Sanam Teri Kasam Re Release: बॉक्स ऑफिसवर फक्त अन् फक्त हर्षवर्धन राणेचीच जादू; री-रिलीजनंतर 'सनम तेरी कसम'ची धमाकेदार कमाई
Sanam Teri Kasam Re Release: जवळपास 9 वर्षांनी अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनचा चित्रपट री-रिलीज करण्यात आला. या चित्रपटानं री-रिलीज होताच, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला.

Sanam Teri Kasam Re Release: सध्या बॉलिवूडमध्ये (Bollywood) भलतच चित्र पाहायला मिळत आहे. गेल्या काही काळापासून चित्रपट रि-रिलीजचा (Movie Re Released) ट्रेंड खूप वाढल्याचं पाहायला मिळत आहे. अशातच आता या ट्रेंडमध्ये अभिनेता हर्षवर्धन राणेचा (Harshvardhan Rane) 'सनम तेरी कसम' (Sanam Teri Kasam) हा चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाला. 2016 मध्ये फ्लॉप झालेला हा चित्रपट आता थिएटरमध्ये मात्र, धुमाकूळ घालतोय. आधी सुपरफ्लॉप ठरूनही आता सुपरडुपर हिट ठरण्याचा 'सनम तेरी कसम'चा विक्रम डोळे विस्फारणारा आहे.
बॉलिवूडमध्ये गेल्या काही काळापासून चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याचा ट्रेंड सुरू झाला आहे. या काळात अनेक चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाले, पण त्यापैकी काहीच चित्रपट धमाकेदार कमाई करू शकले आहेत. 2018 मध्ये प्रदर्शित झालेला 'लैला मजनू' हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारसा यशस्वी झाला नाही. पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर त्याला प्रचंड यश मिळालं. आता 2016 मध्ये प्रदर्शित झालेला 'सनम तेरी कसम' हा चित्रपटही री-रिलीज करण्यात आला आहे.
9 वर्षांनी पसरली 'सनम तेरी कसम'ची जादू
जवळपास 9 वर्षांनी अभिनेता हर्षवर्धन राणे आणि पाकिस्तानी अभिनेत्री मावरा होकेनचा चित्रपट री-रिलीज करण्यात आला. या चित्रपटानं री-रिलीज होताच, बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. ज्यावेळी हा चित्रपट पहिल्यांदा रिलीज करण्यात आला होता, त्यावेळी तो बॉक्स ऑफिसवर सुपरफ्लॉप ठरला. आता असं मानलं जातंय की, हा चित्रपट री-रिलीजनंतर सुपरडुपर हिट ठरू शकतो. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 'सनम तेरी कसम'नं री-रिलीजच्या पहिल्या दिवशी म्हणजेच, शुक्रवारी 4.25 कोटी रुपयांचं कलेक्शन केलं होतं. अशातच आता अशी माहिती मिळत आहे की, या फिल्मनं दुसऱ्या दिवशी उत्तम परफॉर्मन्स केला आहे.
View this post on Instagram
फिल्मनं शनिवारी जवळपास 5 कोटी रुपयांची कमाई केली आहे. ज्यामुळे रि-रिलीजनंतर याची एकूण कमाई 9.25 कोटी रुपयांची झाली आहे. 2016 मध्ये ज्यावेळी फिल्म रिलीज करण्यात आली, त्यावेळी या चित्रपटानं आपल्या पहिल्या दिवशी 1.25 कोटी रुपयांची कमाई केली होती. फिल्मचं लाईफटाईम कलेक्शन 16 कोटी रुपयांचं असल्याचं सांगितलं जात होतं. अशातच आता केवळ 2 दिवसांतच फिल्मनं रि-रिलीजनंतर आपल्या लाईफटाईम कलेक्शनची अर्ध्यापेक्षा जास्त कमाई केली आहे.
आधी सुपरफ्लॉप, पण अचानक पॉप्युलर झालेला 'सनम तेरी कसम'
ओटीटीवर प्रदर्शित झाल्यानंतर चित्रपटाची लोकप्रियता वाढली. प्रत्येकाला या चित्रपटाच्या हृदय पिळवटून टाकणाऱ्या कथानकानं आपलंस केलं. त्यानंतर ज्यावेळी रि-रिलीजचा ट्रेंड सुरू झाला, त्यावेळी अनेकांनी सोशल मीडियावर पोस्ट करुन हर्षवर्धन राणेला टॅग करायला सुरुवात केली. सर्वांनी अभिनेत्याला चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची विनंती केली. प्रेक्षकांचा प्रचंड प्रतिसाद पाहून हर्षवर्धननं चित्रपटाच्या निर्मात्याशी संपर्क साधला. जिथे त्यानं निर्मात्यांसमोर लोकांची मागणी सांगितली आणि चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची मागणी केली. त्यांनं निर्मात्यांना चित्रपट पुन्हा प्रदर्शित करण्याची विनंती केली आणि यावेळी लोक नक्कीच चित्रपट पाहतील असंही सांगितलं.
दरम्यान, यासंदर्भातील एक व्हिडीओ समोर आला आहे, ज्यामध्ये चित्रपटाचे निर्माते दीपक मुकुट त्यांच्या ऑफिसमधून बाहेर पडून चित्रपट पुन्हा प्रदर्शिक करण्याबाबत सांगत आहेत. आता 'लैला मजनू', 'तुंबाड' नंतर, 'सनम तेरी कसम' देखील यशाच्या मार्गावर वाटचाल करत आहे. अशा परिस्थितीत, चित्रपट पुन्हा प्रदर्शित झाल्यानंतर किती कमाई करणार? हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.
महत्त्वाच्या इतर बातम्या :























