एक्स्प्लोर

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस'च्या घरातील प्रसाद जवादेचा प्रवास संपला; मांजरेकर म्हणाले,"यंदाच्या पर्वातील सर्वात मोठा धक्का"

Prasad Jawade : 'बिग बॉस'च्या घरातील अभिनेता प्रसाद जवादेचा प्रवास संपला आहे.

Prasad Jawade On Bigg Boss Marathi 4 : बिग बॉस मराठीचं चौथं पर्व (Bigg Boss Marathi 4) शेवटच्या टप्प्यात आल्याने चाहत्यांमध्ये आता या कार्यक्रमाची उत्सुकता आहे. अशातच आता या स्पर्धेतलं शेवटचं एलिमेनेश कार्य पार पडलं असून यातून प्रसाद जवादेला (Prasad Jawade) घराबाहेर पडावं लागलं आहे. 

प्रसाद जवादेचा मोठा चाहतावर्ग आहे. बिग बॉसच्या घरात अगदी पहिल्या दिवसापासून प्रसादने लक्ष वेधून घेतलं होतं. त्याची खेळण्याची पद्धत चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. पण आता त्याचा बिग बॉसच्या घरातील प्रवास संपल्याने चाहते नाराज झाले आहेत. तसेच तो घराबाहेर पडताना स्पर्धकदेखील भावूक झाले होते. 

प्रसादची खास पोस्ट...

घराबाहेर पडल्यानंतर प्रसादने एक खास पोस्ट शेअर करत चाहत्यांचे आभार मानले आहेत. त्याने लिहिलं आहे,"अजूनही विश्वास बसत नाही की 'बिग बॉस मराठी 4'चा माझा प्रवास संपला आहे. खेळाच्या अंतिम टप्प्यावर येऊन बाहेर पडलो याचं खूप दु:ख आहे". 

प्रसादने पुढे लिहिलं आहे,"मला एक गोष्ट खात्रीपूर्वक माहीत आहे की सलग आठ आठवडे नॉमिनेटेड असताना सतत साथ आणि वोट्स देणाऱ्या माझ्या पलटणच्या प्रेमाची पॉवर इतकी आहे की वोट्स का, सारं काही जिंकता येईल. घरातील प्रवासात खूप उतार-चढाव होते. पण तुमच्या प्रेमामुळे सतत एक उमेद आणि ऊर्जा मिळत होती". 

View this post on Instagram
 
A post shared by Prasad Jawade (@prasadjawade)

'बिग बॉस मराठी 4' Top 5 मध्ये कोण?

घराबाहेर पडताना प्रसाद म्हणाला,"आपली जी भांडणं आहेत ती आपण याच घरापुरती ठेवूया". तसेच मांजरेकर (Mahesh Manjrekar) म्हणाले,"प्रसादचं घराबाहेर जाणं हा या पर्वातील सर्वात मोठा धक्का आहे". प्रसाद घराबाहेर पडल्याने आता राखी सावंत, अमृता धोंगडे, किरण माने, अक्षय केळकर, आरोह वेलणकर या स्पर्धकांमध्ये चढाओढ पाहायला मिळणार आहे". त्यामुळे टॉप पाच स्पर्धकांमध्ये रंगलेली चुरस प्रेक्षकांसाठी मात्र मनोरंजनाची पर्वणी ठरणार आहे. 

येत्या रविवारी म्हणजेच 8 जानेवारी 2023 रोजी बिग बॉस मराठीच्या चौथ्या पर्वाचा महाअंतिम सोहळा रंगणार आहे. आता या पर्वात कोण बाजी मारणार याकडे चाहत्यांचं लक्ष लागलं आहे. आपलाच स्पर्धक विजेता व्हावा यासाठी चाहते सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रयत्न करत आहेत. 

संबंधित बातम्या

Bigg Boss Marathi 4 : 'बिग बॉस मराठी'चं चौथं पर्व जिंकणाऱ्या स्पर्धकाला मिळणार लाखो रुपयांचं बक्षीस; समोर आली रक्कम

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

CM Eknath Shinde : महाराष्ट्राला उज्ज्वल भवितव्याकडे नेणारा उत्सव;सर्व मतदारांनी सहभागी व्हा - शिंदेSanjay Raut Vidhan Sabha Election : मिंधे गटाने पैसे वाटपासाठी खास माणसं ठेवली - संजय राऊतDevendra Fadnavis On Vidhan Sabha : यंदा महिला मतदार गॅप भरु काढतील; फडणवीसांचं महत्त्वाचं वक्तव्यSharad Pawar Vidhan Sabha Election 2024 : महाराष्ट्राचं भवितव्य नागरिकांच्या मतांमध्ये - शरद पवार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Maharashtra Assembly Election 2024 : मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
मतदानाच्या धामधुमीत कोऱ्याकरकरीत नोटांचं वाटप करणारी गाडी पकडली, चालक गाडी सोडून झाला फरार, नांदगावात पुन्हा खळबळ
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
कोल्हापुरात करवीर, सांगलीत जयंत पाटलांच्या इस्लामपुरात मतदानाचा जोर; कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात किती टक्के मतदान?
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के मतदान, कोणत्या जिल्ह्यात किती टक्के मतदान? सविस्तर माहिती एका क्लिकवर 
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
राज्यात दुपारी 1 वाजेपर्यंत 32.18 टक्के, गडचिरोलीनेच मारली बाजी, तुमच्या जिल्ह्यात किती मतदान?
Maharashtra Assembly Election 2024 : नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
नाशिकमध्ये आतापर्यंत झिरवाळांच्या दिंडोरीत सर्वाधिक मतदान, येवला, नांदगावात किती? पाहा 15 मतदारसंघांची टक्केवारी
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
बारामतीत कार्यकर्त्यांत जुंपली; आरोप फेटाळत अजित पवार म्हणाले, माझ्याही पोलिंग एजंटला बाहेर काढलं
Praniti Shinde : प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
प्रणिती शिंदे भाजपच्या बी टीम, भाजपसोबत हातमिळवणी केली, शिंदे कुटुंबाने केसाने गळा कापला; ठाकरे गटाचा सडकून प्रहार
Suhas Kande vs Sameer Bhujbal : आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
आधी म्हणाले, आज तुझा म#$ फिक्स, आता सुहास कांदे म्हणतात, 'मी समीरभाऊंचं नाव घेऊन धमकी दिली नव्हती'
Embed widget