Govinda Spotted Outside Hospital: चेहऱ्यावर मास्क अन् चिंता, पापाराझींना केलं इग्नोर; गोविंदा हॉस्पिटलबाहेर झाला स्पॉट, नेमकं झालं काय?
Govinda Spotted Outside Hospital: गोविंदा रुग्णालयाबाहेर स्पॉट झाल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

Govinda Spotted Outside Hospital goes viral: बऱ्याच काळापासून गोविंदा (Govinda) आणि सुनीता अहुजा (Sunita ahuja) दोघेही आपल्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आहेत. मध्यंतरी दोघांच्याही घटस्फोटाच्या चर्चा रंगू लागल्या होत्या. गोविंदाचा आपली को - अॅक्टर कोमल रानीसोबतचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. दोघेही लग्न करण्याच्या प्लानिंगमध्ये होते, असा दावा सुनिताने केला. दरम्यान, गोविंदानेही (Social Media) व्हिडीओ शेअर करुन, 'आपल्या मर्यादेत राहा', असा सल्ला आपल्या पत्नीला दिला. आता गोविंदाचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे. या व्हिडीओत गोविंदा एका रुग्णालयातून बाहेर पडत असल्याचं दिसत आहे. अभिनेत्याच्या चेहऱ्यावर चिंता स्पष्टपणे दिसून येत आहे. गोविंदाने पापाराझींना इग्नोर केलं आहे. नेमकं घडलं काय? गोविंदाचा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
गोविंदाच्या चाहत्यांना चिंता, अभिनेत्याला नेमकं घडलं काय? (Govinda Spotted Outside Hospital Actor Looks Worried)
Instant Bollywood ने गोविंदाचा एक व्हिडीओ आपल्या अधिकृत अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत गोविंदा व्हाईट शर्ट आणि जीन्स घातली असल्याचं दिसत आहे. तसेच गोविंदाने आपल्या चेहऱ्यावर मास्क लावला आहे. गोविंदा चिंतेत असल्याचं दिसत आहे. गोविंदाला रुग्णालयाच्या बाहेर पाहून त्याच्या चाहत्यांना चिंता सतावत आहे. सध्या गोविंदाचा हा व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल होत आहे.
दरम्यान, गोविंदा रुग्णालयात का गेला होता? याची माहिती अद्याप समोर आलेली नाही. या व्हायरल व्हिडीओमध्ये पापाराझी त्याच्यासोबत बोलण्याचा प्रयत्न करत आहेत. पण त्याने पापाराझींना कोणताही प्रतिसाद दिलेला नाही. गोविंदा केवळ त्यांना हात दाखवतो. नंतर आपल्या गाडीच्या दिशेनं जातो. गोविंदाची पत्नी सुनीताने त्याच्याविरोधात दाखल केलेली घटस्फोटाची केस मागे घेतली. कौटुंबिक न्यायालयाबाहेर सुनीताला पाहिल्यानंतर गोविंदा आणि सुनीताच्या नात्याची पुन्हा चर्चा रंगू लागली. दरम्यान, गोविंदा रुग्णालयात का गेला होता? हे अद्याप समोर आलेलं नाही.
सुनीताचा दावा - गोविंदा दुसरं लग्न करण्यासाठी करत होता प्लानिंग
अलिकडेच ड्रामा क्विन राखी सावंतचा एक व्हिडीओ सोशल मीडियात व्हायरल झाला होता. या व्हायरल व्हिडीओत राखी सुनीताशी फोनवर बोलत होती. सुनीताने राखीला सांगितले की, गोविंदा दुसरं लग्न करण्याचा विचार करत आहे. या कारणामुळे तिने घटस्फोटासाठी दाखल केलेली केस मागे घेतली. दरम्यान, गोविंद दुसऱ्या लग्नाच्या दाव्यांबाबत त्याच्या मॅनेजरनेही प्रतिक्रिया दिलेली आहे. त्याने गोविंदाच्या दुसऱ्या लग्नाच्या बातम्या खोट्या असल्याचं म्हटलं आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या:






















