एक्स्प्लोर
बेडसीनवरुन दिग्दर्शकाशी वाद, चित्रांगदाचा चित्रपटाला रामराम

मुंबई : नवाझुद्दीन सिद्दीकीसोबतच्या आगामी चित्रपटात बेडसीन देताना दिग्दर्शकाची अरेरावी सहन न झाल्याने अभिनेत्री चित्रांगदा सिंहने चित्रपटच सोडला आहे. बाबुमोशाय बंदूकबाज चित्रपटाच्या सेटवर दिग्दर्शक कुशन नंदीच्या सूचनांमुळे ती अवघडली होती.
'चित्रांगदा, तुला अक्षरशः नवाझवर ताबा मिळवायचा आहे. पाय चोळ आणि सेक्स कर' अशा शब्दात दिग्दर्शकाने चित्रांगदाला दटावल्याचं स्पॉटबॉय.कॉम या वेबसाईटने म्हटलं आहे. या सीनमध्ये नवाझला तिला हलकंसं बेडवर खेचायचं होतं. त्यानंतर कोणीतरी त्यांना पाहत असल्याची जाणीव त्याला होते.
सीनचा पहिला टेक दिग्दर्शक कुशनच्या मनासारखा झाला नाही. त्यामुळे अस्वस्थतेतून तो चित्रांगदावर ओरडल्याचं म्हटलं जातं. त्यामुळेच चित्रांगदा आणि कुशन यांच्यात वादावादी झाली. चित्रपटाच्या संपूर्ण युनिटसमोर अपमानास्पद वागणूक दिल्याने चित्रांगदाला खदखदत होतं. कुशनचा तिला समजवण्याचा प्रयत्न अखेर निष्फळ ठरला आणि तिने काढता पाय घेतला.
आणखी वाचा
Advertisement
Advertisement



















