Biopic On Cricketer Balu Panwalkar: भल्या भल्या फलंदाजांना आपल्या गोलंदाजीने घायाळ करणाऱ्या क्रिकेटपटूची कहाणी रुपेरी पडद्यावर
Biopic On Cricketer Balu Panwalkar: आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना गुंडाळणारे भारताचे पहिले दलित क्रिकेटपटू बाळू पालवणकर यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर येणार आहे.
Biopic On Cricketer Balu Panwalkar: आपल्या गोलंदाजीने भल्याभल्या फलंदाजांना गुंडाळणारे भारताचे पहिले दलित क्रिकेटपटू बाळू पालवणकर ( Balu Panwalkar) अर्थात पी. बाळू (P. Balu) यांचा जीवनपट आता रुपेरी पडद्यावर येणार आहे. बाळू पालवणकर यांनी स्वातंत्र्यपूर्व काळातील भारतीय क्रिकेट चांगलेच गाजवले होते. अस्पृश्यतेचे चटके सोसूनही त्यांनी आपल्या कामगिरीने सर्वांवर भुरळ पाडली होती. बॉलिवूड अभिनेता अजय देवगण (Ajay Devgn) आणि दिग्दर्शक तिग्मांशू धुलिया (Tigmanshu Dhulia) या चित्रपटासाठी एकत्र आले आहेत. बाळू पालवणकरांची भूमिका अजय देवगण साकारणार आहेत की इतर अभिनेता झळकणार आहे, याबाबत काहीही स्पष्ट झाले नाही.
समोर आलेल्या बातम्यांनुसार, तिग्मांशु धुलिया क्रिकेटच्या पार्श्वभूमीवर चित्रपट बनवणार असल्याचे म्हटले जात आहे. देशातील पहिला दलित क्रिकेटपटू बाळू पालवणकर आणि त्यांच्या भावांची कहाणी दाखवण्यात येणार आहे. हा चित्रपट इतिहासकार आणि लेखक रामचंद्र गुहा यांच्या 'अ कॉर्नर ऑफ अ फॉरेन फील्ड' या पुस्तकावर आधारित आहे. रामचंद्र गुहा यांनी स्वत: ही माहिती दिली.
रामचंद्र गुहा यांनी केले ट्वीट
रामचंद्र गुहा यांनी आपल्या ट्विटरवर ट्वीट करत म्हटले की, रील लाईफ एंटरटेन्मेंटने माझ्या पुस्तकाचे हक्क विकत घेतले आहेत. हे पुस्तक बाळू पालवणकर आणि त्यांच्या भावांच्या क्रिकेट कारकिर्दीवर आधारीत आहे. या प्रोजेक्टला तिंग्मांशू धुलिया लीड करणार असल्याने आनंद वाटत असल्याचेही गुहा यांनी सांगितले.
Delighted to share the news that Reel Life Entertainment have bought the cinematic rights to A CORNER OF A FOREIGN FIELD, my book about the remarkable Dalit cricketer Palwankar Baloo and his brothers. I am particularly pleased that Tigmanshu Dhulia will anchor the film project.
— Ramachandra Guha (@Ram_Guha) May 30, 2024
निर्माती प्रीति सिन्हा यांनीदेखील गुहा यांचे ट्वीट रिट्वीट करत पुस्तकाचे हक्क बहाल केले असल्याबद्दल आभार मानले आहे. अजय देवगण, तिग्मांशू धुलिया यांनाही टॅग करण्यात आले आहे. अजय देवगण या चित्रपटात काम करणार की नाही हे स्पष्ट झाले नाही.
Thank you @Ram_Guha Sir for entrusting us with the rights🙏 We hope to do full justice to your Book and the Baloo Palwankar story @ajaydevgn @dirtigmanshu @pritisinha333 https://t.co/bOcUJDX2VJ
— Priti Sinha (@pritisinha333) May 30, 2024
बाळू पालवणकर कोण होते?
बाळू पालवणकर हे भारतातील पहिले दलित क्रिकेटपटू होते. बाळू पालवणकर यांचा जन्म 1876 मध्ये मुंबई प्रेसिडेन्सीमध्ये झाला. बाळू पालवणकर यांचे तिन्ही भाऊ शिवराम, विठ्ठल आणि गणपत हे देखील नावाजलेले क्रिकेटपटू होते. महाराज रणजीति सिंह यांच्याआधी बाळू पालवणकर हे भारतीय क्रिकेट वर्तुळात नावाजलेले क्रिकेटपटू होते असे रामचंद्र गुहा यांनी एका लेखात म्हटले होते. बाळू पालवणकर आणि त्यांचे भाऊ क्रिकेट खेळत असले तरी त्यांना आपल्या संघातही जातीय अस्पृश्यतेचा सामना करावा लागला होता.