एक्स्प्लोर
'बावरा मन..' अक्षयच्या 'जॉली एलएलबी 2' मधलं रोमँटिक गाणं

मुंबई : बॉलिवूडचा खिलाडी अक्षयकुमारच्या बहुप्रतीक्षित 'जॉली एलएलबी 2' या चित्रपटातील नवं गाणं रिलीज झाला आहे. 'बावरा मन' या गाण्याचा व्हिडिओ अक्षयनेच ट्विटरवर शेअर केला आहे. या गाण्यात हुमा आणि अक्षय यांचा रोमँटिक अंदाज पाहायला मिळत आहे.
जुबिन नौतियाल आणि नीती मोहन यांनी हे गाणं गायलं आहे. #BawaraMann हा हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेण्ड होत आहे.
चित्रपटात अक्षय जॉली या वकिलाच्या भूमिकेत आहे. कॉमेडी, अॅक्शन आणि इमोशन यांचा संगम 'जॉली एलएलबी 2'मध्ये पाहायला मिळेल. अक्षयसोबत हुमा कुरेशी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसणार आहे.
'सलमान खानचं लग्न कधी होईल हे सांगू शकतोस का?' यासारख्या हशा पिकवणाऱ्या डायलॉग्सपासून 'जर प्रेमात आणि युद्धात सारं माफ असेल, तर सीमेवर जवानांचे होणारे शिरच्छेदही कायदेशीर आहेत आणि प्रेमात तरुणींवर होणारे अॅसिडहल्लेही कायदेशीर आहेत' असे टाळ्या मिळवणारे डायलॉग्जही सिनेमात आहेत.
'जॉली त्याची सर्वात मोठी केस लढण्यासाठी आला आहे' अशा कॅप्शनसह अक्षयने सिनेमाचा ट्रेलर आणि पोस्टर डिसेंबरच्या अखेरीस ट्वीट केलं होतं. ‘जॉली एलएलबी’ या 2013 मधील चित्रपटाचा हा सिक्वेल असून सुभाष कपूर यांनी चित्रपटाचं लेखन-दिग्दर्शन केलं आहे. 10 फेब्रुवारीला हा चित्रपट रिलीज होणार आहे.
पाहा गाणं :
आणखी वाचा
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
व्यापार-उद्योग
महाराष्ट्र
Advertisement
Advertisement
























