एक्स्प्लोर

Aishwarya Rai Bachchan: ऐश्वर्या राय-बच्चनला सिन्नर तहसीलदारांनी बजावली नोटीस; नेमकं प्रकरण काय?

ऐश्वर्या राय-बच्चनसह (Aishwarya Rai Bachchan) 1200 मालमत्ताधारकांना सिन्नरच्या तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे.

Aishwarya Rai Bachchan : अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनला (Aishwarya Rai Bachchan) सिन्नर तहसीलदारांनी नोटीस बजावली आहे. थकीत अकृषक कराचा भरणा करण्यासाठी अभिनेत्री ऐश्वर्या राय-बच्चनसह 1200 मालमत्ताधारकांना सिन्नरच्या तहसीलदारांनी ही नोटीस बजावली आहे. सिन्नरमधील जमिनीचा 22 हजारांचा कर थकवल्याप्रकरणी ऐश्वर्याला ही नोटीस पाठवण्यात आली आहे. 

ऐश्वर्या रायची सिन्नर तालुक्याच्या पश्चिम पट्ट्यात ठाणगाव जवळीला आडवाडीच्या डोंगराळ भागात एक हेक्टर 22 आर जमीन असल्याची माहिती मिळत आहे. याच जमिनीच्या एका वर्षाच्या कराचे 21 हजार 970 रुपये थकल्याने ऐश्वर्याला नोटीस पाठण्यात आली आहे. ऐश्वर्यासोबत 1200 इतर मालमत्ता धारकांना देखील ही नोटीस पाठण्यात आली आहे. मार्च अखेरीस वसुलीचे उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी महसूल विभागाकडून ही कारवाई करण्यात आली आहे. 

सिन्नरच्या परिसरात पवन ऊर्जा निर्मिती क्षेत्रातील सुचल्यान कंपनीत अनेक नेते अभिनेत्यांची गुंतवणूक असल्याची चर्चा आहे. सिन्नर तहसीलदार आकर्षक मालमत्ता धारकांकडून वर्षाखाली 1.11 कोटींचा महसूल अपेक्षित असून पैकी 65 लाखांची वसुली बाकी आहे. मार्च अखेर वसुलीचे उद्दिष्ट असल्याने महसूल विभागाने हे पाऊल उचलले आहे.

ऐश्वर्या रायचे चित्रपट 

ऐश्वर्या राय ही विविध चित्रपटांमधून तसेच जाहिरातींमधून प्रेक्षकांच्या भेटीस येत असते. काही महिन्यांपूर्वी रिलीज झालेल्या पोन्नियिन सेलवन या चित्रपटातून ऐश्वर्या प्रेक्षकांच्या भेटीस आली. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. हिंदी, तामिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड या भाषांमध्ये हा चित्रपट रिलीज झाला होता. मणिरत्नम यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं आहे. लवकरच या चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे.  देवदास,हम दिल दे चुके सनम, धूम 2 या हिट चित्रपटांमध्ये देखील ऐश्वर्यानं काम केलं आहे. 

ऐश्वर्याचा पोन्नियिन सेलवन- 2 हा चित्रपट 28 एप्रिल 2023 रोजी प्रदर्शित होणार आहे.

View this post on Instagram
 
A post shared by AishwaryaRaiBachchan (@aishwaryaraibachchan_arb)

वाचा इतर महत्वाच्या बातम्या:

Aishwarya Rai Bachchan: आराध्यासोबत लिप किसचा फोटो शेअर केल्यानं ऐश्वर्या ट्रोल; नेटकऱ्यांनी केल्या कमेंट्स

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Shyam Rajput Nashik : अहिराणी भाषेत राजपूत यांचं मतदारांना आवाहन; सीमा हिरेंसाठी मैदानातAjit Pawar Modi Sabha :  मुंबईत मोदींची सभा, अजित पवारांची पाठ?ABP Majha Headlines :  9 AM : 14 नोव्हेंबर  2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्सBaba Siddique Case : बाबा सिद्दीकी प्रकरणात आरोपी अर्धातास लिलावती रूग्णालयाबाहेर!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Harishchandra Chavan : निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
निवडणुकीच्या रणधुमाळीत भाजपसाठी वाईट बातमी, दिंडोरीचे माजी खासदार हरिश्चंद्र चव्हाण यांचे निधन
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
उद्धव ठाकरेंच्या डोक्यातली मनुस्मृती कायम; आदिवासी सरकारी अधिकाऱ्याला म्हणाले, 'माझं युरीन पॉटही तपासा'; शिंदे गटाची टीका
Kailas Patil : कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
कैलास पाटील उध्दव ठाकरेंवरील निष्ठेमुळे सुरतच्या मार्गावरुन परतल्याची स्टोरी फेक? जुन्या सहकाऱ्याचा खळबळजनक दावा
Ind vs Aus: गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
गौतम गंभीरचा स्वभावच संतापी; रिकी पाँटिंगचे प्रत्युत्तर, भारत-ऑस्ट्रेलिया मालिकेआधी जुंपली
Dhananjay Munde: पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
पंकजाताईंनी मोठं मन केलं म्हणून मी आज तुमच्यासमोर; परळीतील सभेत धनंजय मुंडेंचं वक्तव्य
MNS Sandeep Deshpande: मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
मिलिंद देवरांचे वडील मराठी माणसांना म्हणायचे, 'मुंबई तुमची भांडी घासा आमची'; मनसेच्या संदीप देशपाडेंनी वरळीत भावनिक कार्ड बाहेर काढलं
Pankaja Munde: माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
माझं राजकारण वेगळं, महाराष्ट्रात 'बटेंगे तो कटेंगे'ची गरज नाही; पंकजा मुंडेंचं रोखठोक भाष्य
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
विधानसभेची खडाजंगी: लातूरमध्ये शहरमध्ये अमित देशमुखांपुढे अर्चना पाटील चाकूरकरांचं आव्हान, कोण मारणार बाजी?  
Embed widget