एक्स्प्लोर

...तर सलमान आणि आसाराम बापू एकाच बराकमध्ये!

मागच्यावेळी शिक्षेनंतर सलमानला याच तुरुंगाच्या बराक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलं होतं.

जोधपूर : 20 वर्षांपूर्वीच्या काळवीट शिकारप्रकरणी जोधपूरच्या सीजीएम कोर्टाने दोषी ठरलेल्या अभिनेता सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा आणि दहा हजारांच्या दंडाची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तर या प्रकरणात सैफ अली खान, तब्बू, नीलम, सोनाली बेंद्रे या कलाकारांची निर्दोष सुटका केली आहे. कोर्टाने सलमानला पाच वर्षांची शिक्षा सुनावल्याने त्याचा तुरुंगवास अटळ आहे. सलमानची सेंट्रल जेलमध्ये रवानगी होणार असून तिथे तो आसाराम बापूसोबत राहण्याची शक्यता आहे. सलमानला सेंट्रल जेलच्या बराक क्रमांक दोनमध्ये ठेवलं जाऊ शकतं. याच बराकमध्ये मुलींच्या लैंगिक शोषणाप्रकरणी तुरुंगवास भोगत असलेला आसाराम बापूही कैद आहे. मागच्यावेळी शिक्षेनंतर सलमानला याच तुरुंगाच्या बराक क्रमांक एकमध्ये ठेवण्यात आलं होतं. तो सात दिवस या तुरुंगात कैद होता. त्याची ओळख कैदी नंबर 343 अशी होती. काळवीट शिकार या प्रकरणाच्या सुनावणीसाठी अभिनेता सलमान खान, सैफ अली खान, सोनाली बेंद्रे आणि तब्बू जोधपूरमध्ये दाखल झाले. जोधपूर न्यायालयाचे पिठासीन अधिकारी देवकुमार खत्री यांनी 20 वर्ष जुन्या खटल्याच्या निर्णयासाठी आजची तारीख निश्चित केली आहे. वीस वर्षांपूर्वी म्हणजे 1998 मध्ये 'हम साथ साथ है' चित्रपटाचं चित्रीकरण जोधपूरमध्ये सुरु होतं. त्यावेळी सलमानने घोडा फार्म हाऊस आणि भवाद गावात 27-28 डिसेंबरच्या रात्री हरणांची, तर कांकाणी गावात 1 ऑक्टोबरला काळवीटाची शिकार केल्याचा आरोप आहे. LIVE: सलमान खानला 5 वर्षांची शिक्षा, 10 हजाराचा दंड नेमकं प्रकरण काय आहे? काळवीट शिकार प्रकरण 27 आणि 28 सप्टेंबर 1998 सालचं आहे. सलमान खान दिग्दर्शक सुरज बडजात्या यांच्यासोबत 'हम साथ साथ है' या सिनेमाची शुटिंग जोधपूरमध्ये करत होता. यावेळी 27 सप्टेंबरच्या रात्री तो सहकलाकार सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्यासोबत शिकारीसाठी निघाला. यावेळी सलमानने संरक्षित वन्य जीवांच्या यादीत असलेल्या दोन काळवीटांची शिकार केल्याचा आरोप आहे. याशिवाय विविध दोन ठिकाणी काळवीटाची शिकार केल्याचाही त्याच्यावर आरोप करण्यात आला. त्यामुळे त्याच्यावर एकूण चार खटले दाखल आहेत. कोणकोणत्या केस दाखल 1. कांकाणी गाव केस - 5 एप्रिलला फैसला होणार. गोळीचा आवाज ऐकून ग्रामस्थ घटनास्थळी आले. तेव्हा सलमानने इतर कलाकारांसोबत गाडीतून पळ काढला, तर दोन्ही हरणांचे मृतदेह तिथेच पडून होते. 2. घोडा फार्म हाऊस केस - 10 एप्रिल 2006 रोजी सीजेएम कोर्टाने पाच वर्षांची शिक्षा सुनावली. सलमान हायकोर्टात गेला. 25 जुलै 2016 रोजी त्याची सुटका करण्यात आली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली. 3. भवाद गाव केस - सीजेएम कोर्टाने 17 फेब्रुवारी 2006 रोजी सलमानला दोषी ठरवून एका वर्षाची सुनावली. हायकोर्टाने या  प्रकरणातही सलमानची मुक्तता केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात सुप्रीम कोर्टात दाद मागितली. 4. शस्त्रास्त्र केस - 18 जानेवारी 2017 रोजी कोर्टाने सलमानची सुटका केली. राज्य सरकारने या निर्णयाविरोधात हायकोर्टात दाद मागितली. सलमान खानविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि अन्य कलाकारांविरोधात वन्यजीव संरक्षण कायदा, कलम 51 आणि भारतीय दंड विधान कलम 149 अंतर्गत बेकायदेशीरपणे एका जागी जमण्याचा गुन्हा दाखल आहे. सलमान खान अवैध शस्त्र खटल्यातूनही सुटला! अभिनेता सलमान खानला जोधपूर कोर्टाने या वर्षाच्या सुरुवातीला 17 जानेवारीला मोठा दिलासा दिला. अवैध शस्त्र बाळगल्याप्रकरणाच्या खटल्यातून सलमान खान सुटला. काळवीट शिकार केसमध्ये अवैध शस्त्रास्त्र बाळगल्याप्रकरणी सलमानविरोधात जोधपूर न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवर सुनावणी झाली. या खटल्यात सलमानला संशयाचा फायदा मिळाला. त्यामुळे सलमान निर्दोष सुटला. सरकारी वकिलांचा युक्तिवाद काय? त्या रात्री सर्व कलाकार जिप्सी कारमध्ये होते, असा दावा सराकरी वकील भवानी सिंह भाटी यांचा आहे, तर सलमान खान जिप्सी चालवत असल्याचंही त्यांचं म्हणणं आहे. काळवीट पाहताच त्याने गोळी चालवली आणि यामध्ये दोन काळवीटांचा मृत्यू झाला. लोकांनी जेव्हा हा सर्व प्रकार पाहिला तेव्हा या कलाकारांचा पाठलाग केला, मात्र सर्व जण मृत काळवीटांना सोडून पळून गेले, असा दावा सरकारी वकिलांनी केला आहे. सलमानच्या वकिलांचा दावा फिर्यादींच्या दाव्यात अनेक प्रकारच्या उणिवा असून काळवीटाचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हे अजून फिर्यादींनी सिद्ध केलेलं नाही, असं सलमानचे वकील एच. एम. सारस्वत यांचं म्हणणं आहे. काळवीटांचा मृत्यू गोळी मारल्यानेच झाला होता का, हा प्रश्न आहे आणि अशा प्रकारच्या तपासावर विश्वास ठेवला जाऊ शकत नाही, असा प्रतिदावा सलमानच्या वकिलांनी केला. या प्रकरणात दुष्यंत सिंह आणि दिनेश सिंह हे आणखी दोन आरोपी आहेत. काळवीटांची शिकार करताना दुष्यंत सिंह सलमानच्यासोबत होता, असं बोललं जातं, तर दिनेश सिंह हा सलमानचा सहाय्यक असल्याचं बोललं जातं. खटला कुणी दाखल केला? सलमान खानसह सैफअली खान, सोनाली बेंद्रे, तब्बू आणि नीलम यांच्याविरोधात बिष्णोई समाजातील लोकांनी पोलिसात गुन्हा दाखल केला. त्यावेळी सलमानवर तीन गुन्हे दाखल करण्यात आले होते. मात्र अटक करताना पोलिसांनी सलमानच्या रुममध्ये दोन रायफल मिळाल्या, ज्यांचा परवाना संपलेला होता. त्यानंतर त्याच्याविरोधात शस्त्रास्त्र कायद्यानुसार हा गुन्हा दाखल करण्यात आला. किती वर्षांची शिक्षा? वन्य जीवन अधिनियमाच्या कलम 149 अंतर्गत काळवीट शिकारीसाठी सात वर्षांपेक्षा जास्त कारावासाच्या शिक्षेची तरतूद आहे. काही वर्षांपूर्वी ही शिक्षा सहा वर्षांपर्यंत होती. सलमानचं प्रकरण 20 वर्ष जुनं आहे. अशा स्थितीत सहा वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा शक्य आहे. हे कलम सह आरोपींवरही लागू होणार. कतरिना सिद्धिविनायकाच्या दर्शनाला दरम्यान, काळवीट शिकारप्रकरणातून सलमान खानची सुखरुप सुटका व्हावी, यासाठी त्याची जवळची मैत्रीण अभिनेत्री कतरिना कैफने मुंबईच्या सिद्धिविनायकाचं दर्शन घेतलं . यावेळी तिच्यासोबत सलमानची बहीण अर्पिता सुद्धा होती. दोघींनी मध्यरात्री 12 वाजता मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायकाचे दर्शन घेतले. संबंधित बातम्या काळवीट शिकार : सलमानसह इतर कलाकार जोधपुरात दाखल काळवीट शिकार प्रकरणी सलमानचा फैसला 5 एप्रिलला काळवीट शिकारप्रकरण, सैफ, तब्बू, सोनाली यांची जोधपूर न्यायालयात हजेरी

महत्त्वाच्या बातम्या

Sunita Ahuja on Govinda: 'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
'लेकीच्या वयाच्या मुलीसोबत फिरतोय, लाज वाटली पाहिजे'; गोविंदाचा 'त्या' तरुणीसोबत व्हिडीओ व्हायरल, पत्नीचा संताप, म्हणाली...
Dengue vs Typhoid: तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
तुमच्या मुलाला ताप आला? खूप डोकंही दुखतं? डेंग्यू किंवा टायफॉइडची लक्षणं तर नाही ना? कसं ओळखाल?
Vaibhav Mangle Daughter: 'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
'आता तू सज्ञान झाली आहेस'; वैभव मांगलेंची लेकीसाठी खास पोस्ट, 18 व्या वर्षात पदार्पण, अभिनेत्याच्या मुलीला पाहिलंत?
Samay raina: समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द
समय रैनाला सुप्रीम कोर्टाकडून मोठा दिलासा; 'इंडियाज गॉट लेटेंट' मधील वादग्रस्त टिप्पणीप्रकरणी FIR रद्द

व्हिडीओ

Rahul Gandhi On PM Modi Special Report : पंतप्रधान मोदींची खिल्ली उडवली, भाजप राहुल गांधींवर संतापली
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : मुलींना मांडीवर बसवतो, कानात मंत्र फुकतो, स्वप्नील लांडेंची भयंकर कारनामे
Umesh Tagunde Maharaj Pune Vastav 291 : महिला पाय धुवून पाणी पितात, पुण्याच्या बाबाचं वास्तव
Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Pune Chakan Traffic Jam : पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
पुणे जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती; चाकण वाहतूक कोंडीवर सरकारचा मोठा निर्णय
Share Market : शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
शेअर बाजारात घसरण कायम, निफ्टीत सलग चौथ्या दिवशी घसरण, गुंतवणूकदारांचे 1.97 लाख कोटींचं नुकसान
Burger King : डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर 'FDA' ची मोठी कारवाई; पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द!
Surya Kant: 'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
'काॅकरोच' वक्तव्याचा चुकीचा अर्थ लावला गेला आणि देशातील तरुणांची दिशाभूल करण्यासाठी त्याचा गैरवापर केला; सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्याकडून पुन्हा खुलासा
NCP : पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद? सूत्रांची माहिती
पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी, वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
पोलीस आणि अग्निशमन दलाच्या 301 जवानांना शौर्य पुरस्कार जाहीर, यापैकी 197 जण नक्षलग्रस्त भागातील, सीबीआयच्या 21 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही राष्ट्रपती पदक
Sri Lanka vs India, 1st Test: तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
तब्बल 9 वर्षांनी टीम इंडियाची श्रीलंकेविरुद्ध 'कसोटी' लागणार, पण 15 पैकी फक्त या 3 जणांना श्रीलंकन भूमीतील अनुभव
Investment Tips :  राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
राकेश झुनझुनवालांचे गुंतवणुकीचे 10  मंत्र, प्रत्येक गुंतवणूकदारांसाठी ठरतील फायदेशीर, जाणून घ्या 
Embed widget