Neha Marda Hospitalized : 'बालिका वधू' फेम अभिनेत्री नेहा मर्दा रुग्णालयात दाखल; बाळंतपणादरम्यान प्रकृती खालावली
Neha Marda : अभिनेत्री नेहा मर्दा गेल्या काही दिवसांपासून प्रेग्नेंसीमुळे चर्चेत असून आता तिला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
Neha Marda Hospitalized : 'बालिका वधू' (Balika Vadhu) फेम अभिनेत्री नेहा मर्दाला (Neha Marda) रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्रेग्नेंसीमध्ये अडचण आल्याने अभिनेत्रीला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अद्याप नेहा मर्दा किंवा तिच्या कुटुंबियांनी यासंदर्भात माहिती दिलेली नाही. पण पुढचे दोन दिवस तिला डॉक्टरांच्या नजरेखील राहावे लागणार आहे.
बाळंतपणादरम्यान प्रकृती खालावलीने नेहा रुग्णालयात दाखल
नेहा आणि आयुष्मान अग्रवाल 2012 साली लग्नबंधनात अडकले होते. लग्नाच्या 10 वर्षानंतर नेहाने चाहत्यांना आई होणार असल्याची गोड बातमी दिली होती. त्यावेळी नेहा म्हणाली होती की,"मी आई होणार असल्याचं मला कळल्यानंतर खूप आनंद झाला होता. आई होण्याची माझी खूप इच्छा होती. आता लग्नाच्या 10 वर्षांनंतर आम्ही आई-बाबा होणार असल्याने आम्ही खूप आनंदी आहोत. गेल्या 10 वर्षांपासून आम्ही बाळासाठी प्रयत्न करत होतो. अनेकांनी मला बाळ होत नसल्याने टोमने मारले आहेत. पण आता मी प्रेग्नंट असल्याचा जास्त आनंद आहे".
View this post on Instagram
मीडिया रिपोर्टनुसार, प्रेग्नेंसीमध्ये अडचण आल्याने नेहाला रुग्णालयात दाखल करण्यात आले आहेत. सध्या तिच्यावर उपचार सुरू असून पुढील दोन दिवस तिला डॉक्टरांच्या नजरेखाली राहावे लागणार आहे. गेल्या काही दिवसांपूर्वी नेहा म्हणाली होती, मी आणि माझे कुटुंबीय बाळाच्या स्वागतासाठी सज्ज आहोत. सध्या सध्या प्रेग्नेंसीच्या शेवटच्या टप्प्यात आहे.
नेहाने 2005 साली मनोरंजनसृष्टीत पाऊल ठेवलं आहे. नेहा देवों के देव महादेव, डोली अरमानों की, पिया अलबेला, लाल इश्क अशा छोट्या पडद्यावरील अनेक मालिकांचा नेहा भाग आहे. पण 'बालिका वधू' या मालिकेमुळे नेहाला जास्त लोकप्रियता मिळाली आहे. नेहा सोशल मीडियावर चांगलीच अॅक्टिव्ह असते. प्रेग्नेंसीसंबंधित फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असते. अनेकदा ती बेबी बंप फ्लॉन्ट करताना दिसत असते.
‘बालिका वधू’ या मालिकेमुळे नेहा प्रकाशझोतात आली. आपल्या दमदार अभिनयाने तिने चाहत्यांची मनं जिंकली होती. नेहाने लाल रंगाच्या ड्रेसमध्ये हे मॅटर्निटी फोटोशूट करत पतीसोबतचा फोटो शेअर केला होता. फोटो शेअर करत तिने लिहिलं होतं,"श्री शिवाय नमस्तुभ्यम... 2023 मध्ये चिमुकल्या पाहुण्याचं आगमन होणार आहे."
संबंधित बातम्या