एक्स्प्लोर

Parveen Babi : परवीन बाबीच्या फोटोने याड लावलं,ऑस्ट्रेलियन इंजिनिअरने थेट बॉलिवूडच गाठलं

Bob Christo Loves Parveen Babi : 90 दशकात बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या बॉब यांची बॉलिवूडमधील एन्ट्रीदेखील एकदम फिल्मी आहे. परवीन बाबी यांच्या सौंदर्याने बॉब यांना भारतात खेचून आणले.

Bob Christo Loves Parveen Babi : बॉलिवूडमध्ये  काही परदेशी कलाकारांनी आपल्या कामांनी वेगळाच ठसा उमटवला आहे. यामध्ये खलनायकी भूमिका साकारणारे कलाकार सिनेरसिकांच्या विशेष लक्षात आहेत. 'मिस्टर इंडिया'मध्ये तस्कराची भूमिका साकारणारे बॉब ख्रिस्टो (Bob Christo) प्रेक्षकांच्या चांगलेच लक्षात आहेत. 90 दशकात बॉलिवूडमध्ये प्रवेश करणाऱ्या बॉब यांची बॉलिवूडमधील एन्ट्रीदेखील एकदम फिल्मी आहे. अभिनेत्री परवीन बाबी (Parveen Babi) यांच्या सौंदर्याने बॉब यांना भारतात खेचून आणले. 

बॉलिवूडमध्ये बॉब ख्रिस्टो यांनी आपल्या खलनायकी भूमिकांनी छाप सोडली होती. बॉब ख्रिस्टो यांचा जन्म ऑस्ट्रेलियातील  सिडनीमध्ये झाला होता. बॉब यांनी आपल्या खास शैलीत हिंदीतले संवाद म्हणत खलनायकी भूमिका रंगवल्या होत्या. 

बॉब यांनी खलनायकी भूमिका साकारल्या तरी सिनेरसिकांनी त्यांच्या अभिनयाला दाद दिली. बॉब ख्रिस्टो हे रंगभूमीवर काम करत होते, त्यावेळी त्यांची भेट हेल्गा यांच्यासोबत झाली. त्यानंतर हे दोघेही विवाहबद्ध झाले. हेल्गा आणि बॉब या दाम्पत्याला तीन मुलं झाली. मात्र, एका कार अपघातात हेल्गा यांचे निधन झाले. त्यानंतरच्या काही वर्षांनी बॉब यांनी नर्गिस सोबत पुन्हा विवाह केला. नर्गिसपासून त्यांना एक मुलगा झाला. 

परवीन बाबीचा फोटो पाहिला अन्...

बॉब ख्रिस्टो यांनी आपल्या एका मुलाखतीत सांगितले होते की,  एका मॅगझीनच्या कव्हर पेजवर परवीन बाबीचा फोटो पाहिला आणि पाहतच राहिलो. त्यानंतर मी परवीन बाबीला भेटण्यासाठी भारतात आलो. मुंबईत आल्यानंतर चर्चगेटजवळ असणाऱ्या एका फिल्म युनिटसोबत भेट झाली. त्यावेळी समजलं की 'द बर्निंग ट्रेन'च्या सेटवर कॅमेरामन परवीन बाबीला भेटणार असल्याची माहिती समजली असल्याचे बॉब यांनी सांगितले.

मेकअप शिवाय असलेल्या परवीनला ओळखलंच नाही...

बॉब यांनी पुढे म्हटले की, या युनिटमधील कॅमेरामनला  परवीन बाबी सोबत ओळख  देणार का असे सांगत असतानाच मागून एका मुलीने आवाज दिला. त्यावेळी माझ्यासमोर परवीन बाबीच उभी होती. पण, मी ओळखू शकलो नाही. मॅगझीनचे कव्हर पेज दाखवत हीच परवीन बाबी असून आपण परवीन बाबी नसल्याचे बॉब यांनी सांगितले. त्यावर परवीन बाबीने आपण शूटिंगशिवाय कधीही मेकअप करत नसल्याचे सांगितले. त्यानंतर बॉब आणि परवीन यांच्यात चांगली मैत्री झाली. या दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची चर्चा सुरू झाली होती. मात्र, त्या चर्चेवर कधीही अधिकृतपणे शिक्कामोर्तब करण्यात आले नाही. 

इंजिनिअरिंग सोडून भारतात...

बॉबने ऑस्ट्रेलियात सिव्हिल इंजिनीअरिंगचे शिक्षण घेतले आणि त्यानंतर तेथे काम सुरू केले. 1974 च्या सुमारास, बॉब व्हिएतनाम सैन्यात अभियांत्रिकी युनिटचे प्रभारी म्हणून सामील झाले. एके दिवशी त्यांची नजर एका मासिकावर पडली आणि त्यात त्यांना परवीन बाबी दिसली.परवीन बाबीच्या सौंदर्याने वेडे झालेल्या बॉब यांनी मुंबई गाठली.  

या दोघांमध्ये चांगली मैत्री झाल्यानंतर दोघांना एकत्रितपणे काम करण्याची संधी मिळाली. काही चित्रपटांमध्ये दोघांच्या महत्वाच्या भूमिका होत्या. बॉब आणि परवीन हे दोघेही चांगले मित्र झाले. 

संजय खान यांनी दिली पहिली संधी

दिग्दर्शक-निर्माता संजय खान यांनी बॉब यांच्यातील अभिनेता हेरला आणि संधी दिली. 1980 मधील 'अब्दुला' या चित्रपटातील भूमिका त्यांना दिली. 

अभिनेते बॉब ख्रिस्टो यांनी 'कुर्बानी' (1980), 'कालिया' (1981), 'नास्तिक' (1983), 'मर्द' (1985), 'मिस्टर इंडिया' (1987), 'रूप की रानी चोरों का राजा'(1993), 'गुमराह' (1993) सारख्या चित्रपटात खलनायकाची भूमिका साकारली. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Sharad Pawar : शिवसेना भाजपपासून वेगळी करण्यासाठी 2014 च्या पाठिंब्याचं वक्तव्यTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा: 8 AM : 13 नोव्हेंबर  2024: ABP MajhaPM Narendra Modi : महाराष्ट्रातील बुथ कार्यकर्त्यांसोबत पंतप्रधान मोदींचा संवादTop 50 : टॉप 50 : बातम्यांचा वेगवान  सुपरफास्ट आढावा:  1 PM : 16 नोव्हेंबर  2024: ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Jhansi Hospital Fire Accident : सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
सरकारी दवाखान्यात 10 बालकं जिवंत जळाली, आठ सापडेनात, अग्रीशमन यंत्रणा बंद; योगी द्वेषाचे राजकारण करत देशभर फिरत आहेत; अग्रितांडवावर विरोधकांनी घेरले
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; 24 वर्षांपूर्वी हवेत लटकून अक्षयनं केलेलं शूट, अगदी तसाच सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये
काय सांगता? चक्क टॉम क्रूझनं खिलाडी कुमारला केलं कॉपी; अक्षयसारखा सेम टू सेम स्टंट 'मिशन इम्पॉसिबल 8'मध्ये?
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
अजितदादांना 'बटेंगे तो कटेंगे' मान्य नसेल तर त्यांनी महायुतीतून बाहेर पडावं; काँग्रेस नेत्याचा सल्ला, भाजपवरही जोरदार हल्लाबोल
Uttar Pradesh : इथं मृत्यूही ओशाळला, जग पाहण्यापूर्वीच जगाचा निरोप; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
इथं मृत्यूही ओशाळला; उत्तर प्रदेशात सरकारी दवाखान्यात अग्नितांडवात 10 नवजात अर्भके जळाली; 39 जणांना खिडकीतून बाहेर काढलं
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
लग्न करुन परतत असताना वाटेतच काळाचा घाला; भीषण अपघातात वधू-वरांसह 7 जणांचा अंत
Vilas Bhumre : महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
महायुतीचे पैठणचे उमेदवार विलास भुमरे चक्कर येऊन कोसळले, हाता-पायाला 4 ठिकाणी फ्रॅक्चर
Sanjay Raut : फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
फडणवीस म्हणाले, मतांचं धर्मयुद्ध लढावं लागणार, आता राऊतांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी...
Nashik West Assembly Constituency : नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
नाशिकमध्ये भाजप-ठाकरे गटात हाणामारी, पोलिसांकडून कारवाईचा बडगा, 30 जणांवर गुन्हे दाखल
×
Embed widget