एक्स्प्लोर

Munawar Faruqui : पाचवीत शिक्षण सोडलं, जेलवारी ते 'Bigg Boss 17'चा विजेता; कोण आहे गुजरातचा मुनव्वर फारुकी?

Bigg Boss 17 Winner Munawar Faruqui : स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायक असणारा मुनव्वर फारुकी 'बिग बॉस 17'चा विजेता ठरला आहे. गुजरातच्या मुनव्वरचा विजेतेपदापर्यंतचा प्रवास खूपच संघर्षमय राहिला आहे.

Munawar Faruqui : 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) या लोकप्रिय कार्यक्रमाचा नुकताच ग्रँड फिनाले पार पडला आहे. विनोदवीर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) 'बिग बॉस 17'चा विजेता ठरला आहे. मुनव्वर फारुकीच 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर नाव कोरणार याची प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी घोषणा केली होती. 

मुनव्वरने 'बिग बॉस 17' चांगलच गाजवलं आहे. कार्यक्रमाच्या पहिल्या दिवसापासून ते शेवटपर्यंत प्रेक्षकांमध्ये मुनव्वरची चांगलीच क्रेझ होती. विनोदवीराचा 28 जानेवारी 2024 रोजी वाढदिवस होता. वाढदिवशी मुनव्वरला चाहत्यांकडून चांगलीच भेट मिळाली आहे. 'बिग बॉस'आधी तो कंगनाच्या (Kangana Ranaut) 'लॉकअप'चा (Lockup) विजेता ठरला आहे. 

कोण आहे मुनव्वर फारुकी? (Munawar Faruqui)

मुनव्वर फारुकी हा स्टँडअप कॉमेडियन, रॅपर आणि गायक आहे. मुनव्वरचा जन्म गुजरातमधील जुनागढमध्ये एका मुस्लिम कुटुंबात झाला आहे. घरच्या आर्थिक अडचणींमुळे मुनव्वरने पाचवीनंतर शिक्षण सोडलं. शाळा सोडल्यानंतर त्याने समोसे, चकल्या वनवण्याचं आणि विकण्याचं काम केलं आहे. 

View this post on Instagram
 
A post shared by Munawar Faruqui (@munawar.faruqui)

मुनव्वरच्या आईने केलेली आत्महत्या

मुनव्वरची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. त्याची आई आणि आजी समोसे विकून उदरनिर्वाह करायचे. समोसे बनवताना त्यांचा हात अनेकदा भाजला आहे. पण तरीही ते काळासोबत जगायला शिकले. त्यांच्यावर 3,500 रुपयांचं कर्ज होतं. हे कर्ज फेडला न आल्याने मुनव्वरच्या आईने आत्महत्या केली होती. 2020 मध्ये त्याच्या वडिलांचे अर्धांगवायूमुळे निधन झाले.

अफेअर्स ते तुरुंगवास; मुनव्वर फारुकी कायमच चर्चेत

मुनव्वर फारुकी त्याच्या कामासह अफेअर्समुळे अनेकदा चर्चेत आला आहे. मुव्वरचं कमी वयात लग्न झालं होतं. त्याला एक मुलगाही आहे. पत्नीसोबत घटस्फोट घेतल्यानंतर सहा महिन्यांपूर्वीच मुनव्वरला त्याच्या मुलाची कस्टडी मिळाली. घटस्फोटानंतर मुन्नवरने आयेशा खान आणि नाजियाला डेट केलं आहे.

मुनव्वरने तुरुंगाची हवादेखील खाल्ली आहे. 2021 मध्ये त्याने गृहमंत्री अमित शाह यांची खिल्ली उडवली होती. त्यानंतर त्याला इंदोरमधून अटक करण्यात आली. जवळपास एक महिना तो तुरुंगात होता. विनोदवीराने अनेकदा हिंदू देवी देवतांवर आक्षेपार्ह टिप्पणी केली आहे. मुनव्वरचा मोठा चाहतावर्ग आहे. सोशल मीडियावरही तो चांगलाच अॅक्टिव्ह आहे.

संबंधित बातम्या

Munawar Faruqui : 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर कोरलं जाणार मुनव्वर फारुकीचं नाव? प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी केली विजेत्याची घोषणा

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Devendra Fadnavis vs Sanjay Raut : धर्मवीर सिनेमा पडद्यावर, वादाचा ट्रेलर; फडणवीस राऊत भिडलेMaharashtra Vidhan Sabha 2024 : विधानसभा निवडणुका पार्श्वभूमीवर महायुतीच्या निवडणूक आयोगाकडे मागण्याTOP 25 : टॉप 25 बातम्यांचा वेगवान आढावा : 06 PM 27 September 2024 : ABP MajhaBhandara Rain Crop Loss : पिकांचा चिखल, स्वप्नांचं पाणी; पंचनामे,मदत कधी? शेतकऱ्यांचा आर्त सवाल

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कोकणातून माघारी फिरताच पवारांना धक्का; आठ नगरसेवकांनी मांडली वेगळी चूल !
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
कुडाळमध्ये कट्टर वैरी आमने-सामने येणार, निलेश राणे वैभव नाईकांविरोधात निवडणूक लढवणार?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 27 सप्टेंबर 2024 | शुक्रवार
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
मनोज जरांगेंच्या मराठा आंदोलनाचा पवार पहिला राजकीय बळी ठरतील; प्रकाश आंबेडकरांचे विधान
Israel–Hezbollah conflict : युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
युद्धादरम्यान लेबनॉनमध्ये भारतीय सैनिक कशासाठी तैनात? नेमकं कारण आहे तरी काय??
Parliament Standing Committee : केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
केंद्र सरकारने स्थापन केलेल्या समित्यांमध्ये राहुल गांधींचा समावेश; सोनिया गांधींना स्थान नाही
China Nuclear Submarine : चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
चीनमधील ज्या वुहानमधून जगात कोरोना गेला, त्याच वुहानमध्ये पुन्हा धडकी भरली; अमेरिकेचा सुद्धा गंभीर आरोप!
Nitin Gadkari: मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
मुलाचं ऑपरेशन, बायकोने थांबवलं, पण नितीन गडकरी सगळं सोडून 'त्या' कार्यक्रमासाठी पोहोचलेच
Embed widget