बॉबी देओलची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये ठरली फ्लॉप, प्रसिद्ध प्रोड्युसरसोबत लग्न; आता करण जोहर आणि आलिया भटशी घेतेय पंगा
Divya Khossla Kumar : अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, बॉबी देओल यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिला इंडस्ट्रीमध्ये काही खास नाव कमावता आलं नाही.
Entertainment News : फिल्म इंडस्ट्रीमध्ये मोठा स्टार होण्याची स्वप्न घेऊन अनेक जण येतात, पण प्रत्येकाचं ते स्वप्न खरं होतंच असं नाही. अनेक कलाकारांना बॉलिवूडमध्ये पहिला प्रोजेक्ट मिळवण्यात आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते. तर, बऱ्याच संघर्षानंतरही अनेकांचं हे स्वप्न अपूर्णच राहतं. अमिताभ बच्चन, अक्षय कुमार, बॉबी देओल यांच्यासोबत झळकलेली अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिला इंडस्ट्रीमध्ये काही खास नाव कमावता आलं नाही.
बॉबी देओलची अभिनेत्री बॉलिवूडमध्ये ठरली फ्लॉप
2004 मध्ये 'अब तुम्हारे हवाले वतन साथियों' या चित्रपटात बॉबी देओल, अक्षय कुमार, अमिताभ बच्चन, संदली सिन्हा यांच्यासोबत अभिनेत्री दिव्या खोसला कुमार झळकली होती. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरला, पण यातील स्टारकास्टने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं. दिव्या खोसला कुमारच्या सौंदर्यावर प्रेक्षकांच्या नजरा खिळल्या. 'कभी यादों में आओ' या म्युझिक व्हिडीओमुळे दिव्या खोसला कुमार चर्चेत आली होती.
दिव्या खोसलाला इंडस्ट्रीमध्ये खास यश मिळालं नाही
अभिनेत्री दिव्या खोसला कुमार हिने अनेक चित्रपटांमध्ये काम केलं आहे, पण तिला बॉलिवूडमध्ये खास नाव कमावता आलेलं नाही. अभिनेत्री दिव्या खोसलाचे बहुतेक चित्रपट बॉक्स ऑफिसवर फ्लॉप ठरले. दिव्या खोसला रॉय, शफकखाना, मरजावां, इन्दू की जवानी, स्ट्रीट डांसर 3 या चित्रपटांमध्ये झळकली आहे.
आता करण जोहर आणि आलिया भटशी घेतेय पंगा
दिव्या खोसला सध्या आलिया भट आणि करण जोहर यांच्यासोबतच्या वादामुळे चर्चेत आहे. दिव्याने आरोप केला आहे की, करण जोहर निर्मित आलिया भटचा 'जिगरा' चित्रपट तिच्या 'सावी' चित्रपटाची कॉपी आहे. या दोन्ही चित्रपटांमधील सांधर्म्य पाहता दिव्याने चित्रपटावर चोरीचा आरोप केला आहे.
प्रसिद्ध प्रोड्युसरसोबत लग्न
चित्रपटांमध्ये वारंवार मिळालेल्या अपयशानंतर, तिने अनेक वर्षांचा दीर्घ ब्रेक घेतला. यानंतर दिव्या खोसलाने 2005 मध्ये संगीतकार आणि निर्माता भूषण कुमारशी लग्न केलं. भूषण कुमार हा टी-सीरीजचा मालक आहे. लग्नानंतर दिव्या बराच काळ पडद्यापासून दूर होती, त्यानंतर तिने पुनरागमन केलं तेव्हाही तिला प्रेक्षकांचं फारसं प्रेम मिळालं नाही. सध्या दिव्या 'सावी' चित्रपटामुळे आणि आलिया भट्ट-करण जोहरसोबतच्या वादांमुळे चर्चेत आहे.
करण जोहरवर चित्रपटाची कॉपी केल्याचा आरोप
दिव्या खोसला कुमारने करण जोहरवर तिच्या चित्रपटाची पूर्णपणे कॉपी केल्याचा आरोप केला आहे. यादरम्यान करण जोहरने एका सोशल मीडिया पोस्टमध्ये दिव्या खोसला कुमारवर निशाणा साधत तिला इडियट म्हटलं होतं. करण जोहरच्या या पोस्टनंतर दिव्यालाही संताप अनावर झाला आणि हे प्रकरण तापलं.
महत्त्वाच्या इतर बातम्या :