Baloch : मराठ्यांची विजयगाथा सांगणारा 'बलोच'! प्रवीण तरडे झळकणार मुख्य भूमिकेत
Baloch : 'बलोच' हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
Baloch : सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा सांगणाऱ्या 'बलोच' चित्रपटाविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. पानिपतच्या पराभवानंतर बलुचिस्तानातील गुलामगिरीत होरपळलेले मराठे तसेच तिथले भयाण वास्तव आता लवकरच पडद्यावर दिसणार आहे. प्रकाश पवार दिग्दर्शित 'बलोच' (Baloch) या चित्रपटाचे नवीन पोस्टर आता प्रेक्षकांच्या भेटीला आले आहे.
'बलोच' हा चित्रपट येत्या 5 मे रोजी सिनेमागृहात प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात प्रवीण विठ्ठल तरडे (Pravin Tarde) मुख्य भूमिकेत आहेत. पोस्टरमधील प्रवीण तरडे यांचे रौद्र रूप विशेष लक्षवेधी ठरत आहे. त्यांच्या नजरेतून क्रोध व्यक्त होत आहे. 'बलोच'च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे.
View this post on Instagram
'बलोच'मध्ये काय पाहायला मिळणार?
आजवर देशांसाठी लढलेल्या अनेक वीर मराठ्यांची कहाणी, लढाई रुपेरी पडद्यावर दाखवण्यात आली आहे. अशीच इतिहासातील लक्षात राहणारी लढाई म्हणजे पानिपतची. पानिपतच्या पराभवानंतर मराठ्यांना बलुचिस्तानात गुलामगिरी पत्करावी लागली होती. मराठ्यांनी लढलेल्या या अपरिचित लढ्याची शौर्यगाथा 'प्रेक्षकांना 'बलोच'मध्ये पाहायला मिळणार आहे.
'बलोच' या सिनेमाची कथा, पटकथा प्रकाश पवार यांची आहे. हा सिनेमा 2023 मध्ये दसऱ्याच्या शुभमुर्हूर्तावर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. 'बलोच'च्या निमित्ताने पुन्हा एकदा इतिहासातील आठवणींना उजाळा मिळणार आहे. सीमेपार लढलेल्या मराठ्यांची विजयगाथा डोळ्यांसमोर उभी करणारा धगधगता सिनेमा म्हणजे 'बलोच'.
‘बलोच’च्या माध्यमातून पुन्हा एकदा ऐतिहासिक आठवणींना उजाळा मिळणार आहे. चित्रपटाची कथा, पटकथा प्रकाश जनार्दन पवार यांचीच असून महेश करवंदे (निकम), जीवन जाधव, गणेश शिंदे, जितेश मोरे, नेमाराम चौधरी, संतोष बळी भोंगळे निर्माते आहेत तर पल्लवी विठ्ठल बंडगर, दत्ता काळे, सुधीर वाघोले, विजय अल्दार, सहनिर्माते आहेत.
प्रवीण तरडे यांचा 'दे धक्का 2' आणि 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे' या सिनेमांनी गेल्या वर्षात चांगलाच धुमाकूळ घातला. दोन्ही सिनेमे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरले होते. त्यामुळे आता चाहत्यांना त्यांच्या नव्या सिनेमाची उत्सुकता लागली आहे.
View this post on Instagram
संबंधित बातम्या