(Source: ECI/ABP News/ABP Majha)
ड्रग्ज केसमध्ये शाहरुख खान, रणबीर कपूर, अर्जुन रामपाल NCB च्या रडारवर?
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी बॉलिवूडच्या बड्या अभिनेत्रींची नावं समोर आल्यानंतर आता बॉलिवूडचे बडे अभिनेते ड्रग्ज कनेक्शन प्रकरणी एनसीबीच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे.
मुंबई : दीपिका, सारा आणि श्रद्धानंतर आता बॉलिवुड मधील तीन मोठे पुरुष स्टार्स आत एनसीबीच्या रडारवर आले आहेत. S, R, A या तीनही स्टार्सच बॉलिवूड मध्ये वर्चस्व आहे आणि या तीघांना ज्यावेळेला चौकशीसाठी समन बजावल जाईल त्यावेळेला निश्चित बॉलिवुडमध्ये भूकंप निश्चित येईल. कसे आले हे तीन सुपरस्टार एनसीबीच्या रडारवर आहेत.
बॉलिवूडमधील ड्रग्ज कनेक्शनप्रकरणी बड्या अभिनेत्रींनंतर काही अभिनेतेही एनसीबीच्या रडारवर असल्याचं बोललं जात आहे. तसेच या अभिनेत्यांच्या नावाची अद्याक्षरं समोर आली आहेत. यासंदर्भात दैनिक भास्करने आपल्या एका रिपोर्टमध्ये दावा केला आहे की, नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी)च्या तपासात शाहरुख खान, रणबीर कपूर, डिनो मोरिया आणि अर्जुन रामपाल यांची नावं आहेत. यासंदर्भात स्पष्टिकरण देताना एनसीबीने स्पष्टीकरण दिलं आहे की, S, R, A ही अद्याक्षरं समोर आल्यापासून कोणत्याही पुराव्याविना काहीही वृत्त प्रसारित करण्यात येत आहे. दरम्यान, दैनिक भास्करच्या दाव्यानुसार, एनसीबीच्या एका अधिकाऱ्याने आपलं नाव समोर न येऊ देण्याच्या अटीवर बॉलिवूडच्या या बड्या अभिनेत्यांच्या नावाचा खुलासा केला आहे.
दीपिका.... सारा.... श्रद्धा... रकुल....
बॉलीवुडच्या या ए स्टारच्या अभिनेत्री ज्या एनसीबीच्या तपासाच्या जाळात अडकलेल्या आहेत. पण आता हिंदी फिल्म इंडस्ट्रीचे तीन सर्वात मोठे स्टार्स, ते स्टार्स ज्यांचा बॉलिवुडमध्ये वर्चस्व आहे. एनसीबीच्या रडारवर आले आहेत.
S = ?
R = ?
A = ?
हे तिघे सुपरस्टार ड्रग्ज घेतात अशी माहीती एनसीबीला मिळाली होती. तपास केला तर या तिघांविरुद्ध काही पुरावेसुद्धा मिळाले. आता एनसीबी आणखी तपास करुन लवकरच या तिघांना चौकशीसाठी बोलवणार असल्याच एनसीबीच्या सुत्रांनी सांगितलं आहे. ज्या दिवशी त्यांना समन्स बजावण्यात येईल आणि हे सुपरस्टार चौकशीसाठी एनसीबी समोर हजर होतील. तो दिवस बॉलीवुड साठी काळा दिवस निश्चित ठरेल. कारण ज्या कलाकारांवर जनता अफाट प्रेम करते त्यांचा हा खरी चेहरा पाहून लोकं निश्चित निराश होतील. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार ‘S या सुपरस्टारचं नाव क्षितिज रवि प्रसाद त्या चौकशी मधून समोर आलं. रवि प्रसाद या सुपरस्टारसोबत एक वर्ष काम केलं होत. तर R अद्याक्षराचं नाव Kwan कंपनीच्या काही लोकांच्या चौकशीमध्ये समोर आलं. कारण काही काळासाठी KWAN कंपनी R ला मॅनेज करत होती. तर A नावाचा स्टार तर ड्रग पेडलर, सप्लायरच्या संपर्कात होता आणि तो S नावाच्या सुपरस्टारला ड्रग्ज पोहचवायचा. इतकच नव्हे तर हा A बॉलीवुडमध्ये इतर मोठ्या स्टार्सपर्यंत ही ड्रग्ज पोहचवत असल्याची माहीती एनसीबीला मिळाली आहे.
सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, A चे फक्त बॉलिवुडमध्येच नाही चार मोठ्या क्रिकेटर सोबत ही संबंध आहेत. म्हणूनच हा A एनसीबीसाठी महत्वाची व्यक्ती आहे. जो अनेकांच्या नावाचा खुलासा करु शकतो. एनसीबी या स्टार्सबद्दल जास्त माहीती सार्वजनिक नाही करत आहेत. कारण एनसीबीला भीती आहे की, जर ही माहीती बाहेर आली तर दीपिका, सारा, श्रद्धा सारखं हे पुरुष स्टार्स ही तयारीनिशी एनसीबी समोर चौकशीसाठी हजर होतील. एनसीबी या तिघांविरुद्ध सबळ पुरावे गोळा करुन त्यांना समन्स बजावणार आहे.
एनसीबीचे डीजी राकेश अस्थाना स्वःता मुंबईत आले होते. आतापर्यंत झालेल्या चौकशीचा संपूर्ण आढावा घेऊन अस्थाना यांनी तपासाची पुढची दिशा कशी असावी? याबद्दल संपूर्ण माहीती आपल्या टीमला दिली आहे. अस्थाना यांनी आपल्या टीमला मुंबईच्या त्या ड्रग्ज पेडलर, सप्लायरला अटक करण्याचे आदेश दिले आहेत. ज्यांचा बॉलिवूड क्नेकशन आणि त्यांच्या माहितीच्या आधारेच या मोठ्या स्टार्सपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न एनसीबी करत आहे.
एनसीबीला विश्वास आहे की, या तिन्ही स्टार्सकडून होणाऱ्या चौकशीमध्ये बॉलिवुडचा खरा चेहरा समोर येईल. म्हणून येणाऱ्या काळात बॉलिवुडची अडचण निश्चित वाढणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या :