एक्स्प्लोर

Chhaava vs Pushpa 2 : विकी कौशलने घेतला 'पुष्पा 2' चा धसका? टक्कर रोखण्यासाठी बदलणार 'छावा' चित्रपटाची रिलीज डेट

Pushpa 2 And Chhaava Release Date : सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 नंतर आता बॉक्स ऑफिसवर आणखी दोन बिग बजेट चित्रपटांची टक्कर होण्याची शक्यता आहे.

Chhaava Movie Release Date : बॉलिवूड अभिनेता विकी कौशलच्या आगामी 'छावा' चित्रपटाची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत आहेत. छावा हा 2024 मधील मोस्ट अवेटेड चित्रपटांपैकी एक आहे. या पीरियड ड्रामा चित्रपटात विकी कौशल वेगळ्या अवतारात दिसणार आहे. विकी कौशलच्या छावा चित्रपटाची घोषणा झाल्यापासूनच याच्या प्रत्येक अपडेटकडे चाहते डोळे लावून बसले आहेत. विकी कौशलचा छावा चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार आहे. महत्त्वाचं म्हणजे याचं दिवशी सुपरस्टार अल्लू अर्जुनचा पुष्पा 2 : द रुल चित्रपट प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 नंतर आता बॉक्स ऑफिसवर आणखी दोन बिग बजेच चित्रपटांची टक्कर होण्याची शक्यता आहे.

विकी कौशलने घेतला 'पुष्पा 2' चा धसका? 

आता छावा चित्रपटाबाबत मोठी अपडेट समोर आली आहे. पुष्पा 2 चित्रपट 6 डिसेंबरला रिलीज होणार असून त्याच दिवशी पुष्पा 2 द रुल चित्रपट रिलीज होणार आहे. दोन्हीही बिग बजेट चित्रपट एकाच दिवशी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाल्यास मोठा क्लॅश होण्याची शक्यता आहे. त्यामुळे चित्रपटाचे निर्माते ही टक्कर टाळण्याच्या विचारात असल्याचं मीडिया रिपोर्टनुसार समोर आलं आहे. अलिकडे सिंघम अगेन आणि भूल भुलैया 3 चित्रपटाची बॉक्स ऑफिसवर टक्कर पाहायला मिळाली, ज्याचा दोन्ही चित्रपटांना फटका बसला आहे.

'छावा' चित्रपटाबाबत मोठा निर्णय घेण्याची तयारी

मीडिया रिपोर्टनुसार, छावा चित्रपटाची 6 डिसेंबर या रिलीज डेटबाबत पुर्नविचार सुरु आहे. छावा चित्रपट पुढे ढकलला जाऊ शकतो. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची नवीन तारीख ठरवली जात असल्याचं बोललं जात आहे. छावा चित्रपट 'पुष्पा 2: द रुल' चित्रपटाला टक्कर देणार आहे, हे लक्षात घेता होणारं नुकसान टाळण्यासाठी चित्रपटाची रिलीज डेट बदलण्याचा निर्मात्यांचा विचार आहे. 'पुष्पा 2 : द रुल' हा सुपरहिट चित्रपट 'पुष्पा'चा सिक्वेल आहे. यामुळे बॉक्स ऑफिसवर दोन्ही चित्रपटांची टक्कर झाल्यास विकी कौशलच्या चित्रपटाला कमाईच्या बाबतीत फटका शकतो.

निर्माते रिलीज डेट बदलण्याचा विचारात

मीडिया रिपोर्टनुसार, छावा चित्रपटाचे निर्माते रिलीज डेट बदलण्याचा विचार करत आहेत. त्यामागील कारण म्हणजे, अल्लू अर्जुनचा बहुप्रतिक्षित चित्रपट 'पुष्पा 2' सोबतची टक्कर. पुष्पा 2 चित्रपटही 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार आहे. पुष्पा 2 या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. मिड-डेच्या बातमीनुसार, विकी कौशलचा 'छावा' हा चित्रपट आता 6 डिसेंबरला प्रदर्शित होणार नाही, असं सांगितलं जात आहे. या चित्रपटाच्या नवीन तारखेबाबत अद्याप कोणतीही घोषणा झालेली नाही.

पुष्पा 2 अन् छावा

सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2 : द रुल' चित्रपटात अल्लू अर्जुन आणि रश्मिका मंदान्ना मुख्य भूमिकेत आहेत. या चित्रपटात फहद फासिल, धनंजय, जगदीश सुनील आणि अजय घोष यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. तर, विकी कौशलचा 'छावा' हा एक ऐतिहासिक महाकाव्य चित्रपट आहे, जो शिवाजी सावंत यांच्या 'छावा' नावाच्या मराठी कादंबरीवर आधारित आहे. योगायोगाने, यामध्ये रश्मिका देखील संभाजी महाराजांची पत्नी येसूबाईच्या महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे. याचित्रपटात दिव्या दत्ता, अक्षय खन्ना, आशुतोष राणा आणि इतर कलाकारहाी झळकणार आहेत. छावा चित्रपटाचं दिग्दर्शन लक्ष्मण उतेकर यांनी केले असून दिनेश विजन यांनी निर्मिती केली आहे.

महत्त्वाच्या इतर बातम्या :

VIDEO : सूरजच्या गावी रमली जान्हवी किल्लेकर, शेतात चालवला ट्रॅक्टर; नेटकऱ्यांकडून तोंड भरुन कौतुक

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhatrapati shivaji maharaj Statue : महाराजांच्या पुतळ्याचा मुद्दा विधानसभेच्या प्रचारात तापणार?Constitution And Politics Special Report : एक संविधान दोन नॅरेटीव्ह आणि राजकीय स्पर्धाZero Hour : अमेरिकन निवडणुकीचं सखोल विश्लेषण, भारतावर काय परिणाम होणार ?Sadabhau Khot Special Report : सदाभाऊ खोत यांची पवारांवर टीका,राष्ट्रवादीच्या नेत्यांचं प्रत्युत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Narendra Modi : राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीत विजय मिळवताच नरेंद्र मोदींचा डोनाल्ड ट्रम्प यांना फोन
Deepak Kesarkar : ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
ज्याला Today आणि Tomorrow मधील फरक कळत नाही असा माणूस माझ्याविरोधात उभा : दीपक केसरकर
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
वर्ध्यातील स्टील कंपनीत भीषण स्फोट, 17 कामगार जखमी; गंभीर जखमींना नागपूरला हलवले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
भाजपाचे बंडखोर स्वत:चेच चिन्ह विसरले; कार्यकर्त्यांना तुतारी वाजविण्याचे आवाहन, लक्षात येताच गोंधळले
Varsha Gaikwad : 'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
'भारत जोडो' यात्रेत सहभागी झालेल्या लाखो बहुजनांना देवेंद्र फडणवीस नक्षलवादी समजतात का? वर्षा गायकवाडांचा सवाल
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
मोठी बातमी! शेतकऱ्यांचं 3 लाख रुपयापर्यंतचं कर्ज माफ होणार, नियमीत कर्जफेड करणाऱ्यांना 50000 चं प्रोत्साहन मिळणार, शरद पवारांची घोषणा
Rahul Gandhi :  महालक्ष्मी योजना ते जातनिहाय जनगणना, राहुल गांधी यांच्या महाराष्ट्रातील पहिल्या प्रचार सभेत मोठ्या घोषणा
खटाखट, खटाखट, खटाखट, राहुल गांधींचा मुंबईत पुन्हा नारा, महालक्ष्मी योजनेतून महिलांना दरमहा 3 हजार रुपये देणार, कारण सांगितलं
Raju Shetti : लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
लोकसभेला बिघडलं, पण विधानसभेला जमलं; शाहुवाडीत महाविकास आघाडीच्या सत्यजित आबांना राजू शेट्टींचा पाठिंबा!
Embed widget