Shah Rukh Khan: बॉलिवूडच्या किंग खान आहे एवढ्या संपत्तीचा मालक; किती घेतो मानधन?
बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. चित्रपटांबरोबरच शाहरूख वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये देखील काम करतो.
Shah Rukh Khan net worth: SRK’s sources of income: बॉलिवूडचा सुपरस्टार शाहरूख खानचा चाहता वर्ग मोठा आहे. त्यांच्या चित्रपटांना प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळते. चित्रपटांबरोबरच शाहरूख वेगवेगळ्या जाहिरातींमध्ये देखील काम करतो. तसेच त्याची एक आयपीएल टीम देखील आहे. जाणून घेऊयात शाहरूखच्या संपत्तीबाबत
शाहरूखची वार्षिक कमाई 38 मिलियन म्हणजेच जवळपास 284 करोड रूपये आहे. शाहरूखने त्याच्या करिअरची सुरूवात फौजी आणि सर्कस यांसारख्या मालिकांमधून केली. त्यानंतर त्याने बनेगा करोडपती- सिझन 3 आणि क्या आप पंचवी पास से तेज है या शोचे सुत्रसंचालन देखील केले आहे. फोर्ब्सच्या रिपोर्टनुसार,2011मध्ये शाहरूखने 'झटका: टोटल वाइपआउट' या शोसाठी 2.5 करोड रुपये मानधन घेतले होते.
Businesses and Production Houses: शाहरूखचे रेड चिलीज एंटरटेनमेंट हे प्रोडक्शन हाऊस देखील आहे. या प्रोडक्शन हाऊसमधून शाहरूख जवळपास 500 कोटी रूपये कमवतो. तसेच बायजू आणि किडजानिया या कंपन्यांमध्ये देखील शाहरूखची गुंतवणूक आहे.
पेप्सी, व्हर्लपूल, नोकिया, हुंडई, टॅग ह्यूअर, डिश टीवी, बिग बास्केट आणि बायजूस या कंपन्यांच्या जाहिरातींमध्ये देखील शाहरूखने काम केले आहे. रिपोर्टनुसार एका जाहिरातींसाठी तो 3.5 से 4 करोड रुपये मानधन घेते. कोणाच्याही लग्नाला हजेरी लावण्यासाठी शाहरूख तब्बल 4 से 8 करोड रूपये घेतो. फोर्ब्स रिच लिस्ट 2021 नुसार शाहरूखची एकूण संपत्ती $ 690 मिलीयन म्हणजेच जवळपास 5000 करोड रूपयांपेक्षा जास्त आहे.
Varun Dhawan and Natasha Dalal: वरूण-नताशाच्या घरी येणार नवा पाहुणा? सोशल मीडियावर चर्चांना उधाण
शाहरूखच्या कभी खुशी कभी गम, दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे. कुछ कुछ होता है, ओम शांती ओम, माय नेम इज खान आणि दिलवाले या चित्रपटांना प्रेक्षकांची पसंती मिळाली होती. आता लवकरच शाहरूखचा पठाण हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. पठाण चित्रपटात शाहरूखसोबत सलमान खान, दीपिका पादुकोण आणि जॉन अब्राहम हे कलाकार देखील दिसणार आहेत.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेच्या सेटचं रहस्य, गोकुलधाम सोसायटीचे दोन भाग, काय आहे प्रकरण?