Bhediya Poster : हातात इंजेक्शन, चेहऱ्यावर हसू...कृतीच्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष; 'भेडिया' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट
Bhediya Poster : 'भेडिया' सिनेमातील कृती सेननचा लुक आऊट झाला आहे.
![Bhediya Poster : हातात इंजेक्शन, चेहऱ्यावर हसू...कृतीच्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष; 'भेडिया' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट Bhediya Poster Injection in hand smile on face the look of action caught the attention of netizens The new poster of the movie Bhedia is out Bhediya Poster : हातात इंजेक्शन, चेहऱ्यावर हसू...कृतीच्या लूकने नेटकऱ्यांचं वेधलं लक्ष; 'भेडिया' सिनेमाचं नवं पोस्टर आऊट](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2022/10/18/611ca98069cd118b84fb6903b7cabdcd1666076074635254_original.jpeg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Kriti Sanon First Look From Bhediya Movie : बॉलिवूड अभिनेता वरुण धवन (Varun Dhawan) आणि कृती सेननचा (Kriti Sanon) 'भेडिया' (Bhediya) हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. आता या सिनेमातील कृती सेननचा लुक समोर आला आहे.
'भेडिया' सिनेमात कृती सेननचा एक वेगळा अंदाज पाहायला मिळणार आहे. अमर कौशिकने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमात प्रेक्षकांना हॉरर-कॉमेडी पाहायला मिळणार आहे. सध्या 'भेडिया' सिनेमातील कृतीचा लुक नेटकऱ्यांचे लक्ष वेधून घेत आहे.
पोस्टरमधील कृतीचा लुक हटके आहे. छोट्या केसांमध्ये ती खूपच वेगळी दिसत आहे. हातात इंजेक्शन पकडलेल्या कृतीने गोड हास्याने चाहत्यांना वेड लावलं आहे. या सिनेमात कृती डॉ. अनिकाच्या भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमासाठी कृतीने खूप मेहनत घेतली आहे. सिनेमासाठी तिला खास फिजिकल ट्रान्सफॉर्मेशन करावं लागलं आहे.
View this post on Instagram
'भेडिया' 25 नोव्हेंबरला येणार प्रेक्षकांच्या भेटीला
दिनेश विज्ञान 'भेडिया' या सिनेमाची निर्मिती करत आहेत. हा सिनेमा 25 नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या सिनेमात चांगल्या दर्जाच्या वीएफक्सचा वापर करण्यात आल्याने सिनेमातील हॉरर अधिक आकर्षक होणार आहे.
नेटकऱ्यांकडून कृतीचं कौतुक
'भेडिया' सिनेमातील कृती सेननचा लुक सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. सोशल मीडियावर कृतीला नेटकऱ्यांचा सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. "छोट्या केसांमध्ये कृती खूपच गोड दिसत आहे, कृतीचा नवा अवतार पाहण्यासाठी उत्सुक आहोत", अशा कमेंट्स नेटकरी करत आहेत.
संबंधित बातम्या
कृती सेननच्या फोटोवर बिग बींची कमेंट, फोटो सोशल मीडियावर व्हायरल
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)