चित्रपटाच्या सेटवर सीलिंग कोसळून मोठी दुर्घटना, अभिनेता अर्जून कपूर आणि जॅक भगनानी यांच्यासह 6 जण जखमी
Arjun Kapoor Jackky Bhagnani Injured : 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाच्या सेटवर छत कोसळल्याची दुर्घटना घडली आहे. अभिनेता अर्जून कपूर आणि जॅक भगनानी यांच्यासह 6 जण जखमी झाले आहेत.
Mere Husband Ki Biwi Set Accident : आगामी 'मेरे हसबंड की बीवी' या चित्रपटाच्या सेटवर छत कोसळल्याची दुर्घटना घडल्याची माहिती समोर येत आहे. 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाच्या सेटवर छत कोसळून मोठी दुर्घटना घडली आहे. अभिनेता अर्जून कपूर आणि जॅक भगनानी यांच्यासह 6 जण जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमध्ये अभिनेता अर्जुन कपूर, अभिनेता जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक मुदस्सर अजीज जखमी झाले आहेत. डीओपीचा अंगठाही फ्रॅक्चर झाल्याची माहिती आहे.
'मेरे हसबंड की बीवी'च्या शूटींगवेळी मोठी दुर्घटना
अभिनेता अर्जुन कपूरसोबत शूटिंग दरम्यान एक अपघात झाला आहे. अर्जुन कपूर 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाचे चित्रीकरण करत होता, त्यावेळी अचानक सेटवरील छत कोसळून अपघात झाला. या अपघातात अर्जुन कपूर व्यतिरिक्त दिग्दर्शक मुदस्सर अझीझसह 6 जण जखमी झाले. मुंबईतील इम्पीरियल पॅलेस, रॉयल पाम्स येथे एका गाण्याचे चित्रीकरण सुरू असतानाही दुर्घटना घडल्याची माहिती आहे.
अर्जून कपूर, जॅक भगनानीसह 6 जण जखमी
मोठ्या आवाजातील संगीतामुळे होणाऱ्या कंपनांमुळे ही घटना घडल्याची माहिती आहे. अर्जुन कपूरला कोपर आणि डोक्याला किरकोळ दुखापत झाली, तर जॅकी भगनानी आणि दिग्दर्शक मुदस्सर अझीझ यांनाही दुखापत झाली. सुदैवाने, कोणालाही गंभीर दुखापत झाली नाही. फोटोग्राफी दिग्दर्शकाचा अंगठा फ्रॅक्चर झाला आणि कॅमेरा सहाय्यकाला पाठीच्या कण्याला गंभीर दुखापत झाली. नृत्यदिग्दर्शक विजय गांगुली यांनी सांगितलं की, छताचा काही भागात कोसळला, त्यामुळे इतर क्रू सुरक्षित राहिले आणि मोठी आपत्ती टळली.
नेमकं काय घडली?
फेडरेशन ऑफ वेस्टर्न इंडिया सिने एम्प्लॉईजचे अशोक दुबे यांनी सांगितलं की, गाण्याच्या चित्रीकरणादरम्यान मोठ्या आवाजामुळे झालेल्या कंपनांमुळे हा अपघात घडला. अर्जुन कपूर आणि जॅकी भगनानी रॉयल पाम्समधील इम्पीरियल पॅलेसमध्ये 'मेरे हसबंड की बीवी' चित्रपटाचे चित्रीकरण करत होते. या चित्रपटाचा सेट येथे तयार करण्यात आला आहे. अर्जुन कपूर, जॅकी भगनानी आणि भूमी पेडणेकर सेटवर एका दृश्याचे चित्रीकरण करत असताना अचानक मोठा आवाज झाला आणि सेटच्या छताचा काही भाग कोसळला. या अपघातावेळी दिग्दर्शक मुदस्सर अझीझ देखील सेटवर होते. ई टाईम्सशी बातचीत करताना त्यांनी ही माहिती दिली आहे.
View this post on Instagram
महत्त्वाच्या इतर बातम्या :