Chandu Champion Box Office Collection : 'चंदू चँम्पियन'च्या अॅडव्हान्स बुकिंगला सुरुवात; कार्तिक आर्यन धमाका करण्यास सज्ज!
Chandu Champion Box Office Collection : कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट सिनेमागृहात प्रदर्शित होण्यास सज्ज आहे. या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात झाली आहे.
Chandu Champion Box Office Collection Day 1 : बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी सज्ज आहे. कार्तिक आर्यनचा 'चंदू चॅम्पियन' (Chandu Champion) हा चित्रपट रिलीजसाठी सज्ज आहे. 14 जून 2024 रोजी 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट रिलीज होणार आहे. 'चंदू चॅम्पियन' हा क्रीडाविषयक चित्रपट आहे. 'चंदू चॅम्पियन' हा एक बायोपिक आहे. या चित्रपटात कार्तिक आर्यन मुरलीकांत पेटकरच्या भूमिकेत झळकणार आहे. निर्मात्यांनी या चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगला आता सुरुवात केली आहे. अॅडव्हान्स बुकिंग सुरू होताच अनेक टिकीट्स विकले गेले आहेत. त्यामुळे 'चंदू चॅम्पियन' हा चित्रपट रिलीजच्या पहिल्या दिवसापासून शानदार कमाई करणार असल्याचं स्पष्ट होत आहे.
'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाची अॅडव्हान्स बुकिंग शानदार अंदाजात करण्यात आली आहे. निर्मात्यांनी बुर्ज खलीफावरुन चित्रपटाच्या अॅडव्हान्स बुकिंगची माहिती दिली आहे. नाडियाडवाला ग्रँडसनने सोशल मीडियावर पोस्ट शेअर करत लिहिलं आहे,"आमचे चॅम्पियन्स बुर्ज खलिफावर अॅडव्हान्स बुकिंग सुरू करत आहेत. अॅडव्हान्स बुकिंग ओपन...14 जून 2024 रोजी चित्रपट प्रदर्शित होणार".
'चंदू चॅम्पियन'च्या अॅडव्हान्स बुकिंगच्या पहिल्या दिवसापासून शानदार बुकिंग होत आहे. सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटाचे आतापर्यंत 4218 तिकीट विकले गेले आहेत. या तिकीटांच्या माध्यमातून चित्रपटाने आतापर्यंत 12.82 लाखांची कमाई केली आहे. चित्रपटाची बुकिंग अशीच सुरू राहिली तर ओपनिंग डेला हा चित्रपट दुहेरी आकड्यापर्यंत कमाई करेल.
कार्तिक आर्यनचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन
कार्तिक आर्यन 'चंदू चॅम्पियन' या चित्रपटासाठी खूप मेहनत घेत आहे. त्याने आपली ट्रान्सफॉर्मेशन जर्नी सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांसोबत शेअर केली आहे. कार्तिकचं जबरदस्त ट्रान्सफॉर्मेशन पाहून चाहत्यांना धक्का बसला आहे.
View this post on Instagram
'चंदू चॅम्पियन' या चित्रपटात कार्तिक आर्यनसोबत विजय राज, भाग्यश्री, राजपाल यादव, मनोज आनंदसह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत झळकणार आहेत. कबीर खानने या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. ट्रेलर रिलीज झाल्यापासून हा चित्रपट चांगलाच चर्चेत आहे. जगभरातील बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे.
संबंधित बातम्या