Drug Case : आधी समन्स न मिळाल्याचा दावा; मात्र एनसीबीच्या संतापानंतर समन्स मिळाल्याची रकुलची कबुली
रकुल प्रीत सिंहच्या वकीलांनी तिला कोणतंही समन्स मिळलं नसल्याचं सांगितलं होतं. रकुलकडून करण्यात येणाऱ्या या दाव्यानंतर एनसीबीकडून मात्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मात्र समन्स मिळाल्याचं अमान्य करणाऱ्या रकुलकडून आपल्याला समन्स मिळाल्याचं कबुल करण्यात आलं आहे.
मुंबई : दीपिका, सारा, श्रद्धा आणि रकुल या अभिनेत्रींची नावं एनसीबीसमोर आल्यानंतर हलकल्लोळ उडाला आहे. यूथ आयकॉन असणाऱ्या या अभिनेत्रींची नावं अशा पद्धतीने येणं हे सगळ्यांनाच धक्का देणारं आहे. पण त्याहीपेक्षा धक्कादायक बाब आणखी एक घडली आहे. ती अशी की दीपिका, श्रद्धा, सारा यांना एनसीबीचं समन्स मिळालं आहे. दिलेल्या तारखेला या अभिनेत्री चौकशीसाठी येणार आहेत. अपवाद रकुलचा ठरला होता.
रकुल प्रीत सिंहच्या वकीलांनी तिला कोणतंही समन्स मिळलं नसल्याचं सांगितलं होतं. रकुलकडून करण्यात येणाऱ्या या दाव्यानंतर एनसीबीकडून मात्र संताप व्यक्त करण्यात आला. त्यानंतर मात्र समन्स मिळाल्याचं अमान्य करणाऱ्या रकुलकडून आपल्याला समन्स मिळाल्याचं कबुल करण्यात आलं आहे. तसेच ती चौकशीसाठी हजर राहणार असल्याचंही सांगण्यात आलं आहे.
दे दे प्यार दे, यारीयां अशा सिनेमांसह तेलुगु, तमिळ सिनेमांमधून झळकलेली स्टार अभिनेत्री रकुल प्रीत सिंहवर मात्र एनसीबी भडकली आहे. कारण, एनसीबीने पाठवलेलं समन आपल्याला मिळालं नाही असा दावा रकुलच्या वकिलांनी केला होता. तो न मिळाल्याने रकुल गुरुवारी चौकशीशाठी उपस्थित राहू शकणार नाही असा युक्तीवादगी त्यांच्यामार्फत करण्यात आला होता. रकुलकडून करण्यात येणाऱ्या या दाव्यावर एनसीबी भडकली. कारण, एनसीबीने रकुलला हरप्रकारे समन्स पाठवंलं होतं. यात तिला इमेल केला होता. तिच्या पीआर टीमला, पर्सनल मॅनेजरलाही याची कॉपी एनसीबीकडून पाठवण्यात आली होती. हे समन्स पाठवल्याबद्दल रकुलशी वारंवार संपर्क साधण्याचा प्रयत्न एनसीबीच्या टीमने केला पण तिच्याशी संपर्क न झाल्याने एनसीबीकडून संताप व्यक्त करण्यात आला.
रकुलला समन्स पाठवण्यात आलं असून तिला चौकशीला उपस्थित रहावं लागेल. तिला आम्ही विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं द्यावी लागतील. तिला अजिबात आमच्यापासून काही लपवून चालणार नाही असं एनसीबीने निक्षून सांगितलं होतं. अखेर अनेक युक्तीवाद केल्यानंतर आता मात्र रकुलच्या लीगल टीमकडून तिला समन्स मिळाल्याचं कबुल करण्यात आलं आहे. परंतु, रकुलच्या या वागण्यामुळे तिच्यावरची शंका आणखी गडद झाल्याची चर्चा या वर्तुळात आहे.
गेल्या काही दिवसांपासून सुशांतच्या मृत्यूनंतर त्याच्या तपासाने वेगवेगळी वळणं घेतली आहेत. यात सुरुवातीला नेपोटिझमपासून सुरू झालेला प्रवास आता अमली पदार्थ सेवनापर्यंत आला आहे. यात बड्या बड्या लोकांची नावं असल्याने हा सगळा मामला हाय प्रोफाईल बनला आहे. यात एकिकडे रकुल प्रीत सिंग चौकशी टाळताना दिसत असली तरी दीपिका मात्र यात कबुलानामा देण्याच्या विचारात असल्याच्याही बातम्या येताहेत.
महत्त्वाच्या बातम्या :