Bigg Boss 16 : Abdu Rozik पाठोपाठ त्याच्या खास मित्राने 'बिग बॉस'च्या घराला केलं अलविदा; नेमकं काय घडलं?
Sajid Khan : अब्दू रोजिकनंतर 'बिग बॉस 16'मधून सादिज खान एक्झिट घेणार आहे.
Sajid Khan On Bigg Boss 16 : 'बिग बॉस 16' (Bigg Boss 16) हा छोट्या पडद्यावरचा वादग्रस्त पण तितकाच लोकप्रिय कार्यक्रम आहे. या कार्यक्रमाचे जगभर चाहते आहेत. पण 'बिग बॉस'च्या (Bigg Boss) चाहत्यांसाठी हा आठवडा मात्र धक्कादायक ठरला आहे. अब्दू रोजिकनंतर (Abdu Rozik) या पर्वाचा मास्टरमाइंड साजिद खान (Sajid Khan) 'बिग बॉस 16'मधून एक्झिट घेणार आहे.
अब्दूने 'बिग बॉस'च्या घराचा निरोप घेतल्याने त्याचे चाहते नाराज झाले होते. अशातच नुकत्याच समोर आलेल्या प्रोमोनुसार अब्दू पाठोपाठ त्याचा खास मित्र साजिद खानदेखील बिग बॉसच्या घराला (Bigg Boss House) अलविदा म्हणताना दिसणार आहे.
#BiggBoss16 : Tomorrow's Episode Promo #BiggBoss house se #SajidKhan Ney li exit ... pic.twitter.com/RwHLZrzZFp
— BiggBoss24x7 (@BiggBoss24x7) January 14, 2023
साजिद खानच्या जाण्याने घरातील सदस्य प्रचंड भावूक झाले आहेत. साजिदने बाहेर दिलेल्या कमिटमेंट पूर्ण करण्यासाठी बिग बॉसच्या घराचा निरोप घेतला आहे. या पर्वात साजिदची शिव आणि अब्दूसोबतची मैत्री विशेष गाजली होती.
View this post on Instagram
साजिद खानच्या जाण्याने सुम्बुलला अश्रू अनावर झालेले पाहायला मिळत आहेत. साजिदने सुम्बुलला गेले 100 दिवस आपल्या मुलीप्रमाणे सांभाळलं होतं. साजिदच्या घराबाहेर जाण्याने निम्रत, शिव, एमसी स्टॅन आणि अर्चना गौतम भावूक झालेले पाहायला मिळाले.
बॉलिवूड निर्माता-दिग्दर्शक साजिद खान सलमान खानच्या रिअॅलिटी शो 'बिग बॉस 16' द्वारे आपलं आयुष्य नव्याने सुरू करण्याचा प्रयत्न करत होता. चार वर्षांनंतर तो पुन्हा इंडस्ट्रीत येण्याचा विचार करत आहे.
संबंधित बातम्या