एक्स्प्लोर
भोजपुरी अभिनेता पवन सिंगची अभिनेत्री अक्षरा सिंगला मारहाण
पवनने मद्यपान केल्यानंतर हॉटेल कर्मचाऱ्यांसमोरच अक्षराला मारहाण केली.

पाटणा : 'लॉलिपॉप लागेलू' फेम गायक, भोजपुरी चित्रपटांतील लोकप्रिय चेहरा पवन सिंहने अभिनेत्रीला मारहाण केल्याचा आरोप होत आहे. मद्यपान केल्यानंतर पवनने प्रसिद्ध अभिनेत्री अक्षरा सिंहला मारहाण केली. पत्रकार शशिकांत सिंह यांनी फेसबुक पोस्टवरुन हा दावा केला आहे. शूटिंगच्या निमित्ताने पवन आणि अक्षरा सिल्व्हासाला गेले होते. दोघं एका हॉटेलमध्ये थांबले होते. त्यावेळी पवनने हॉटेल कर्मचाऱ्यांसमोरच अक्षराला मारहाण केली. अक्षराचे केस पकडून पवनने तिला भिंतीवर आपटलं, असं या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे. गुरुवारी रात्री साडेअकरा वाजताच्या सुमारास हा प्रकार घडल्याची माहिती आहे. पवन आणि अक्षरा दोघांनीही मद्यपान केलं होतं. शूटिंग पूर्ण झाल्यामुळे अक्षराला मुंबईला परत यायचं होतं, मात्र तिने दुसऱ्या दिवशी जाण्याचा निर्णय घेतला. तर मद्याच्या अंमलाखाली पवनने हॉटेलबाहेर पडण्याचा प्रयत्न केला. अक्षराने त्याला थांबवलं, तेव्हा चिडलेल्या पवनने तिला मारहाण केली. हॉटेल स्टाफसमोरच तिला शिवीगाळही केली. पवनने केलेल्या मारहाणीत अक्षराच्या हाताला दुखापत झाली आहे. पवन सिंहने कुटुंबीयांच्या पसंतीनुसार नुकतंच लग्न केलं, मात्र अक्षरासोबत त्याचं अफेअर असल्याच्या चर्चा आहेत. इतकंच नाही, तर अनेक कार्यक्रमांमध्ये त्याने अक्षराची ओळख 'तुमची वहिनी' अशी करुन दिली आहे.
आणखी वाचा























