Taarak Mehta Ka Ooltah Chashmah मालिकेच्या सेटचं रहस्य, गोकुलधाम सोसायटीचे दोन भाग, काय आहे प्रकरण?
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुलधाम सोसाटीचा सेट गोरेगाव येथे उभारण्यात आला.
Taarak Mehta Ka Ooltah Chashmah News: छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध शो तारक मेहता का उल्टा चष्मा (Taarak Mehta Ka Ooltah Chashmah) गेली कित्येक वर्ष प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. शोमधील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. शोच्या सेटबद्दल जाणून घेण्यासाठी अनेक चाहते उत्सुक असतात. काही दिवसांपूर्वी या सेटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होत. पण त्यावरून अनेकांच्या मनात मालिकेतील गोकुलधाम सोसायटीच्या (Gokuldham Society) सेटबद्दल प्रश्न निर्माण झाले. जाणून घेऊयात या सेटबद्दल काही भन्नाट गोष्टी.
दोन वेगवेगळ्या जागी आहे गोकुलधाम सोसायटीचा सेट
तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेतील गोकुलधाम सोसायटी ही नेहमी चर्चेत असते. गोकुलधाम सोसायटी ही मालिकेमध्ये दिसताना संपूर्ण सोसायटी दिसते. पण या सोसायटीचे शूटिंग वेगवेगळ्या ठिकाणी होते. ही सोसायटी फक्त आउटडोअर शूट करण्यासाठी आहे. आउटडोअर शूटिंगसाठी उभारण्यात आलेला सेट हा गोरेगाव येथे आहे. घरातील इनडोअर सिन शूट करण्यासाठी कांदिवली येथे घराचा वेगळा सेट उभारण्यात आला आहे.
28 जुलै 2008 रोजी तारक मेहता का उल्टा चष्मा या मालिकेचा पहिला भाग प्रेक्षकांच्या भेटीस आला होता. गेली 13 वर्ष ही मालिका प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. या मालिकेतील जेठालाल, सोढी, अंजली भाभी, दयाबेन, डॉ. हाथी आणि भिडे या भूमिकांना प्रेक्षकांची पसंती मिळाली आहे. या मालिकेतील सोढी ही भूमिका साकारणारा कलाकार गुरुचरण सिंह तसेच सोनु भिडेचे ही भूमिका साकारणारी झील मेहता आणि टप्पू ही भूमिका साकारणारा भव्य गांधी या कलाकरांनी ही मालिका सोडण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेलता होता.
Taarak Mehta Ka Oaltah Chashmah मालिकेतील जुन्हा सोढीने सांगितले मालिका सोडण्याचे कारण