Chrisann Pereira: ड्रग्ज प्रकरणामुळे चर्चेत असलेली क्रिसन परेरा भारतात परतली; कुटुंबाला भेटताच अभिनेत्री झाली भावूक, व्हिडीओ व्हायरल
Chrisann Pereira: क्रिसन परेराला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आले होते. ती जवळपास चार महिने युएईमध्ये होती. आता ती भारतात परतली आहे.
Chrisann Pereira: गेल्या काही महिन्यांपासून ड्रग्स प्रकरणामुळे चर्चेत असणारी अभिनेत्री क्रिसन परेरा (Chrisann Pereira) भारतात परतली आहे. क्रिसन परेराच्या कुटुंबीयांनी अखेर सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. क्रिसन परेराला ड्रग्ज प्रकरणात अडकवण्यात आले होते. ती जवळपास चार महिने युएईमध्ये होती. UAE मधील शारजाह येथे क्रिसन परेराला बनावट ड्रग प्रकरणी अटक करण्यात आली होती. आता ख्रिसन परेरा गुरुवारी (3ऑगस्ट) मुंबईत परतली आहे.
मुंबई गुन्हे शाखेने अँथनी पॉल आणि त्याचा सहकारी राजेश बाभोटे उर्फ रवी याला क्रिसन परेराला शारजाह, ट्रॉफीमध्ये ड्रग्ज ठेवून यूएईला पाठवल्याप्रकरणी अटक केली आहे.
क्रिसनचा भाऊ केविनने विमानतळावरील एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये क्रिसन ही कुटुंबीयांना भेटताना आणि मिठी मारतानाचा दिसत आहे. “क्रिसन परत आली आहे. मला माहित आहे की, मी जूनमध्ये घोषणा केली होती की ती परत येईल परंतु यास थोडा जास्त वेळ लागला आणि पण ती शेवटी परत आली," असं कॅप्शन केविनने व्हिडीओला दिलं आहे. या व्हिडीओमध्ये क्रिसन ही कुटुंबाला भेटल्यानंतर भावूक झालेली दिसत आहे.
पाहा व्हिडीओ:
View this post on Instagram
काय आहे प्रकरण?
अभिनेत्री क्रिसॅन परेराला ऑडिशनसाठी शारजाह, संयुक्त अरब अमिराती (UAE) येथे पाठवण्यात आले. फ्लाइटमध्ये चढण्यापूर्वी तिला एक ट्रॉफी देण्यात आली. या ट्रफीमध्ये ड्रग्स होते. तिला सांगण्यात आले की ही ट्रॉफी ऑडिशन प्रॉपचा भाग आहे. अमली पदार्थांची तस्करी केल्याप्रकरणी क्रिसॅन परेराला शारजा आंतरराष्ट्रीय विमानतळावर अटक करण्यात आली आणि नंतर शारजा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले होते. तपासादरम्यान, गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांना समजले की, पॉल हा या संपूर्ण प्रकरणाचा मास्टरमाईंड आहे .
क्रिसॅन परेरानं या चित्रपटांमध्ये केलं काम
क्रिसॅन परेरा हिनं काही हिंदी चित्रपटांमध्ये काम केलं आहे. सडक-2 या चित्रपटासोबतच तिनं बाटला हाऊस या चित्रपटात देखील काम केलं आहे. तसेच मर्डर इन अगोंडा या वेब सीरिजमध्ये देखील क्रिसॅननं काम केलं. या वेब सीरिजमधील तिच्या अभिनयानं अनेकांचे लक्ष वेधले.
इतर महत्वाच्या बातम्या: