Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर येणार ‘खिलाडी नं. 1’, ‘खेल खेल में’ कल्ला होणार कडक; आज कोणाचा क्लास लागणार?
Khel Khel Mein Promotion in Bigg Boss Marathi : भाऊच्या धक्क्यावर अभिनेता अक्षय कुमार हजेरी लावणार आहे.
Bigg Boss Marathi Season 5 : बिग बॉस मराठीच्या यंदाच्या नवीन सीझनला सुरुवात झाली असून सदस्य कल्ला करताना दिसत आहेत. यंदाचा बिग बॉसचा सीझन काहीसा वेगळा आहे. यंदा बिग बॉस मराठीचं घर चक्रव्युह असून यामध्ये सदस्य शिरले आहेत. त्याशिवाय यंदा बिग बॉसचा होस्टही बदलला आहे. अभिनेता रितेश देशमुख होस्टची जबाबदारी पार पाडताना दिसत आहे. बिग बॉस मराठीमध्ये भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सर्व सदस्यांचा क्लास घेताना पाहायला मिळतो.
भाऊच्या धक्क्यावर येणार ‘खिलाडी नं. 1’
आजही भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊ सदस्यांची शाळा घेणार आहे. याशिवाय भाऊच्या धक्क्यावर खास पाहुणेही येणार आहेत. भाऊच्या धक्क्यावर बॉलिवूडचा खिलाडी अक्षय कुमार हजेरी लावणार आहे. रितेश भाऊच्या धक्क्यावर अक्षय कुमार धडक देणार आहे. ‘खेल खेल में’ कल्ला होणार आहे. अभिनेता अक्षय कुमार याचा आगामी 'खेल खेल में' चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अक्षय कुमार बिग बॉसमध्ये येणार आहे. 'खेल खेल में' चित्रपट 15 ऑगस्ट रोजी रिलीझ होणार आहे.
‘खेल खेल में’ कल्ला होणार कडक
View this post on Instagram
आज कोणाचा क्लास लागणार?
बिग बॉस मराठीच्या घरात आज भाऊचा धक्का आहे. भाऊच्या धक्क्यावर आज कोणत्या स्पर्धकाची वाट लागणार हे पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. पहिल्या आठवड्यात भाऊच्या धक्क्यावर रितेश भाऊनं निक्की तांबोळीचा क्लास घेतला होता. या आठवड्यात रितेश भाऊ कोणत्या स्पर्धकाला झापणार हे पाहण्यासाठी बिग बॉस प्रेमी उत्सुक आहेत.
View this post on Instagram
बिग बॉसच्या घरात सदस्यांचा कल्ला
बिग बॉस मराठीचा सध्या दुसरा आठवडा संपत आला आहे. बिग बॉसच्या घरात या आठवड्यात इंटरटेंमेंटचा तडका पाहायला मिळाला. बीबी हाऊसमध्ये कल्ला टीव्हीच्या टास्कमध्ये घरातील सदस्यांनी धमाकेदार परफॉर्मन्स सादर करत घरातील सदस्यांसोबत प्रेक्षकांचं मनोरंजन केलं. घन:श्याम सर्व परफॉर्मन्सचं परिक्षण करताना दिसला.
महत्त्वाच्या इतर बातम्या :