Bollywood Actress : परिणीती चोप्रा ते सारा अली खान; बॉलिवूड अभिनेत्री अभिनयासह शिक्षणातही अव्वल
Actress : बॉलिवूड अभिनेत्री आज आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असल्या तरी शिक्षणातही त्या अव्वल आहेत.
Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्री (Bollywood Actress) आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवत असतात. आपल्या सौंदर्याने त्या भुरळ पाडतात. बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्री अभिनय, नृत्य आणि सौंदर्याने प्रेक्षकांच्या मनावर छाप पाडत आहेत. पण या अभिनेत्री शिक्षणातही अव्वल आहेत. परिणीती चोप्रा (Parineeti Chopra) ते सारा अली खान (Sara Ali Khan) यांचा यात समावेश आहे.
परिणीती चोप्रा (Parineeti Chopra)
परिणीती चोप्रा बॉलिवूडची आघाडीची अभिनेत्री आहे. अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाची जादू दाखवली आहे. अभिनयक्षेत्रात येण्याआधी परिणीतीने शिक्षण पूर्ण केलं आहे. मॅनचेस्टर बिजनेस स्कूलमधून तिने बिझनेस, फायनान्स आणि इकोनॉमिक्समध्ये पदवी मिळवली आहे. बारावीत असताना तिने अर्थशास्त्र विषयात टॉप केलं होतं.
अमीषा पटेल (Ameesha Patel)
अमीषा पटेलचा 'गदर 2' (Gadar 2) हा सिनेमा काही दिवसांपूर्वी प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. बॉक्स ऑफिसवर हा सिनेमा सुपरहिट ठरला. अभिनयासह अमीषा अभ्यासातही हुशार होती. मुंबईतील कॅथेड्रल आणि जॉन कॉनन शाळेतून तिने शालेय शिक्षण घेतलं. त्यानंतर बायोजेनेटिक इंजिनियरिंग महाविद्यालयातून तिने पुढील शिक्षण घेतलं. त्यानंतर ती कॉमर्समध्ये शिफ्ट झाली.
सोहा अली खान (Soha Ali Khan)
सोहा अली खानने नवी दिल्लीतील ब्रिटिश शाळेतून शालेय शिक्षण पूर्ण केलं आहे. त्यानंतर ऑक्सफोर्डमधून तिने पुढील शिक्षण घेतलं. तसेच लंडन स्कूल ऑफ इकोनॉमिक्स अॅन्ड पॉलिटिकल सायन्समधून तिने मास्टर पूर्ण केलं.
तापसी पन्नू (Taapsee Pannu)
शाहरुख खानच्या (Shah Rukh Khan) 'डंकी' (Dunky) या सिनेमात तापसी पन्नू नुकतीच दिसून आली आहे. अनेक सिनेमांत तिने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली आहेत. गुरु तेग इंस्टीट्यूट ऑफ टेक्नोलॉजीमधून कंप्यूटर सायंसमध्ये इंजिनियरिंगमध्ये शिक्षण घेतलं आहे.
View this post on Instagram
सारा अली खान (Sara Ali Khan)
सारा अली खान ही लोकप्रिय अभिनेत्री असण्यासोबत अभ्यासातही हुशार आहे. सारा अली खानच्या कुटुंबात शिक्षणाला खूप महत्त्व आहे. साराने 2016 मध्ये कोलंबिया यूनिव्हर्सिटीमधून इतिहास आणि राज्यशास्त्र या विषयात शिक्षण पूर्ण केलं आहे.
संबंधित बातम्या