एक्स्प्लोर
Advertisement
झिंगाटनंतर अजय-अतुलचं नवं गाणं - बेबी ब्रिंग इट ऑन
मुंबई: सैराट सिनेमातील झिंगाट गाण्याने गायक, संगीतकार अजय-अतुल यांनी चाहत्यांना ठेका धरायला लावला. आता झिंगाटनंतर अजय-अतुल त्याच पठडीतील 'बेबी ब्रिंग इट ऑन' हे गाणं घेऊन येत आहेत.
दिग्दर्शक गिरीष कुलकर्णी यांच्या जाऊंद्याना बाळासाहेब या सिनेमातील हे गाणं नुकतंच रिलीज झालं आहे.
'बघ तरी गोडीत, लक्झरी गाडीत आलोया मै हू डॉन, बेबी ब्रिंग इट ऑन, आलिंगनाला' असे या गाण्याचे बोल आहेत.
हे गाणं अजय - अतुलने लिहिलं असून, या गाण्याला त्यांनीच संगीत दिलं आहे, तर अजय गोगावलेने हे गायलं आहे.
जाऊंद्याना बाळासाहेब हा सिनेमा 7 ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात अभिनेता भाऊ कदम, गिरीष कुलकर्णी, सई ताम्हणकर, मोहन जोशी, मनवा नाईक प्रमुख भूमिकेत आहेत.
पाहा 'बेबी ब्रिंग इट ऑन' गाण्याचा व्हिडीओ
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
म्युच्युअल फंड्स
महाराष्ट्र
ठाणे
महाराष्ट्र
Advertisement