एक्स्प्लोर

Salman Khan: सलमान खानला हायकोर्टाचा दिलासा; पत्रकार मारहाण प्रकरण हायकोर्टाकडून रद्द

2019 मध्ये एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी.एन. नगर (D N Nagar) पोलीस ठाण्यात सलमानवर (Salman Khan) गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हे संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे.

Salman Khan: अभिनेता सलमान खानला (Salman Khan) 2019 मधील प्रकरणात हायकोर्टानं (High Court) दिलासा दिला आहे.  2019 मध्ये एका पत्रकाराला मारहाण प्रकरणी डी.एन. नगर (D N Nagar) पोलीस ठाण्यात सलमानवर गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणावर आज सुनावणी झाली. हे संपूर्ण प्रकरणच हायकोर्टाकडून रद्द करण्यात आलं आहे. अंधेरी दंडाधिकारी कोर्टानं बजावलेलं समन्स हायकोर्टानं रद्द करत सलमानला या प्रकरणात मोठा दिलासा दिला आहे. हे प्रकरण नेमकं काय होतं? ते जाणून घेऊयात... 

नेमकं प्रकरण काय? 

सलमान खान अंधेरी (Andheri) परिसरात सायकल चालवत असताना एका कथित पत्रकारानं त्याचं शूटिंग केलं. हे शूटिंग त्यानं युट्यूबवर अपलोड करण्यासाठी केले होते. ही बाब सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकाला आवडली नाही. त्यामुळे सलमान आणि त्याच्या सुरक्षारक्षकानं त्याला शिवीगाळ केली, धक्काबुक्की केली अशी तक्रार पत्रकार अशोक पांडे यांनी अंधेरीच्या डी.एन. नगर पोलीस स्टेशनमध्ये केली होती. हे प्रकरण जेव्हा कोर्टात पोहोचलं तेव्हा कोर्टानं समन्स जारी करुन सलमानला कोर्टात हजर राहण्याचे आदेश दिले. या संपूर्ण प्रकरणी सलमाननं आणि त्याच्या सुरक्षारक्षकानं मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. या दोन्ही याचिकांवर स्वतंत्रपणे सुनावणी झाली.  कोर्टानं दोन्ही याचिकांचा स्विकार करत हे संपूर्ण प्रकरण कोर्टानं रद्द केलं आहे. 

न्यायमूर्ती भारती डांगरे यांच्यासमोर या संपूर्ण प्रकरणाची सुनावणी झाली. हायकोर्टानं सलमान खानच्या विरोधातील हे संपूर्ण प्रकरण रद्द केलं आहे त्यामुळे आता सलमानला कोर्टाकडून दिलासा मिळाला आहे. 

अभिनेता सलमान खान हा चित्रपटांबरोबरच त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत असतो. सलमान खानला काही दिवसांपूर्वी ई-मेलद्वारे जीवे मारण्याची धमकी दिली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी जोधपूर येथून आरोपी धाकड राम बिश्नोईला (Dhakad Ram Bishnoi) अटक केली. सलमानला याआधी देखील एका पत्राद्वारे धमकी देण्यात आली होती. 

सलमानचे लवकरच काही आगामी चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. 'किसी का भाई किसी की जान', 'टायगर-3' हे चित्रपट देखील लवकरच रिलीज होणार आहेत. तसेच तो किक-2 तसेच नो एन्ट्रीच्या सिक्वेलमधून सलमान प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. सलमानच्या आगामी चित्रपटांची प्रेक्षक उत्सुकतेने वाट बघत असतात. 

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

Salman Khan: गोल्डी ब्रारनेच ई-मेलद्वारे सलमानला दिलेली जीवे मारण्याची धमकी? पोलिसांना संशय, तपासातून महत्त्वाची माहिती समोर

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Zero Hour : शपथविधीआधी देवेंद्र फडणवीसांसमोर सर्वात मोठी आव्हानं, एकनाथ शिंदेच्या नाराजीचा अर्थ काय?Special Report on Devendra Fadnavis : सर्वसमावेशक अनुमोदन, देवेंद्र फडणवीस भाजप विधिमंडळ पक्षनेतेपदीSudhir Mungantiwar on Oath Ceremony : उद्या फक्त 3 जण शपथ घेतील, सुधीर मुनगंटीवारांची मोठी माहितीEknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
Eknath Shinde - Vinod Tawde : आधी कुजबूज, नंतर टाळी दिली! शिंदे-तावडेंमध्ये काय चर्चा?
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
पेट्रोलचा टँकर पलटी झाला, फोंडा घाटाचा रस्ता सरसर वणव्यासारखा पेटत गेला अन्...
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
Devendra Fadnavis Chief Minister : देवेंद्र फडणवीसांची झंझावाती कारकीर्द, कमबॅकची कहाणी माझा वर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 04 डिसेंबर 2024 | बुधवार
Maharashtra CM : शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
शपथ विधिबाबत एकनाथ शिंदेंचा सस्पेन्स कायम; समजूत काढण्यासाठी शिवसेनेचे आमदार वर्षावर
Eknath Shinde : देवेंद्र फडणवीस यांची विनंती अन् उपमुख्यमंत्रिपदाबाबतचा प्रश्न, एकनाथ शिंदे पत्रकार परिषदेत काय म्हणाले?
देवेंद्रजींनी मुख्यमंत्री व्हावं असं पाठिंब्याचं पत्र सेनेनं दिलं, एकनाथ शिंदेंनी सांगितला अडीच वर्षांपूर्वीचा प्रसंग
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Devendra Fadnavis : Eknath Shinde मंत्रिमंडळात राहणार नाही? फडणवीसांचं मोठं वक्तव्य
Rahul Narwekar : राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
राहुल नार्वेकर पुन्हा विधानसभा अध्यक्ष होणार, सूत्रांची माहिती, विशेष अधिवेशनाच्या तारखा समोर
Embed widget