Munawar Faruqui : 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर कोरलं जाणार मुनव्वर फारुकीचं नाव? प्रेक्षकांनी पहिल्याच दिवशी केली विजेत्याची घोषणा
विनोदवीर मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) 'बिग बॉस 17' (Bigg Boss 17) गाजवायला सज्ज आहे.
Munawar Faruqui : मुनव्वर फारुकी (Munawar Faruqui) हा लोकप्रिय स्टँडअप कॉमेडियन आहे. कंगना रनौतचा 'लॉकअप' हा कार्यक्रम त्याने जिंकला असून आता 'बिग बॉस 17'च्या (Bigg Boss 17) ट्रॉफीवर आपलं नाव कोरण्यासाठी तो सज्ज आहे.
वादाच्या भोवऱ्यात अडकलेला मुनव्वर फारुकी
मुनव्वर फारुकीचा सोशल मीडियावर मोठा चाहतावर्ग आहे. विनोदवीर मुनव्वर आज अनेक म्युझिक व्हिडीओसाठी गाणी गातो. हिंदू देवी-देवतांबद्दल आणि केंद्रीय गृह मंत्री अमित शाह यांच्याबद्दल अपमानकारक वत्तव्य केल्याप्रकरणी मुनव्वर पहिल्यांदा चर्चेत आला होता. त्यानंतर वेगवेगळ्या कारणांनी त्याचा शो वादाच्या भोवऱ्यात अडकले.
मुनव्वरच्या आईने केलेली आत्महत्या
मुनव्वरची आर्थिक परिस्थिती फारच बिकट होती. त्याची आई आणि आजी समोसे विकून उदरनिर्वाह करायचे. समोसे बनवताना त्यांचा हात अनेकदा भाजला आहे. पण तरीही ते काळासोबत जगायला शिकले. त्यांच्यावर 3,500 रुपयांचं कर्ज होतं. हे कर्ज फेडला न आल्याने मुनव्वरच्या आईने आत्महत्या केली होती.
आपल्या विनोदाने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन करणाऱ्या मुनव्वरला वैयक्तिक आयुष्यात मात्र अनेक अडचणींचा सामना करावा लागला आहे. शाळेत असताना भांड्यांच्या दुकानात तो काम करत असे. आज मुनव्वर आपल्या विनोदी शैलीत प्रेक्षकांना खळखळून हसवतो.
कोण आहे मुन्नवर फारुकी (Who is Munawar Faruqui)
मुन्नवर फारुकी हा लोकप्रिय विनोदवीर आणि रॅपर आहे. 2022 मध्ये कंगना रनौतच्या 'लॉकअप' या कार्यक्रमाने मुन्नवरला चांगलीच लोकप्रियता मिळाली. गुजरातमध्ये जन्मलेल्या मुन्नवरचे जातीय दंगलीत घर उद्धवस्त झाले. त्यानंतर त्याने मुंबई गाठली. वयाच्या 13 व्या वर्षी घराची जबाबदारी आल्याने त्याने भांड्याच्या दुकानात काम केलं. पुढे ग्राफिक डिझायनरचंही काम त्याने केलं.
View this post on Instagram
मुन्नवरला अनेकदा ट्रोलिंगचा सामना करावा लागतो. विनोदवीराने आता बिग बॉसच्या घरात एन्ट्री घेतली आहे. लॉकअपनंतर बिग बॉसच्या घरात धमाका करायला मुन्नवर सज्ज आहे. 'बिग बॉस 17'च्या मंचावर मुन्नवरने प्रेक्षकांचं चांगलच मनोरंजन केलं. विनोदवीराच्या शायरीने प्रेक्षकांची मने जिंकली असून मुन्नवर या पर्वाचा विजेता व्हावा अशी इच्छा त्यांनी पहिल्याच दिवशी व्यक्त केली आहे. त्यामुळे 'लॉकअप'नंतर 'बिग बॉस 17'च्या ट्रॉफीवर मुन्नवरचं नाव कोरलं जाणार का हे पाहणं औत्सुक्याचं ठरेल.
संबंधित बातम्या