Chandramukhi : 'चंद्रमुखी' सिनेमातल्या तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आहे 'ही' अभिनेत्री
Chandramukhi : 'चंद्रमुखी' सिनेमात चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर साकारणार आहे.
Chandramukhi : बहुचर्चित 'चंद्रमुखी' (Chandramukhi) सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अभिनेता-दिग्दर्शक प्रसाद ओकने या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. या सिनेमात चंद्रा हे पात्र कोण साकारणार याची प्रेक्षकांना उत्सुकता होती. पण अखेर आज 'चंद्रमुखी'चा चेहरा समोर आला आहे. 'चंद्रमुखी' सिनेमात चंद्रा हे पात्र अभिनेत्री अमृता खानविलकर ( Amruta Khanvilkar) साकारणार आहे.
'चंद्रमुखी' सिनेमा 29 एप्रिल 2022 रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. राजकारणात मुरलेला नेता खा. दौलत देशमाने आणि एक लावणी कलावंत असणाऱ्या 'चंद्रा'ची प्रेमकहाणी आहे. तमाशातील शुक्राची चांदणी चंद्रा आणि राजकारणात मुरलेला ध्येयधुरंदर राजकारणी यांच्यात निर्माण होणारी ओढ प्रेक्षकांना सिनेमात पाहायला मिळणार आहे. लाल दिवा आणि घुंगरांच्या गुंतावळीची ही राजकीय प्रेमकहाणी प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
View this post on Instagram
'चंद्रमुखी' हा सिनेमा लेखक विश्वास पाटील यांच्या 'चंद्रमुखी' या कांदबरीवर आधारित आहे. सिनेमाची पटकथा, संवाद चिन्मय मांडलेकर यांचे असून अजय - अतुल या दमदार जोडीने 'चंद्रमुखी'ला संगीत दिले आहे. अमृता प्रेक्षकांना ढोलकीच्या तालावर, घुंगरांच्या बोलावर, साजशृंगार, सौंदर्याची नजाकत आणि सोबत दिलखेचक अदांनी घायाळ करणार आहे.
संबंधित बातम्या
Kangana Ranaut : कंगना रणौतला दिलासा देण्यास दंडाधिकारी न्यायालयानं दिला नकार
TOP 5 Entertainment News : दिवसभरातील पाच महत्त्वाच्या मनोरंजनविषयक बातम्या
Godavari : कॅनडा, न्यूझीलंड, गोवा, पुणे नंतर 'गोदावरी' आता न्यूयॅार्कमध्ये झळकणार!
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha