब विचारा...आपल्या कार्यक्रमाला प्रसिद्धी मिळावी म्हणून मराठी माणूस, राजसाहेब आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा वापर करू नका...'. या वक्तव्यामुळे श्वेता तिवारी आणि मनसे पक्ष यांच्यातील वाद पुन्हा चर्चेत आला आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:
32 एपिसोड, 3 अभिनेत्री; दोघींनी आयुष्याचा दोर कापला, एक इंडस्ट्रीतून गायब, 'ती' शापित मालिका कोणती?






















