Brahmastra Box Office Week 1 Collection : 'ब्रह्मास्त्र'चा जगभरात डंका; बॉक्स ऑफिसवर पार केला 300 कोटींचा टप्पा
Brahmastra : रणबीर कपूर आणि आलिया भट्टच्या 'ब्रह्मास्त्र' सिनेमाने जगभरात 300 कोटींची कमाई केली आहे.
Brahmastra Movie Worldwide Collection : बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर (Ranbir Kapoor) आणि आलिया भट्टचा (Alia Bhatt) 'ब्रह्मास्त्र' (Brahmastra) सिनेमा सध्या सिनेमागृहात धुमाकूळ घालतो आहे. जगभरात या सिनेमाने 300 कोटींचा टप्पा पार केला आहे.
'ब्रह्मास्त्र'ने रिलीजच्या पहिल्याच आठवड्यात 300 कोटींचा आकडा पार केला आहे. अयान मुखर्जीने एक खास व्हिडीओ शेअर करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या व्हिडीओमध्ये रणबीरचा थरार आणि आलिया भट्टची झलक पाहायला मिळत आहे. तर आता रिलीजच्या दुसऱ्या आठवड्यात हा सिनेमा किती कमाई करतो, याकडे प्रेक्षकांचं लक्ष लागलं आहे.
'ब्रह्मास्त्र'ची भारतात रेकॉर्डब्रेक कमाई
'ब्रह्मास्त्र' हा सिनेमा सध्या जगभरात ट्रेड्रिंगमध्ये आहे. या सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई केली आहे. भारतातदेखील या सिनेमाने 170 कोटींचा गल्ला जमवला आहे. भारतात हा सिनेमा 200 कोटींच्या क्लबमध्ये सामील होऊ शकतो असा अंदाज वर्तवला जात आहे. सोशल मीडियावरदेखील 'ब्रह्मास्त्र' सिनेमातील गाणी व्हायरल होत आहेत.
View this post on Instagram
'ब्रह्मास्त्र'च्या कमाईबद्दल जाणून घ्या...
'ब्रह्मास्त्र' सिनेमाने रिलीजच्या पहिल्या दिवशी भारतात 37 कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 42 कोटी, तिसऱ्या दिवशी 45 कोटी, चौथ्या दिवशी 16.50 कोटी, पाचव्या दिवशी 12 कोटी, सहाव्या दिवशी 11 कोटी आणि सातव्या दिवशी 9 कोटींची कमाई केली आहे.
'ब्रह्मास्त्र'ने बॉलिवूडला दाखवले सुगीचे दिवस
गेल्या काही दिवसांत अनेक बिग बजेट सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले होते. पण हे सिनेमे बॉक्स ऑफिसवर आपली जादू दाखवण्यात अयशस्वी ठरले आहे. सिनेप्रेक्षकांमध्ये दाक्षिणात्य सिनेमांची क्रेझ दिसून येत होती. याचाच फटका बॉलिवूडला बसला होता. पण 'ब्रह्मास्त्र' सिनेमाने रेकॉर्डब्रेक कमाई करत बॉलिवूडला सुगीचे दिवस दाखवले आहेत.
संबंधित बातम्या
Brahmastra Box Office Collection Day 7 : सातव्या दिवशी ‘ब्रह्मास्त्र’ची कमाई गडगडली! बॉक्स ऑफिसवर जमवला अवघा ‘इतका’ गल्ला!
Brahmastra Box Office Collection Day 6 : 'ब्रह्मास्त्र'ची बॉक्स ऑफिसवर जादू; सहाव्या दिवशी जमवला ‘इतका’गल्ला!
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)