(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Bhool Bhulaiyaa 2 : कार्तिक ते कियारा; मोंजोलिकाच्या 'भूल भुलैया 2' साठी कलाकारांनी घेतले 'एवढे' मानधन
चित्रपटामधील कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल.
Bhool Bhulaiyaa 2 : बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aaryan) त्याच्या अभिनयानं प्रेक्षकांची नेहमी पसंती मिळतो. त्याच्या 'भूल भुलैया 2' (Bhool Bhulaiyaa 2) या चित्रपटाची वाट त्याचे चाहते उत्सुकतेने पाहात आहेत. हा चित्रपट 20 मे 2022 रोजी प्रदर्शित होणार आहे. 2007 मध्ये रिलीज झालेल्या भूल भुलैया चित्रपटाचा हा दुसरा भाग आहे. चित्रपटामधील कलाकारांनी चित्रपटासाठी किती मानधन घेतलं असेल? असा प्रश्न अनेकांना पडला असेल. जाणून घेऊयात या चित्रपटासाठी कलाकारांनी घेतलेल्या मानधनाबाबत....
'भूल भुलैया 2' मध्ये कार्तिक आर्यन हा रूह बाबा ही भूमिका साकारणार आहे. ही भूमिका साकारण्यासाठी कार्तिकनं 15 कोटी मानधन घेतलं आहे. तसेच अभिनेत्री कियारा आडवाणी ही देखील या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. ती या चित्रपटामध्ये रीत ठाकुर ही भूमिका साकारणार आहे. कियारानं या चित्रपटासाठी दोन कोटी रूपये मानधन घेतलं आहे.
भूल भुलैया चित्रफटाच्या या सिक्वेलमध्ये अभिनेत्री तब्बू ही कनिका शर्मा ही भूमिका साकारणार आहे. तिने देखील या चित्रपटासाठी दोन कोटींचे मानधन घेतलं आहे.
आपल्या कॉमेडीनं नेहमीच प्रेक्षकांची मनं जिंकणाऱ्या अभिनेता राजपाल यादव यांनी भूल भुलैया चित्रपटामध्ये महत्वाची भूमिका साकारली होती. आता ते भूल भूलैया-2 मधून देखील प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहेत. या चित्रपटामध्ये काम करण्यासाठी राजपाल यांनी 1.25 कोटी मानधन घेतले.
भूल भुलैया चित्रपटाचे दिग्दर्शन प्रियदर्शन यांनी केले होते. आता 'भूल भुलैया 2' चे दिग्दर्शन अनीस बजमी हे करणार आहेत. भूल भुलैया चित्रपटाच्या पहिल्या भागामध्ये अक्षय कुमार, अमिशा पटेल, विद्या वालन आणि शाइनी आहूजा या कलाकारांनी प्रमुख भूमिका साकारली होती.
हेही वाचा :