Kartik Aaryan : ‘पान मसाल्या’ची जाहिरात करण्यास कार्तिक आर्यनचा नकार! अभिनेत्याने नाकारली ‘इतक्या’ कोटींची ऑफर
Kartik Aaryan : कार्तिक आर्यनने एका मोठ्या पान मसाला कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीच्या डीलला स्पष्टपणे नकार दिला आहे.
Kartik Aaryan : चित्रपटांव्यतिरिक्त बॉलिवूड कलाकार जाहिरातींमधूनही भरपूर कमाई करतात. कपड्यांपासून चपलांपर्यंत सर्व प्रकारच्या जाहिरातींमधून त्यांची मिळकत वाढत असते. शाहरुख (Shah Rukh Khan), अजय देवगण (Ajay Devgn) आणि अक्षय कुमार (Akshay Kumar) यांसारख्या अनेक स्टार्सनी पान-मसाला जाहिरात करून ट्रोलिंगचा सामना केला आहे. मात्र, सध्याचा आघाडीचा अभिनेता कार्तिक आर्यनने (Kartik Aaryan) याने पान मसाला जाहिरात थेट नाकारली आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या जाहिरातीसाठी त्याला करोडो रुपयांची ऑफर दिली जात होती. मात्र, अभिनेत्याने त्याला नकार दिला आहे. कार्तिकच्या या निर्णयानंतर आता त्याचे खूप कौतुक होत आहे.
‘भूल भुलैया 2’च्या यशानंतर कार्तिकला आपल्या चित्रपटात किंवा जाहिरातीत सामील करण्यासाठी मनोरंजन विश्वातील अनेक निर्माते रांगेत तयार आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनने एका मोठ्या पान मसाला कंपनीच्या कोट्यवधी रुपयांच्या जाहिरातीच्या डीलला स्पष्टपणे नकार दिला आहे.
कोट्यवधी रुपयांच्या डीलला थेट नकार!
बॉलिवूड अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) सध्या यशाच्या शिखरावर आहे. ‘भूल भुलैया 2’च्या प्रचंड यशानंतर, कार्तिक आर्यनने ‘सत्य की प्रेम कथा’ आणि दिग्दर्शक कबीर खान यांचा आगामी बायोपिक चित्रपट साईन केला आहे. यानंतर कार्तिक आर्यनची लोकप्रियता सर्वत्र वाढली आहे. प्रत्येकजण कार्तिकचे नाव आपल्या प्रोजेक्टमध्ये सामील करण्याचा प्रयत्न करत आहे. दरम्यान, कार्तिक आर्यनला एका प्रसिद्ध पान मसाला कंपनीने जाहिरातीची ऑफर दिली होती. ज्यासाठी ही कंपनी कार्तिकला 9 कोटी रुपये देण्यास तयार होती. पण, कार्तिक आर्यनने त्यांचा हा प्रस्ताव थेट नाकारला आहे. कार्तिक आर्यन हा तरुणांचा आवडता कलाकार आहे आणि आता त्याला कोणतीही पान मसाला जाहिरात करून आपली प्रतिमा खराब करायची नाहीय.
चाहत्यांच्या आरोग्याची अभिनेत्याला काळजी!
मीडिया रिपोर्ट्सनुसार, कार्तिक आर्यनने आपल्या चाहत्यांच्या आरोग्याचा विचार करूनच, अशी जाहिरात करण्यास नकार दिला आहे. यासाठी अभिनेत्याला 9 कोटी रुपयांची ऑफर देण्यात आली होती. मात्र, कार्तिक आर्यनने अद्याप यावर कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
यापूर्वी अजय देवगण, अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि अक्षय कुमार यांना पान मसालाच्या जाहिरातींसाठी नेटिझन्सच्या रोषाला सामोरे जावे लागले होते. यासाठी अक्षय कुमारला माफीही मागावी लागली होती. तर, साउथ इंडस्ट्रीचे सुपरस्टार ‘केजीएफ’ फेम यश (Yash) आणि ‘पुष्पा’ स्टार अल्लू अर्जुनने (Allu Arjun) पण मसाल्यांच्या अशा कोट्यावधींच्या डील नाकारल्या होत्या. वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, कार्तिक आर्यनचा 'भूल भुलैया 2' हा चित्रपट ब्लॉकबस्टर ठरला आहे. याशिवाय लवकरच त्याचा ‘शहजादा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
संबंधित बातम्या