एक्स्प्लोर

सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट 'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक रिलीज; चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' 24 जुलै 2020 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाचं टायटल ट्रॅक यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं.

नवी दिल्ली : अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर संपूर्ण बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे. सुशांतच्या अचानक एक्झिटनंतर त्याचे फॅन्स सतत सोशल मीडियावर त्याच्याशी संबंधित पोस्ट करत असतात. ज्या सतत व्हायरलही होतात. सुशांतला शेवटी छिछोरे या चित्रपटातून पाहण्यात आलं होतं. सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' मोठ्या पडद्यावर पाहण्याची चाहत्यांची इच्छा होती. परंतु, कोरोनामुळे हा चित्रपट डिस्ने प्लस आणि हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. अशातच सुशांतच्या या चित्रपटाचं टायटल ट्रॅक यूट्यूबवर रिलीज करण्यात आलं.

अभिनेता सुशांत सिंह राजपूतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचारा' 24 जुलै 2020 रोजी रिलीज करण्यात येणार आहे. या चित्रपटाला ओटीटी प्लॅटफॉर्म डिस्ने प्लस आणि हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वी या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला. ट्रेलर यूट्यूबवर रिलीज केल्यानंतर या ट्रेलरने फक्त बॉलिवूडच्याच नाहीतर 'एवेंजर्स एन्डगेम'सारख्या हॉलिवूडपटाच्या ट्रेलरचाही रेकॉर्ड मोडीत काढला. सुशांतच्या चित्रपटाच्या टीझरने भारतात सर्वात कमी वेळात सर्वाधिक वेळा पाहण्यात आलेल्या ट्रेलरचा रेकॉर्ड आपल्या नावे केला. तसेच 17 तासांपूर्वी रिलीज करण्यात आलेल्या 'दिल बेचारा' या टायटल ट्रॅक आतापर्यंत 16 मिलियन वेळा पाहण्यात आलं आहे.

सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'च्या ट्रेलरचा रेकॉर्ड; 'एवेंजर्स एंडगेम'लाही टाकलं मागे

सुशांतच्या हे गाणं 'सोनी म्युजिक इंडिया'ने आपल्या ऑफिशिअल यूट्यूब अकाउंटवरून शेअर केलं आहे. मीडिया रिपोर्टनुसार, यूट्यूबवर या गाण्याला आतापर्यंत 3.3 मिलियन लाइक्स मिळाले आहेत. चित्रपट 'दिल बेचारा'च्या गाण्यावर त्यांचे फॅन्स कमेंट करत सुशांतच्या परफॉर्मंन्सचं कौतुक करत आहेत. बॉलिवूड दिग्गज ए. आर. रहेमान या गण्यावर कमेंट करत प्रोत्साहन दिलं आहे.

सुशांत सिंह राजपूतचा चित्रपट 'दिल बेचारा'चा टायटल ट्रॅक रिलीज; चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

सध्या 'दिल बेचारा'चं टायटल ट्रॅक यूट्यूबवर नंबर एकवर ट्रेंड करत आहे. तसेच 4 दिवसांपूर्वी रिलीज करण्यात आलेल्या चित्रपटाचा टीझर बातमी लिहिपर्यंत नंबर दोनवर ट्रेंड करत होता. आतापर्यंत हा ट्रेलर 64 मिलियन लोकांनी पाहिला आहे.

पाहा ट्रेलर : 

दरम्यान, सुशांत सिंह राजपूतने मुंबईतील आपल्या राहत्या घरी 14 जून रोजी गळफास घेत आत्महत्या केली होती. त्यानंतर त्याच्या आत्महत्येबाबत अनेक तर्क लावले जात आहेत. तसंच या प्रकरणात आतापर्यंत अनेकांची चौकशी केली आहे. सोबतच त्याच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमधील नेपोटिझमवर अनेक कलाकारांनी आपली भूमिका मांडली आहे. सुशांतला शेवटी चित्रपट छिछोरे मध्ये पाहण्यात आलं होतं. तर सुशांतचा शेवटचा चित्रपट 'दिल बेचेरा' 24 जुलै 2020 रोजी ओटीटी प्लॅटफॉर्मवर डिस्ने प्लस आणि हॉटस्टारवर रिलीज करण्यात येणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या : 

काय सांगता हुबेहुब सुशांत सिंह राजपूत?; सोशल मीडियावर 'या' तरूणाचे फोटो व्हायरल

Dil Bechara Trailer | सुशांत सिंह राजपूतच्या 'दिल बेचारा'चा ट्रेलर प्रदर्शित

सुशांत सिंह आत्महत्या प्रकरणाला नवं वळण; आता गळफासाच्या कपड्याचा तपास

महत्त्वाच्या बातम्या

Shraddha Kapoors Eetha: श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
श्रद्धा कपूरच्या 'ईठा' सिनेमाच्या रिलीजची डेट बदलली; ऑगस्ट नाही तर, 'या' महिन्यात होणार रिलीज, तारीख आली समोर
Prakash Raj on SIR: अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
अभिनेता प्रकाश राज यांचा धक्कादायक दावा; म्हणाले, 'SIR प्रक्रियेनंतर मतदार यादीतून माझं नाव हटवलं'
Usha Chavan Dhankawadi Pune Land Dispute Case: बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
बळजबरी करतायत, राक्षसांचं राज्य असल्यासारखं वाटतंय...; धनकवडी जमीन प्रकरणावरुन ज्येष्ठ अभिनेत्री उषा चव्हाणांकडून सरकारवर ताशेरे
Prakash Raj on Students protest: पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...
पुन्हा हिंसा! विद्यार्थ्यांना काठ्यांनी फोडलं, अश्रुधुराच्या नळकांड्याही सोडल्या; साऊथ कलाकाराचा संताप, म्हणाला...

व्हिडीओ

Rahul Gandhi Amit Shah Special Report : संसदेच्या अधिवेशनात विद्यार्थ्यांच्या मुद्यावरुन घमासान
Manoj Jarange Patil Defender Car : 2 कोटींची आलिशान डिफेंडर गाडी कोणाची? मनोज जरांगे काय म्हणाले...
Manoj Jarange Patil Sangli : मराठा आमदार-खासदारांचे फोन; गुपचूप पाठिंबा असल्याचा जरांगेंचा दावा
Manoj Jarange On Maratha Protest: मराठा समाजाचा पुन्हा एकदा मुंबईकडे कूच करण्याचा विचार; मनोज जरांगे काय काय म्हणाले?
Parbhani Police on MD case : अमली पदार्थाचं जाळं भेदलं, मराठवाड्यात मोठं रॅकेट उद्ध्वस्त

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
शासकीय वाहनांसाठी VIP नंबर घेण्यावर अखेर बंदी; अर्थ खात्याचा आदेश जारी, मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांचे कान टोचले
Navi Mumbbai : 15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
15 लाखांची लाच मागितली, आठ लाख स्वीकारले; GST उपायुक्तावर गुन्हा दाखल
Gatari Amavasya News : 'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
'जास्त गटार-बिटारात लोळू नका'; गटारीच्या शुभेच्छा देत शिंदेंच्या मंत्र्यांचा कार्यकर्त्यांना अजब सल्ला
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
तब्बल 98 लाख रुपयांच्या बनावट नोटांचा साठा जप्त; एकाला अटक, 30 लाखांच्या बदल्यात 1 कोटींचा भाव
Bharat Gogawale : रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
रायगडच्या पालकमंत्रिपदी भरत गोगावलेंची बाजी? आजच नाव जाहीर होणार, गोगावलेंचा मोठा दावा
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
तुकाराम मुंढेंचा मोर्चा बस स्थानकांकडे; संभाजीनगर जिल्ह्यात FDA ची कारवाई, सिल्लोडमधील कँटीन सील
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
पायलट नशेत होता, एअर इंडियाच्या दिल्ली-फुकेट विमानातील कॅप्टन इन कमांडची दुसरी डोप टेस्टही पॉझिटीव्ह
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
देवेंद्र फडणवीसांच्या ड्रीम प्रोजेक्टला सुब्रमण्यम स्वामींचा विरोध; म्हणाले, मी हात जोडून नमस्कार करणारा नाही
Embed widget