Bollywood Actor: रेखासोबत दिसणारा मुलगा आहे 3100 कोटींचा मालक, पहिल्याच चित्रपटाला मिळाले 92 पुरस्कार
Bollywood Actor: या स्टारच्या पदार्पणातील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याच्या पहिल्या चित्रपटाने दहा-वीस नव्हे तर 92 पुरस्कार जिंकले.
Bollywood Actor: बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीमध्ये असे अनेक सेलिब्रिटी झाले आहेत ज्यांनी आपल्या पहिल्याच चित्रपटातून प्रेक्षकांच्या हृदयात स्थान निर्माण केले. या स्टारच्या पदार्पणातील चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. त्याच्या पहिल्या चित्रपटाने दहा-वीस नव्हे तर 92 पुरस्कार जिंकले. रेखासोबतच्या या फोटोत काही लहान मुले दिसत आहेत. या मुलांपैकी एक बॉलिवूडचा सुपरस्टार आहे. त्याच्याकडे कोट्यवधी रुपयांची संपत्ती आहे.
रेखासोबत कोण आहे तो बॉलिवूडचा अभिनेता?
या फोटोमध्ये रेखासोबत तुम्हाला अनेक मुले दिसत आहेत. रेखाच्या उजव्या बाजूला असलेला मुलगा सुपरस्टार हृतिक रोशन आहे. बॉलीवूडमध्ये मुख्य अभिनेता म्हणून काम करण्यापूर्वी हृतिकने बालकलाकार म्हणून काम केले होते. हृतिक 1980 मध्ये आलेल्या 'आशा' आणि 1986 मध्ये आलेल्या 'भगवान दादा' चित्रपटात दिसला होता.
View this post on Instagram
'कहो ना प्यार है'मधून केले डेब्यू
हृतिक हा ज्येष्ठ बॉलिवूड अभिनेता आणि दिग्दर्शक राकेश रोशन यांचा मुलगा आहे. हृतिकचा सुरुवातीपासूनच चित्रपट जगताकडे कल होता. बॉलीवूडमध्ये बालकलाकार म्हणून काम करणाऱ्या हृतिकने 2000 मध्ये रिलीज झालेल्या 'कहो ना प्यार है' या चित्रपटातून मुख्य अभिनेता म्हणून करिअरला सुरुवात केली.
अभिनेत्री अमिषा पटेलनेही या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. दोघांचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर सुपरहिट ठरला होता. आजही या चित्रपटातील गाणी लोकप्रिय आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन हृतिकचे वडील राकेश रोशन यांनी केले होते. पहिल्याच चित्रपटापासून हृतिक रातोरात स्टार झाला.
'कहो ना प्यार है' चित्रपटाला 92 पुरस्कार
'कहो ना प्यार है' हा चित्रपट वर्ष 2000 मधील एक सर्वोत्कृष्ट चित्रपट होता. या चित्रपटाने पुरस्काराच्या बाबतीत इतिहास रचला होता. 'कहो ना प्यार है'ने वेगवेगळ्या श्रेणीत 92 पुरस्कार मिळवले होते. वर्ष 2002 हृतिक रोशन आणि अमिषा पटेल यांच्या या चित्रपटाने सर्वाधिक पुरस्कार मिळवल्याने 'गिनीज बुक ऑफ वर्ल्ड 'मध्ये स्थान मिळवले.
3100 कोटींचा मालक आहे हृतिक
View this post on Instagram
हृतिकने आपल्या 24 वर्षाच्या कारकिर्दीत अनेक हिट चित्रपट दिले. हृतिकने सिनेसृष्टीसह व्यवसायातही पाऊल ठेवले आहे. एका वृत्तानुसार हृतिकची एकूण संपत्ती ही 3100 कोटींच्या घरात आहे.