एक्स्प्लोर
'कोणी माती खाल्ली रे...' पार्श्वगायक भारत गणेशपुरेचं गाणं
मुंबई : चला हवा येऊ द्या सारखा तुफान लोकप्रियता मिळवणारा विनोदी कार्यक्रम असो किंवा 'पोस्टरबॉईज' सारखा चित्रपट, आपल्या अनोख्या अंदाजाने रसिकांना खदखदून हसवणारे भारत गणेशपुरे आता एका वेगळ्याच भूमिकेत दिसणार आहे.
भारत गणेशपुरे पार्श्वगायकाच्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तानाजी घाडगे दिग्दर्शित 'बरड' या आगामी सिनेमात भारतने एक गाणं आपल्या शैलीत गायलं आहे.
विशेष म्हणजे या गाण्याचे शब्दही फार मजेशीर आहेत. 'कोणी माती खाल्ली रे' असे या गाण्याचे बोल असून संगीतकार रोहन रोहन यानं हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.
भारतच्या विनोदावर फिदा असलेल्या चाहत्यांमध्ये त्याच्या नव्या गाण्याची उत्सुकता लागून राहिली आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement