एक्स्प्लोर

Bigg Boss Season 16: फिनालेपूर्वीच Bigg Boss 16 ला अलविदा म्हणणार अब्दू रोजिक?

Bigg Boss Season 16: बिग बॉस फॅनक्लबनं दावा केलाय की, अब्दू रोजिक 12 जानेवारीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडणार आहे.

Bigg Boss Season 16: बिग बॉसच्या चाहत्यांसाठी एक वाईट बातमी. सगळ्यांचा लाडका अब्दु रोजिक (Abdu Rozik) बिग बॉसला (Bigg Boss 16) अलविदा म्हणणार आहे. सर्वच बिग बॉस फॅन्सना ही बातमी वाचून धक्का बसला आहे. अद्याप यासंदर्भात कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. बिग बॉस फॅनक्लब नावाच्या एका पेजवरील एका पोस्टमुळं अब्दू बिग बॉसमधून एग्जिट घेणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. 

बिग बॉसमधून अब्दूची एग्झिट?  

फॅनक्लबचा दावा आहे की, अब्दू रोजिक 12 जानेवारीला बिग बॉसच्या घरातून बाहेर पडेल. एका वर्क प्रोजेक्टसंदर्भात अब्दू बिग बॉसच्या घरातून एग्झिट घेणार असल्याचं बोललं जात आहे. खरं तर बिग बॉस 16 शो काही दिवसांनी एक्सटेंड करण्यात आला. आता बिग बॉस 16 चा फिनाले फेब्रुवारीमध्ये होणार आहे. मात्र, बिग बॉसच्या घरात येण्यापूर्वी अब्दूनं काही प्रोजेक्टसंदर्भात कमिटमेंट्स केले होते. शो पुढे वाढवण्यात आल्यामुळे आता अब्दुला ते प्रोजेक्ट्स पूर्ण करणं कठिण होत आहे. त्यामुळे आपल्या कमिटमेंट पाळण्यासाठी अब्दू शोमधून एग्झिट घेणार असल्याचं सांगितलं जात आहे. फॅनक्लबचा दाव्यानं अब्दूच्या फॅन्समध्ये नाराजीचा सूर दिसत आहे. मात्र अब्दुचे यश आणि स्टारडम पाहून त्याचे चाहते खूश आहेत.

'बिग बॉस 16 या शो'मधील सर्वांत आवडता स्पर्धक कोण असं जर विचारलं तर, अनेकांच्या तोंडी अब्दू रोजिक हेच नाव येतं. अब्दू रोजिक हा YouTuber आणि गायक आहे. अब्दूचे सोशल मीडियावर अनेक चाहते आहेत. सर्वांचा लाडका अब्दू मात्र बॉलिवूडचा दबंग खान सलमान खानचा चाहता आहे. बिग बॉसमुळं अब्दूला मोठी प्रसिद्धी मिळाली आहे. अनेकजण तर केवळ अब्दूलाच पाहण्यासाठी बिग बॉस पाहत असल्याचं सांगतात. अब्दूनं बिग बॉस शोमध्ये प्रवेश केला आणि परदेशी असूनही त्यानं आपल्या निरागसतेनं भारतातील लोकांची मनं जिंकली. तो सर्वाधिक पसंतीचा स्पर्धक आहे. 

बिग बॉससाठी किती मानधन घेतो अब्दू? 

अब्दु रोजिक हा तजाकिस्तानमधील प्रसिद्ध गायक. याशिवाय तो एक प्रसिद्ध सोशल मीडिया सेलिब्रिटी देखील आहे. केवळ 3 फुट उंची असलेल्या अब्दूचा दुबईत प्रचंड दबदबा आहे. अब्दु हे नाव जगभरात प्रसिद्ध आहे. 'बिग बॉस 16' सीझन सुरू झाल्यापासूनच त्यानं प्रेक्षकांची मनं जिंकली. पण तुम्हाला माहीत आहे का? अब्दू रोजिक बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी किती मानधन घेतो. अब्दू बिग बॉसच्या घरात राहण्यासाठी एका आठवड्याचे अडीच ते तीन लाख रूपये घेतो. 

महत्त्वाच्या इतर बातम्या :

चौथ्यांदा बोहल्यावर चढणार 'हा' प्रसिद्ध अभिनेता? लिपलॉक व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर तिसरी पत्नी संतापली

महत्त्वाच्या बातम्या

Kushal Badrike On Marathi Movie Show In Theaters: आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही, कुशल बद्रिके हळहळला
आज आमच्या आई-बापावर आलंय, आता आम्ही शांत बसू शकत नाही; कुशल बद्रिके हळहळला
Uma Hrishikesh Diagnosed With Endometriosis Shares Post: मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण, इंडस्ट्री सोडून थेट परदेशात झाली शिफ्ट
मासिक पाळीतल्या भयंकर वेदना, जडला गंभीर आजार अन् तातडीची शस्त्रक्रिया; मराठी अभिनेत्रीच्या आयु्ष्यात धक्कादायक वळण
Star Pravah Halad Rusli Kunku Hasla Serial: स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
स्टार प्रवाहवरची 'ही' मालिका वर्षभरातच गाशा गुंडाळणार, अभिनेत्री भावूक, सेटवरच्या शेवटच्या दिवसाचे फोटो शेअर करत म्हणाली...
Devoleena Bhattacharjee On Reservation Comment: 'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय
'मंत्र उच्चारण करा... आरक्षणाची गरज पडणार नाही...'; 'गोपी बहू'च्या वक्तव्यानंतर वाद, थेट जातीपर्यंत पोहोचला विषय

व्हिडीओ

Narendra Modi On Jantar Mantar : मला आणि माझ्या आईला शिवीगाळ, मोदींकडून नवीन व्हिडिओ पोस्ट
Shinde vs Thackeray Abhijeet Dipke : दिपकेंची क्रेझ वाढली शिवसेनेत जुंपली Special Report
Nashik Potholes Mahajan vs Bhujbal : खड्ड्यांवरुन खळबळ; महाजन भुजबळ भिडले Special Report
Chandrakant Patil : बोटांचे ठसे, चंद्रकांत पाटलांच्या वक्तव्यावरून हसे Special Report
Parinay Fuke On Uddhav Thackeray : अभिजीत दिपके कृष्णाचे अवतार, तर उद्धव ठाकरे कंसाचे अवतार

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bankipur, Datia Exit Poll : भाजप की जन सुराज, नितीन नवीन यांच्या बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
भाजप की जन सुराज,बांकीपूरमध्ये कोण जिंकणार? दतियामध्ये काय घडणार? एक्झिट पोलचा अंदाज समोर
Narendra Modi : हा सांस्कृतिक धक्का, मुली अशा प्रकारची भाषा कशी वापरू शकतात, मला मुलांना माफ करायचंय : नरेंद्र मोदी
जंतर मंतरवर जे झालं ते जगानं पाहिलं, भरकटलेल्या मुलांना मार्ग दाखवणं आपलं काम : नरेंद्र मोदी 
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
अंजनी नदीच्या पुरात अडकला तरुण, पाच तासांवर झाडावरची कसरत; बचावासाठी मोठा अडथळा, पथकाचे प्रयत्न
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
MPSC परीक्षेतील टॉपर श्रीनिवास लखमावाड कसा अडकला जाळ्यात? 45 लाखांची घेतली लाच, 40 लाख बनवट नोटा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 जुलै 2026 | शुक्रवार 
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
भिवंडी इमारत दुर्घटनेत 10 निष्पाप ठरले बळी; कुणी लेक गमावला, कुणाची जीव वाचला पण पाय गेले, डोळे पाणावणाऱ्या सत्यकथा
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
बीडमध्ये मोठा मासा गळाला; तब्बल 45 लाख रुपयांची लाच घेताना वन अधिकाऱ्याला बेड्या, प्रशासनात खळबळ
Nitin Gadkari on E20 Petrol: E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
E-20 पेट्रोलमुळे कोणत्या वाहनांचे नुकसान? केंद्र सरकारची पहिल्यांदाच कबुली; नितीन गडकरींची राज्यसभेत लेखी माहिती
Embed widget