Bhumi Pednekar Birthday : जेव्हा भूमी पेडणेकरला ॲक्टिंग स्कूलमधून बाहेर काढण्यात आलं होतं, काय होतं नेमकं कारण?
Bhumi Pednekar Birthday Special : भूमीने नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आहेl. भूमी पेडणेकरचा आज वाढदिवस असून तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या.
Bhumi Pednekar Struggle Story : अभिनेत्री भूमी पेडणेकर (Actress Bhumi Pednekar) हिचा आज वाढदिवस आहे. बॉलिवूडमधील आघाडीच्या अभिनेत्रींपैकी एक म्हणजे भूमी पेडणेकर. भूमी पेडणेकरने पहिल्याच चित्रपटापासून प्रेक्षकांच्या मनावर वेगळी छाप पाडली आहे. 'दम लगाकै हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणाऱ्या भूमीने आपल्या अभिनय कौशल्याच्या जोरावर स्वत:ची वेगळी ओळख निर्माण केली आहे. भूमीने नेहमीच वेगळ्या विषयांना हात घालत विविध प्रकारच्या भूमिका साकारल्या आणि प्रत्येक भूमिकेला न्याय दिला आहे. भूमी पेडणेकरचा आज वाढदिवस असून तिच्या आतापर्यंतच्या प्रवासाबद्दल जाणून घ्या.
भूमी पेडणेकरची वैयक्तिक माहिती
भूमी पेडणेकर हिचा जन्म 18 जुलै 1989 रोजी झाला. भूमीचा जन्म मुंबईत झाला. भूमीचे वडील सतीश पेडणेकर राजकारणी होते. भूमीने मुंबईतील आर्य विद्यामंदिरमधून शालेय शिक्षण केलं. त्यानंतर तिने मुंबईतच कॉमर्समधून पदवी शिक्षण पूर्ण केलं. यानंतर तिने यशराज फिल्ममध्ये सहा वर्षे कास्टिंग डायरेक्टर म्हणून काम केलं.
लहान वयातच वडिलांचं छत्र हरपलं
लहान वयातच भूमीवरुन वडिलांचं छत्र हरपलं. भूमीचे वडील सतीश पेडणेकर महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री होते. भूमी जेव्हा 18 वर्षांची होती तेव्हा तिच्या वडिलांचं निधन झालं. सतीश पेडणेकर यांचं तोंडाच्या कर्करोगानं निधन झालं. वडिलांच्या निधनानंतर भूमीच्या कुटुंबाला खूप संघर्ष करावा लागला.
भूमीला ॲक्टिंग स्कूलमधून हाकललं
आज बॉलिवूडमधील दर्जेदार कलाकारांमधील एक असणाऱ्या भूमीला एका वेळी भूमीला ॲक्टिंग क्लासमधून हाकलण्यात आलं होतं. भूमीला लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती. तिची आवड पाहून तिच्या पालकांनी शैक्षणिक कर्ज घेतलं आणि भूमीला एका चांगल्या अभिनय शाळेत प्रवेश मिळवून दिला. अभिनयाची इतकी आवड असूनही भूमीला एकदा अभिनय शाळेतून काढून टाकण्यात आलं होतं. ॲक्टिंग स्कूलमधील भूमीची उपस्थिती खूपच कमी होती, त्यामुळे तिला स्कूल काढून टाकण्यात आलं होतं. यानंतर तिने यशराज फिल्म्समध्ये असिस्टंट डायरेक्टर म्हणून काम करण्यास सुरुवात केली आणि तिचं शैक्षणिक कर्ज फेडलं.
पहिल्या चित्रपटासाठी 12 किलो वजन वाढवलं
भूमी पेडणेकरने 'दम लगाके हैशा' चित्रपटातून बॉलिवूडमध्ये डेब्यू केला. भूमी पेडणेकरने या तिच्या पहिल्या चित्रपटासाठी सुमारे 12 किलो वजन वाढवलं होतं. या चित्रपटानंतर तिने स्वत:ला फिट ठेवण्यासाठी खूप कष्ट घेतले आणि वर्कआउटसह डाएट फॉलो करून सुमारे 33 किलो वजन कमी केलं. चित्रपटानंतर वर्षभरातच भूमी फॅट टू फिट झाली होती.
फॅशन जगतात स्वतःची वेगळी ओळख
अभिनेत्री भूमी पेडणेकरने बॉलीवूड तसेच फॅशन जगतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली आहे. पण एक वेळ अशी होती जेव्हा विशिष्ट ब्यूटी सँन्डर्डमध्ये बसण्यासाठी तिच्यावर दबाव होता. यानंतर तिला आत्मविश्वास मिळवण्यासाठी संघर्ष करावा लागला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :