Barbie Box Office Collection : 'I am Barbie Girl' म्हणणाऱ्या 'बार्बी'ची जगभरातील सिने-रसिकांना भुरळ; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन
Barbie : 'बार्बी' हा हॉलिवूड सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे.
![Barbie Box Office Collection : 'I am Barbie Girl' म्हणणाऱ्या 'बार्बी'ची जगभरातील सिने-रसिकांना भुरळ; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन Barbie movie Box Office Collection entertainment hollywood Greta gerwig Barbie Box Office Collection : 'I am Barbie Girl' म्हणणाऱ्या 'बार्बी'ची जगभरातील सिने-रसिकांना भुरळ; जाणून घ्या बॉक्स ऑफिस कलेक्शन](https://feeds.abplive.com/onecms/images/uploaded-images/2023/07/24/b151025b9cdb53aed58bea1438cf55e31690194861624254_original.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
Barbie Box Office Collection : 'बार्बी' (Barbie) हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घालत आहे. 21 जुलै 2023 रोजी जगभरात प्रदर्शित झालेल्या या सिनेमाची भारतातही चांगलीच क्रेझ आहे. दिवसेंदिवस हा सिनेमा रेकॉर्डब्रेक कमाई करत आहे. जगभरातील लहान मुलींसह तरुण मुलीदेखील मोठ्या प्रमाणात हा सिनेमा पाहायला सिनेमागृहात जात आहेत.
'बार्बी' हा सिनेमा भारतात फक्त इंग्लिश भाषेमध्ये प्रदर्शित झाला आहे. हॉलिवूडचा लोकप्रिय दिग्दर्शक ग्रेटा गर्विगने (Greta gerwig) या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. पाच कोटींच्या बजेटमध्ये या सिनेमाची निर्मिती करण्यात आली आहे. 'बार्बी' हा कलरफुल सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला आहे.
'बार्बी'चं बॉक्स ऑफिस कलेक्शन जाणून घ्या... (Barbie Box Office Collection)
सॅकनिल्क एंटरटेनमेंटच्या रिपोर्टनुसार, 'बार्बी' या सिनेमाने भारतात रिलीजच्या पहिल्या दिवशी पाच कोटींची कमाई केली आहे. दुसऱ्या दिवशी 6.5 आणि तिसऱ्या दिवशी 7.15 कोटींची कमाई केली आहे. एकंदरीतच रिलीजच्या तीन दिवसांत या सिनेमाने 18.65 कोटींचा गल्ला जमवला आहे.
View this post on Instagram
जगभरात 'बार्बी'चा बोलबाला!
'बार्बी' या सिनेमात मार्गोट रॉबी आणि रयान गोस्लिंग मुख्य भूमिकेत आहे. जगभरात या सिनेमाने 2760 कोटींची कमाई केली आहे. मार्गोट रॉबी आणि रयान गोस्लिंगसह या सिनेमात सिमू लियू, केट मैकिनॉन, इस्सा राय, रिया पर्लमॅन आणि विल फेरेल हे हॉलिवूड कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 'बार्बी' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षक या सिनेमाची प्रतीक्षा करत आहेत.
लहान मुलांना आवडणाऱ्या बार्बी गर्लवर आजवर 43 पेक्षा अधिक सिनेमे आणि वेबसीरिज प्रेक्षकांच्या भेटीला आले आहेत. 'बार्बी' हा सिनेमा बार्बी आणि केनच्या अवतीभोवती फिरणारा आहे. गूगलने 'बार्बी' सिनेमासंदर्भात एक नवं फीचर लॉन्च केलं आहे. गुलाबी टच देण्याचा त्यांनी प्रयत्न केला आहे. गुबाबी रंगाचे स्पार्कल्स प्रेक्षकांना आकर्षित करत आहेत. जगभरातील मुली गुलाबी रंगाचे कपडे परिधान करुन हा सिनेमा पाहायला जात असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. भारतात सध्या 'ओपनहाइमर' या सिनेमाची चर्चा आहे. तर जगभरात 'बार्बी'चा बोलबाला पाहायला मिळत आहे. या सिनेमाचा दुसरा भाग यावा, अशी इच्छा व्यक्त केली जात आहे.
संबंधित बातम्या
Mitali Mayekar: 'बार्बीसोबत लगीन करायचंय...'; मितालीच्या व्हिडीओवर सिद्धार्थनं केलेल्या कमेंटनं वेधलं लक्ष
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)