Madhuri Dixit Anamika Trailer Out : धक-धक गर्ल माधुरी दीक्षित करणार ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण, अनामिकातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
माधुरी दीक्षित करण जौहरच्या अनामिका चित्रपटातून येणार प्रेक्षकांच्या भेटीला
Madhuri Dixit Anamika Trailer Out : बॉलिवूडची धक-धक गर्ल माधुरी दीक्षित करण जोहरच्या कलंक सिनेमातून प्रेक्षकांना स्क्रीनवर शेवटची दिसली होती. त्यानंतर आता पुन्हा एकदा माधुरी करण जोहरच्या चित्रपटातून प्रेक्षकांच्याभेटीला येणार आहे. गेले अनेक दिवस अनामिका सिनेमा कधी प्रदर्शित होणार याची चर्चा चाहत्यांमध्ये होत होती. पण आता या चित्रपटाचा ट्रेलर प्रेक्षकांच्या भेटीला आल्याने सिनेमाबाबतची उत्सुकता आणखी वाढली आहे. हा चित्रपट नेटफ्लिक्सवर प्रदर्शित होणार आहे.
माधुरीने चित्रपटाचा ट्रेलर तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरदेखील शेअर केला आहे. ट्रेलर शेअक तिने लिहिले होते, 'तु्म्ही तयार आहात ना अनामिकाला भेटायला?
#FindingAnamika, coming soon on Netflix!'
या चित्रपटाची कथा अचानक गायब होणाऱ्या एक सुपरस्टार, पत्नी आणि आईच्या आयुष्यावर आधारित आहे. अनामिका अचानक गायब झाल्याने पोलिस आणि तिचे चाहते विचारपूस करत असतात. पण तिच्या गायब होण्याचं कारण हे तिच्या आयुष्यातील चढ-उतार आहेत याचाही खुलासा चित्रपटात केलेला आहे. चित्रपटाचा ट्रेलर तर प्रेक्षकांना चांगलाचभावला आहे. त्यामुळे चित्रपटदेखील प्रेक्षकांना नक्कीच आवडेल.
करण जोहर, अपूर्व मेहता, सोमेन मिश्रा हे या चित्रपटाचे निर्माते आहेत. चित्रपटाचे लेखन केले आहे श्री राव आणि निशा मेहतांनी. चित्रपटात माधुरी दीक्षित व्यतिरिक्त संजय कपूर, मानव कौल, लक्षवीर सरन, सुहासिनी मुळे आणि मुस्कार जाफरी हे कलाकारदेखील दिसून येणार आहेत. पहिल्या ट्रेलरमध्ये फक्त माधुरी दीक्षितला फोकस करण्यात आले होते. माधुरीचे सौंदर्य पुन्हा एकदा चाहत्यांना भूरळ घालणार आहे. फायंडिंग अनामिकात माधुरी दिक्षितसोबत संजय कपूर आणि मानव कौलच्या देखील महत्तवपूर्ण भूमिका आहेत. अनामिकाच्या आयुष्यातील अनेक घडामोडी चित्रपटातून उलगडण्याचा प्रयत्न केला आहे.
नेटफ्लिक्सवर लवकरच प्रदर्शित होणारे चित्रपट
धमाका, फाइंडिंग अनामिका, प्लॅन अ प्लॅन बी, मिनाक्षी सुंदरेश्वर, हीरामंदी या चित्रपटांचा यात समावेश असणार आहे. माधुरी दीक्षित, संजय लिला भन्साळी , विशाल भारद्वाज, कार्तिक आर्यन अशा बड्या कलाकारांचा यात समावेश आहे.