एक्स्प्लोर

Chhatrapati Sambhaji : 'छत्रपती संभाजी' प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज! प्रेरणादायी इतिहास तरुण पिढीला पाहता येणार

Chhatrapati Sambhaji : 'छत्रपती संभाजी'ची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे.

Chhatrapati Sambhaji : 'छत्रपती संभाजी'ची (Chhatrapati Sambhaji) घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. आता हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीसाठी सज्ज आहे. येत्या 2 फेब्रुवारीला हा सिनेमा प्रदर्शित होणार आहे. तगडी स्टारकास्ट असलेल्या या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे.

छत्रपती संभाजी महाराजांच्या (Chhatrapati Sambhaji Maharaj) पराक्रमाला  आणि  बलिदानाला जगाच्या इतिहासात तोड नाही.  संकटाला  निर्भीडपणे सामोरे  जात  पराक्रमाच्या जोरावर अल्प काळात मराठा साम्राज्याच्याविस्तार आणि संरक्षण करणाऱ्या पराक्रमी राजाचा जीवनपट उलगडणारा  राकेश सुबेसिंह  दुलगज निर्मित आणि दिग्दर्शित 'छत्रपती  संभाजी' (Chhatrapati Sambhaji) हा  चित्रपट  येत्या 2  फेब्रुवारीला  चित्रपटगृहात प्रदर्शित होत आहे.  

'छत्रपती संभाजी' 2 फेब्रुवारीला चित्रपटगृहात (Chhatrapati Sambhaji Release Date)

'छत्रपती संभाजी' हा  चित्रपट मराठी, हिंदी, तमिळ, तेलगू आणि इंग्रजी मध्ये एकाच वेळी प्रदर्शित होत आहे. राजकारण, मुसद्देगिरी, समाजकारण, धर्मकारण यांच्यात मुरलेले  छत्रपती संभाजी महाराज  रणांगणावरचे शेर होते. स्वराज्यनिष्ठा, शौर्य, धैर्य अशा अनेक अंगाने अनेक मोहिमा यशस्वी  करणाऱ्या महाराजांनी निर्माण केलेला  प्रेरणादायी इतिहास  'छत्रपती  संभाजी' या चित्रपटातून  तरुण पिढीला पाहता येणार आहे. 

राजकारणातील डावपेच, गनिमी कावा या  जोरावर  छत्रपती संभाजी महाराजांनी सलग नऊ वर्षे मुघल, आदिलशहा, सिद्धी, पोर्तुगीज, इंग्रज, आणि इतर अंतर्गत शत्रूंशी लढा देत, स्वराज्याला टिकवले आणि वाढविले. दुर्दम्य इच्छाशक्ती आणि अजोड पराक्रमाच्या जोरावर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या पराक्रमाच्या जोरावर त्या साम्राज्याचा विस्तार केला.  

तगडी स्टारकास्ट असलेला 'छत्रपती संभाजी' (Chhatrapati Sambhaji Starcast)

प्रमोद पवार, शशांक उदापूरकर, रजित कपूर, दिलीप ताहिल, मृणाल कुलकर्णी, मोहन जोशी, भरत दाभोळकर, लोकेश गुप्ते, बाळ  धुरी, दिपक शिर्के,अमित देशमुख , दिवंगत आनंद अभ्यंकर,समीर,मोहिनी पोतदार, प्रिया गमरे आदी कलाकार 'छत्रपती संभाजी'  चित्रपटात आहेत. 

चित्रपटाला साजेशी सहा गाणी  चित्रपटात असून अविनाश विश्वजित, गुरु शर्मा आणि आरव यांचे संगीत चित्रपटाला लाभले असून पार्श्वसंगीत अमर-अमित देसाई यांनी दिले आहे. 'छत्रपती संभाजी' चित्रपटाची सहनिर्मिती एफआयएफ निर्मिती संस्थेची आहे. कथा  सुरेश चिखले यांची आहे. 'छत्रपती संभाजी' चित्रपट 2 फेब्रुवारीला सर्वत्र प्रदर्शित होत आहे. काही दिवसांपासून अनेक ऐतिहासिक सिनेमे प्रदर्शित होत आहे. ऐतिहासिक सिनेमांना प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. 

संबंधित बातम्या

Chhatrapati Sambhaji : 'छत्रपती संभाजी' लवकरच येणार प्रेक्षकांच्या भेटीला; 'हा' अभिनेता झळकणार औरंगजेबाच्या भूमिकेत

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

ABP Majha Headlines : 11 PM : 20 May 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्सMaharashtra Voting Misconduct Special Report : राडा, गोंधळ, मनस्ताप...मतदारांचा संताप!Voting issues in Election Mumbai Kalyan : मतदानाची स्लो ट्रेन, आरोपांची एक्सप्रेस! Special ReportLok Sabha Elections 2024 Missing Names Special Report : यादी तयार पण नावच गायब...जबाबदार कोण?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
सॉल्टची जागा कोण घेणार ? हैदराबादविरोधात कोलकात्याची संभाव्य प्लेईंग 11 
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
IPL 2024 Playoffs : आरसीबी किती एलिमिनेटर सामने खेळला, काय सांगतात आकडे, यंदा राजस्थानचा अडथळा दूर करणार?
Bhiwandi : बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
बोगस मतदान, मतदारांना धमकावणे... भिवंडीत कपिल पाटील- बाळ्यामामा म्हात्रेंचे आरोप-प्रत्यारोप
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
IPL 2024 : 17 वर्षांचं स्वप्न पूर्ण होणार, यंदा RCB चषकावर नाव कोरणार, ही घ्या 3 मोठी कारणं 
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
पती शिंदे गटात, पुत्र ठाकरे गटात, अमोल किर्तिकर यांच्या मातोश्री म्हणाल्या, शिंदेंना सलाम ठोकणे पटत नाही, माझं मत...
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IND vs PAK : पार्किंग लॉटमध्ये होणार भारत-पाकिस्तान सामना, विश्वचषकासाठी मैदान सज्ज
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
IPL 2024 Final: चेन्नईमध्ये IPL फायनलचा थरार, तिकिटांची विक्री सुरु, सर्वात स्वस्त तिकिट किती रुपयांचं?  
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
Cyber Crime : तब्बल 18 लाखांहून अधिक सिम बंद होणार, सायबर गुन्ह्यांवरील नियंत्रणासाठी सरकारचं मोठं पाऊल
Embed widget