एक्स्प्लोर
बलात्कार प्रकरणी भोजपुरी अभिनेत्याला अटक, पत्नीलाही बेड्या
27 वर्षीय अभिनेत्री आणि गायिकेने मनोज पांडेवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे.
मुंबई : बलात्कार प्रकणात अटक असलेला भोजपुरी अभिनेता मनोज पांडे याच्या पत्नीलाही बेड्या ठोकण्यात आल्या आहेत. बलात्कार पीडितेला तक्रार मागे घेण्यासाठी धमकावल्याप्रकरणी मनोजच्या पत्नीला अटक करण्यात आली आहे. मुंबईतील चारकोप पोलिस स्थानकात मनोज पांडेविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
27 वर्षीय अभिनेत्री आणि गायिकेने मनोज पांडेवर बलात्कार केल्याचा आरोप केला आहे. लग्नाच्या आमिषाने 2012 ते 2017 या कालावधीत लैंगिक अत्याचार केल्याचा आणि दहा लाख 80 हजार रुपयांची रक्कम उकळल्याचा दावा तिने केला आहे.
त्यानुसार चारकोप पोलिस स्थानकात मनोज पांडेविरोधात कलम 376, 406, 317 आणि 506(2) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मनोजला दोन दिवसांपूर्वी कल्याणमधून अटक करण्यात आली होती. तर बलात्काराची केस मागे घेण्यासाठी पीडितेला धमकावल्याच्या आरोपातून अभिनेता मनोज पांडेच्या 20 वर्षीय पत्नीला अटक शनिवारी करण्यात आली.
मनोज पांडेसोबत लिव्ह इन रिलेशनशीपमध्ये असल्याचा दावा बलात्कार पीडितेने केला आहे. 2015 मध्ये दोन महिन्यांची गर्भवती असताना आपल्याला गर्भपात करण्यास भाग पाडल्याचंही तिने म्हटलं आहे. 2012 मध्ये एका पार्टीत आपली भेट झाली. त्यानंतर मनोजने आपल्याला चित्रपटात रोल देण्याचं आश्वासन दिल्याचं पीडितेने तक्रारीत म्हटलं आहे.
मुंबईतील कांदिवलीमध्ये एका भाड्याच्या घरात आम्ही दोघं राहायला लागलो. मीच घरभाडं देत होते, असंही तिने सांगितल्याचं पोलिसांनी नमूद केलं. मात्र काही दिवसांपूर्वी लग्नाच्या आमिषाने गेल्या पाच वर्षात मनोजने आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तिने चारकोप पोलिसात केला. पीडितेच्या तक्रारीनुसार मनोज पांडेला पोलिसांनी ठाण्यातून अटक केली. त्यावेळी तो एका चित्रपटाचं शूटिंग करत होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement