Sonu Sood Video : सोनू सूदने पुन्हा जिंकलं चाहत्यांचं हृदय! लक्झरी कार्ससोडून रेल्वेने केला प्रवास, पाहा व्हिडीओ..
Sonu Sood : कोरोना काळात केलेल्या मदत कार्यामुळे बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आता लोकांचा ‘मसीहा’ बनला आहे. झगमगाटी विश्वात राहून देखील सोनू सूद खूप साधं आयुष्य जगतो.
Sonu Sood : कोरोना काळात केलेल्या मदत कार्यामुळे बॉलिवूड (Bollywood) अभिनेता सोनू सूद (Sonu Sood) आता लोकांचा ‘मसीहा’ बनला आहे. झगमगाटी विश्वात राहून देखील सोनू सूद खूप साधं आयुष्य जगतो. कोरोनाचा आवेग आता कमी झाला असला, तरी सोनूचं मदत कार्य अद्याप थांबलेलं नाही. आजही तो प्रत्येकाच्या मदतीला धावून जातो. अभिनेता त्याच्या सोशल मीडिया पेजवर मजेशीर व्हिडीओ देखील शेअर करत असतो. नुकतीच सोनू सूदने रेल्वे सफर केली आहे. याचा व्हिडीओ त्याने सोशल मीडिया पेजवर शेअर केला आहे.
सोनू सूदने (Sonu Sood Video) आपल्या या व्हिडीओमधून स्टेशनवरचे आयुष्य दाखवले आहे. संघर्षाच्या दिवसात त्याने देखील ट्रेनने खूप प्रवास केला होता. सोनू म्हणतो की, इथले जीवन जसे आहे, तसे इतर कुठेच नाही. या व्हिडीओ तो कधी प्लॅटफॉर्मच्या बाकड्यावर झोपलेला, तर कधी नळाचे पाणी पिताना दिसतो आहे.
पाहा व्हिडीओ :
व्हिडीओच्या सुरुवातीला तो रेल्वे स्टेशनवर असलेल्या बाकड्यावर झोपलेला दिसतो आणि व्हिडीओ बनवणाऱ्या व्यक्तीला म्हणतो, तुम्ही मला इथेही त्रास देत आहात. स्टेशनवरही कुणी शांत झोपू देत नाही. पण, एक गोष्ट खरं सांगतो, जे स्टेशनचं आयुष्य आहे, ते इतर कुठेही नाही. आम्ही सध्या बोईसरला उभे आहोत, रात्रीचे 10 वाजले आहेत, शूटिंगचे पॅकअप झाले आहे. चला तर, मग ट्रेनचा प्रवास करूया, असं म्हणत तो ट्रेनमध्ये चढतो.
यानंतर तो ट्रेनमधून प्रवास करताना दिसतो. व्हिडीओमध्ये सोनू स्टेशनवर नळाचे पाणी पिताना दिसत आहे. तो म्हणतो, 'हे जे पाणी आजे ना, जगातील कोणतीही बिसलेरी बाटली किंवा मिनरल वॉटरशी स्पर्धा करू शकत नाही. पूर्णपणे सुपर हेल्दी..’
पुन्हा एकदा जिंकलं चाहत्यांचं हृदय
अभिनेता सोनू सूदचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच चर्चेत आला आहे. त्याची ही साधी स्टाईल लोकांना खूप आवडली आहे. एका युजरने कमेंट करत लिहिले की, ‘तुम्ही इतके साधे व्यक्ती आहात की, मी तुम्हाला अशा प्रकारे प्लॅटफॉर्मवर पाहिले, तर मी गोंधळून जाईल की, तुम्ही आहात का तुमच्यासारखं आणखी कोणीतरी.’ तर, आणखी एका चाहत्याने लिहिले की, ‘एकच तर हृदय आहे सर, तुम्ही किती वेळा जिंकाल.’
संबंधित बातम्या