Albatya Galbatya : किती गं बाई मी हुशार... बच्चेकंपनीला पाहता येणार खट्याळ चेटकिणीची धमाल गोष्ट
Albatya Galbatya : 'अलबत्या गलबत्या' हे बालनाट्य बच्चेकंपनीला आता पुन्हा एकदा पाहायला मिळणार आहे.
Albatya Galbatya : 'अलबत्या गलबत्या' (Albatya Galbatya) हे बालनाट्य आता पुन्हा एकदा रंगभूमीवर आले आहे. या बालनाटकाच्या निमित्ताने बच्चेकंपनीला खट्याळ चेटकिणीची धमाल गोष्ट पुन्हा एकदा अनुभवायला मिळणार आहे.
वैभव मांगले 'अलबत्या गलबत्या' या बालनाटकात चिंची चेटकिणीचीच्या प्रमुख भूमिकेत आहे. या नाटकाचे लेखन रत्नाकर मतकरी यांनी केले आहे. तर दिग्दर्शनाची धुरा चिन्मय मांडलेकरने साकारली आहे. 'अलबत्या गलबत्या' या बालनाट्याची निर्मिती झी मराठी आणि अद्वेत थिएटरने केली आहे.
View this post on Instagram
वैभव मांगले साकारत असलेली चिंची चेटकीण बालप्रेक्षकांना कधी हसवते तर कधी घाबरवते. लहानांसोबत मोठ्यांनादेखील हे बालनाट्य प्रचंड आवडते. 'अलबत्या गलबत्या' बालनाट्य 1972 साली पहिल्यांदा रंगभूमीवर आले होते. वैभव मांगलेंनी साकारलेली चिंची चेटकीण त्यावेळी दिलिप प्रभावळकर साकारत होते.
नाटक येतंय तुमच्या शहरात
शनि 9 एप्रिल दु 12.30 वा बालगंधर्व, पुणे
शनि 9 एप्रिल सायं 5 वा अ. साठे स्मारक, पुणे
बुध 13 एप्रिल सायं 7.30 वा दीनानाथ नाट्यगृह, पार्ले
गुरू 14 एप्रिल दु 4 वा वि. भावे नाट्यगृह, वाशी
शुक्र 15 एप्रिल दु 4.30 वा दामोदर हॉल, परळ
संबंधित बातम्या