Ronit Roy Buys New Apartment : कधी काळी आर्थिक संकटात अडकला होता अभिनेता, आज मुंबईत खरेदी केला 18 कोटींचा फ्लॅट
Ronit Roy Buys New Apartment : एका अभिनेत्यासोबतही असेच काहीसे घडले. काही काळापूर्वी आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या अभिनेत्याला नशिबाने अशी चांगली साथ दिली की त्याने 18 कोटींचा आलिशान फ्लॅट खरेदी केला.
Ronit Roy Buys New Apartment : आयुष्यात कोणतीच वेळ एकसारखी नसते. यामध्ये चढ-उतार येत असतात. एखादा सामान्य सेलिब्रिटी असो किंवा सामान्य माणूस या सगळ्यांच्या आयुष्यात चढ-उतार येत असतात. एका अभिनेत्यासोबतही असेच काहीसे घडले. काही काळापूर्वी आर्थिक अडचणींना सामोरे जाणाऱ्या अभिनेत्याला नशिबाने अशी चांगली साथ दिली की त्याने 18 कोटींचा आलिशान फ्लॅट खरेदी केला.
छोट्या पडद्यापासून ते बॉलिवूडपर्यंत आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता रोनित रॉय (Ronit Roy) याने नुकताच मुंबईत वर्सोवामध्ये आलिशान फ्लॅट खरेदी केला असल्याचे वृत्त समोर आले आहे. IndexTap.com नुसार या फ्लॅटची किंमत ही 19 कोटींच्या घरात आहे.
18.94 कोटी रुपयांना खरेदी केला आलिशान फ्लॅट
रोनित रॉयचा हा अपार्टमेंट मुंबईच्या वर्सोवा भागात यारी रोडजवळ आहे. यामध्ये त्याला चार कारसाठीचे पार्किंग मिळाले आहे. अभिनेता रोनित रॉय याने 18.94 कोटी रुपयांमध्ये 4,258 चौरस फूट आकाराचे नवीन अपार्टमेंट विकत घेतले आहे. घर खरेदीसाठी त्याने 10 जून 2024 रोजी रजिस्ट्रेशन केले आहे. रोनितने आपल्या नव्या घरासाठी 1.13 कोटी रुपये मुद्रांक शुल्क आणि 30,000 रुपये नोंदणी शुल्क भरले असल्याचे वृत्त आहे.
View this post on Instagram
आर्थिक संकटाशी झुंजत होता रोनित
काही महिन्यांपूर्वी रोनित रॉय आर्थिक संकटातून जात होता. रोनित स्वतः एक सिक्युरीटी एजन्सी चालवतो. पण कोरोनाच्या काळात त्यांची आर्थिक परिस्थिती बिकट झाली होती. त्याला आपल्या एजन्सीमधील सिक्युरीटी गार्ड्सना पगार द्यायलाही पैसे नव्हते. त्यावेळच्या परिस्थितीमध्ये रोनितने आपली कारही विकली होती.
कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी कार विकली
'लेहरे रेट्रो'ला दिलेल्या मुलाखतीत रोनित रॉयने सांगितले होते की त्यांच्याकडे काही वाहने अशी होती की जी फार वापरतात नाहीत. आपल्या एजन्सीमधील सुरक्षा कर्मचाऱ्यांना पगार देण्यासाठी त्यांनी ती वाहने विकली होती. याशिवाय, अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, करण जोहर हे त्याच्या एजन्सीकडून त्या काळात सेवा घेत नसतानाही त्याला पेमेंट देत होते. त्याचाही फायदा झाला असल्याचे रोनित रॉयने आपल्या मुलाखतीत सांगितले.