(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Shahid Kapoor : काय...! शाहिदच्या वरळीतल्या घराचं महिन्याला घेतो इतके लाख रुपये भाडं? किंमत ऐकून तुम्हीही व्हाल थक्क
Shahid Kapoor : शाहिद कपूरने त्याचं वरळीतलं घर भाड्याने दिलं असून त्याच्या या घराच्या महिन्याच्या भाड्याची किंमत ही काही लाखांमध्ये आहे.
Shahid Kapoor : अभिनेता शाहिद कपूर (Shahid Kapoor) याने अलिकडेच वरळीमध्ये आलिशान घर घेतलं होतं. आता शाहिदने त्याचं हेच घर भाड्याने दिलं असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. SquareYards ने प्रॉपर्टी रजिस्ट्रेशन पेपर्सच्या आधारे दिलेल्या माहितीनुसार, शाहिद कपूरने पुढच्या पाच वर्षांसाठी हे घर भाड्याने दिलं आहे. इतकच नव्हे तर पाच वर्षांनी पुन्हा या घराच्या भाड्याच्या किंमतीमध्ये आणखी वाढ होईल, असंही सांगण्यात येत आहे.
शाहिदने त्याचं हे घर डी'डेकोर होम फॅब्रिक्सचे (D'Decor Home Fabrics) वरिष्ठ अधिकारी दीपन भूपतानी यांना भाड्याने दिलं असल्याची माहिती सध्या समोर आलेली आहे. तसेच या घराच्या भाड्यासाठी जवळपास 1 कोटी 23 लाख रुपयांचं डिपॉझिट देण्यात आलं आहे. SquareYards ने म्हटलं की, हा करार नोव्हेंबर 2024 मध्ये नोंदणीकृत करण्यात आला आहे. तसेच 60 महिन्यांसाठी म्हणजे पाच वर्षांच्या कालावधीसाठी हा करार करण्यात आला आहे.
शाहिदच्या घराचं महिन्याचं भाडं
याच करारानुसार, या घराचं महिन्याचं भाडं सरुवातीला 20.5 लाख रुपये इतकं असेल. पण जेव्हा पाच वर्षांची मुदत संपेल त्यावेळी हे भाडं 23.98 लाख रुपये इतकं होईल. शाहिदने काही दिवसांपूर्वी त्याच्या या घरातले फोटोही शेअर केले होते. पण घर भाड्याने देण्यावर शाहिदने अद्यापही कोणतंही अधिकृत भाष्य केललं नाहीये.
शाहिदने त्याचं हे घर जवळपास 60 कोटी रुपयांना खरेदी केलं होतं. त्यानंतर आता शाहीदने त्याचं हे भाड्याने दिलं आहे. सध्या मुंबईतील अनेक बॉलिवूड कलाकारांनी त्यांची घरं भाड्याने दिली आहेत. त्यांच्या या आलिशान घराचे भाडं हे महिन्याला काही लाखांमध्ये असतं.
बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता शाहिद कपूरनं (Shahid Kapoor) मीरा राजपूतसोबत (Mira Rajput) 2015 मध्ये लग्नगाठ बांधली. शाहिद आणि मीरा यांच्या सोशल मीडियावरील फोटो आणि व्हिडीओला नेटकऱ्यांची नेहमी पसंती मिळते. ही जोडी त्यांच्या सोशल मीडिया पोस्टमुळे चर्चेत असतात. अनेक वेळा मुलाखतींमध्ये शाहिद आणि मीरा त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबाबत सांगत असतात.
View this post on Instagram