Bollywood Theme Park Exclusive : भारतीय चित्रपटसृष्टीचा 100 वर्षांचा प्रवास उलगडणार; 'या' मेट्रो स्थानकाखाली उभारलं जाणार 'बॉलिवूड थीम पार्क'!
Bollywood Theme Park : भारतीय चित्रपटसृष्टीचा मागील 100 वर्षांचा प्रवास 2बी मेट्रो लाईन खाली उलगडला जाणार आहे. वांद्रे पश्चिम येथील मेट्रो लाईन खाली 200 कोटी रुपये खर्च करत बॉलीवूड थिम उभारली जाणार आहे.
Bollywood Theme Park : भारतीय चित्रपटसृष्टीचा (Movies) मागील 100 वर्षांचा प्रवास 2बी मेट्रो लाईन खाली उलगडला जाणार आहे. वांद्रे पश्चिम येथील मेट्रो लाईन खाली 200 कोटी रुपये खर्च करत बॉलीवूड थीम (Bollywood Theme Park) उभारली जाणार आहे. मेट्रो लाईन 2 बीच्या खाली ईएसआयसी नगर ते वांद्रे दरम्यान 7 स्टेशन व त्यामधील जवळपास 300 खांब आणि त्यामधील जागे मध्ये एमएमआरडीए मार्फत शिल्प, एलईडी दिवे, डिजिटल आणि अद्यावात तंत्रज्ञानाचा वापर करुन बॉलीवूड थिम साकारुन भारतीय चित्रपटसृष्टीचा गेल्या 100 वर्षांचा इतिहास उलगडून दाखवण्यात येणार आहे.
पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार 'बॉलिवूड थीम पार्क'
बॉलीवूडमधील अनेक नामवंत अभिनेते, अभिनेत्री, कलावंत, लेखक, गायक, चित्रपट निर्माते याच भागात वास्तव्यास असून पाली हिल, कार्टर रोड या परिसरात फिल्म स्टार यांना पहायला येणाऱ्या पर्यटकांची नेहमीच रेलचेल राहते. अशात, हा बॉलीवुड थीम पार्क पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरणार आहे. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून या पार्कची उभारणी करण्यात येत आहे.
'बॉलिवूड थीम पार्क' कसा असेल? (Bollywood Theme Park Details)
एबीपी माझासोबत बॉलिवूड थीम पार्क संदर्भात बोलताना भाजप अध्यक्ष (मुंबई) आशिष शेलार (Ashish Shelar) म्हणाले की,"एमएमआरडीएकडे 'बॉलिवूड थीम पार्क' संदर्भातमी प्रस्ताव मांडला. त्यांच्याकडून तो मान्य केला. साधारण 355 खांसांमध्ये हा पार्क उभा राहिल. ज्यात 6 किलोमीटरपर्यंत हे काम होणार आहे. बॉलीवूडमधील 1913 ते 2023 या मोठ्या कालखंडाचा विचार करुन त्या कालखंडातील महत्वाच्या घटना, सिनेमा, त्यातील स्टार आणि प्रसंगावर या थीमची रचना करण्यात येणार आहे".
आशिष शेलार पुढे म्हणाले,"दादासाहेब फाळकेंनी (Dadasaheb Phalke) ज्या काळात अधिराज्य गाजवलं तो काळ, त्यानंतर 1913 ते 1939 पर्यंत, त्यानंतर 1970 पर्यंत आणि नंतर 2024 पर्यंत फिल्म इंडस्ट्रीत योगदान असलेले स्टुडिओ, दादासाहेब फाळके पुरस्कार विजेते या सगळ्यांचा यामध्ये समावेश असेल. सोबतच ४ प्रमोशनल बेज्ज ठेवण्यात आले आहेत. खर्च मोठा होणार आहे. त्यात एमएमआरडीएकडून उत्पन्नाचे स्त्रोतदेखील निर्माण केले जातील. आंतरराष्ट्रीय स्तरावरचं सौंदर्य निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. प्रोडक्शन हाऊसेस, कॅफे, प्रमोशनल सेंटरचीदेखील उभारणी होताना दिसेल".
मुंबईतील येलो लाईन मेट्रो (2B)या मार्गावर 20 स्थानके आहेत. ही मुंबईतील सर्वात लांब मेट्रो मार्गांपैकी एक आहे. आता याच मार्गावर 'बॉलिवूड थीम पार्क' उभारलं जाणार आहे.
संबंधित बातम्या