Bollywood Movies : 'एक डॉक्टर की मौत' ते 'बवंडर'; सत्यघटनेवर आधारित 'हे' सिनेमे नक्की पाहा
Bollywood Movies : सत्य घटनेवर आधारित अनेक सिनेमे प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. यात 'एक डॉक्टर की मौत' ते 'बवंडर' अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे.
Best Bollywood Movies based on True Stories : सिनेमा (Movies) हा समाजाचा आरसा असतो, असे म्हटले जाते. रुपेरी पडड्यावर सामाजिक मुद्द्यांवर भाष्य करणारे अनेक सिनेमे प्रदर्शित झाले आहे. तर समाजासाठी मोलाचं योगदान देणाऱ्या व्यक्तींच्या आयुष्यावर आधारित सिनेमांची निर्मिती करण्यात आली आहे. तर अनेक बॉलिवूडपट हे सत्य घटनेवर आधारित आहेत. यात 'एक डॉक्टर की मौत' (Ek Doctor KI Maut) ते 'बवंडर' (Bawandar) अशा अनेक सिनेमांचा समावेश आहे. सत्य घटनेवर आधारित असलेले हे सिनेमे ओटीटीवर उपलब्ध आहेत. त्यामुळे घरबसल्या प्रेक्षक हे सिनेमे पाहू शकतात.
एक डॉक्टर की मौत (Ek Doctor Ki Maut)
कुठे पाहता येईल? युट्यूब किंवा प्राईम व्हिडीओ
'एक डॉक्टर की मौत' हा तपन सिन्हाचा सिनेमा आहे. या सिनेमात बहिष्कार, अपमान या गोष्टींवर भाष्य करण्यात आलं आहे. रामपद चौधरीच्या 'अभिमन्यु'वर आधारित हा सिनेमा आहे. डॉक्टर सुभाष मुखोपाध्यायची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. या सिनेमता पंकज कपूर, शबाना आझमी, अनिल चटर्जी, इरफान खान, दीप साही हे कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. या सिनेमाला तीन राष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत.
बवंडर (Bawandar)
कुठे पाहता येईल? युट्यूब
'बवंडर' हा सिनेमा 2000 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. राजस्थानच्या रेप विक्टिम भंवरी देवीची गोष्ट या सिनेमात दाखवण्यात आली आहे. न्याय मिळवण्यासाठी भंवरी देवीला किती संघर्ष करावा लागला हे प्रेक्षकांना या सिनेमात पाहायला मिळेल. या सिनेमात नंदिता दास, रघुबीर यादव, दिप्ती नवल, राहुल खन्नासह अनेक कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत.
नॉट अ लव्ह स्टोरी (Not a Love Story)
कुठे पाहता येईल? युट्यूब
'नॉट अ लव्ह स्टोरी' हा सिनेमा 2011 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. का थरार नाट्य असणारा सिनेमा आहे. 2008 मध्ये झालेल्या नीरज ग्रोवर हत्येवर प्रेरित हा सिनेमा आहे. माही गिल, दीपक डोबरियाल आणि अजय गेही या सिनेमात मुख्य भूमिकेत आहेत.
रहस्य (Rahasya)
कुठे पाहता येईल? झी 5
'रहस्य' हा सिनेमा 2015 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. मनीष गुप्ता यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात के मेनन, टिस्का चोपड़ा, आशीष विद्यार्थी, अश्विनी केळकर आणि मीता वशिष्ठ मुख्य भूमिकेत आहेत.
फिराक (Firaaq)
कुठे पाहता येईल? प्राईम व्हिडीओ, यूट्यूब
'फिराक' हा सिनेमा 2008 मध्ये प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. नंदिता दासने या सिनेमाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. या सिनेमात नसीरुद्दीन शाह, दीप्ति नवल, नवाजुद्दीन सिद्दीकी, इनामुलहक, नासर, परेश रावल, संजय सूरी, रघुबीर यादव, शहाना गोस्वामी, अमृता सुभाष आणि टिस्का चोप्रा मुख्य भूमिकेत आहेत.
संबंधित बातम्या