एक्स्प्लोर

Bajind Song: 'इंद्रधनू नभामध्ये उधळतो रंग...'; 'बाजिंद' चित्रपटातील गाणं आलं प्रेक्षकांच्या भेटीला, हंसराज आणि पूजाचा रोमँटिक अंदाज

Bajind Song: 'बाजिंद' या चित्रपटामधील रोमँटिक गाणं प्रेक्षकांच्या भेटीस आलं आहे. या गाण्यातील हंसराज आणि पूजा यांची केमिस्ट्रीनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

Bajind Song:  'बाजिंद' (Bajind) या चित्रपटातील रोमँटिक शीर्षक गीत प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या गाण्याला संगीतप्रेमींची पसंती मिळत आहे. 8 डिसेंबर  रोजी 'बाजिंद' संपूर्ण महाराष्ट्रात रिलीज होणार आहे.

शान फिल्म्स क्रिएशनची प्रस्तुती असलेल्या 'बाजिंद' चित्रपटाची निर्मिती नंदकुमार शिंदे-सरकार आणि शहाजी पाटील यांनी केली आहे. निर्माते शिंदे-सरकार यांच्या लेखणीतून या चित्रपटाची कथा अवतरली असून, पटकथा, संवाद आणि गीतलेखनासोबतच शहाजी पाटील यांनी दिग्दर्शनाची जबाबदारीही सांभाळली आहे. राष्ट्रीय पारितोषिक विजेता अभिनेता हंसराज जगताप या चित्रपटात मुख्य भूमिकेत आहे. त्याच्या जोडीला पूजा बिरारी ही अभिनेत्री आहे. हंसराज आणि पूजा या नव्या कोऱ्या जोडीची आॅनस्क्रीन केमिस्ट्री रसिकांचं लक्ष वेधून घेणारी आहे. 'हातामध्ये हात तुझा, शहारलं अंग, इंद्रधनू नभामध्ये उधळतो रंग...' अशी सुरेख शब्दरचना असलेलं या शीर्षक गीतात गावातील प्रेमी युगूलाच्या प्रेमाचे गुलाबी रंग पाहायला मिळतात. गावाकडच्या साध्याभोळ्या प्रेमाची झलक हेच या गाण्याचं सर्वात मोठं वैशिष्ट्य आहे.

नंदकुमार शिंदे-सरकार यांनी हे गाणं लिहिलं असून, प्राजक्ता शुक्रे यांच्या आवाजात संगीतकार अॅग्नल रोमन यांनी संगीतबद्ध केलं आहे. सॉंग पाहण्यासाठी शान फिल्म क्रिएशनच्या यूट्यूब पेजला सबस्क्राईब, लाईक, शेअर करा. अल्लड वयातील प्रेमाचा सारीपाट मांडणाऱ्या कथानकाला साजेसं असं टायटल साँग रसिकांच्या पसंतीस पडत आहे. या गाण्याबाबत दिग्दर्शक शहाजी पाटील म्हणाले की, कथानकाच्या गरजेनुसार 'बाजिंद' हे टायटल साँग चित्रपटात घेण्यात आलं आहे. गाणं अगदी साध्या पद्धतीनेच चित्रीत करायचं होतं. त्यानुसार ते बनवण्यात आलं असल्याने संगीतप्रेमींना आवडत आहे. हंसराज आणि पूजा यांची सुरेख केमिस्ट्री हे या गाण्याचं आणखी एक वैशिष्ट्य आहे. प्रेमाचे विविध रंग उधळणारं हे गाणं अबालवृद्धांना भावणारं असल्याचंही पाटील म्हणाले.

पाहा गाणं

 'बाजिंद' चित्रपटात हंसराज आणि पूजा यांच्या जोडीला शर्वणी पिल्लई, सिद्धेश्वर झाडबुके, अनिल नगरकर, माधुरी पवार, उषा नाईक, प्रेमा किरण, ओंकार भोसले, प्रियंका राठोड आदी कलाकारांच्याही या चित्रपटात भूमिका आहेत. डिओपी इम्तियाज बारगीर यांनी सिनेमॅटोग्राफी केली असून, संकलन निखिल गांधी यांनी केलं आहे. संगीतकार अॅग्नल रोमन यांनी पार्श्वसंगीत देण्यासोबतच निर्मिती व्यवस्थापकाची जबाबदारी सांभाळली असून, आलोक गायकवाड आणि चंद्रकांत निकम प्रमुख सहाय्यक दिग्दर्शक आहेत.  

इतर महत्वाच्या बातम्या:

Web Series On OTT: किसिंग सीन, इंटिमेट सीन्स आणि खतरनाक डायलॉग्स, बोल्डनेसच्या बाबतीत हिंदी वेब सीरिजला देखील मागे टाकतात 'या' मराठी वेब सीरिज

 

महत्त्वाच्या बातम्या

Salman Khans SVC63: राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
राखी सावंतच्या 'परदेसिया' गाण्यातील 'या' तरुणाला ओळखलं? सलमान खानच्या अपकमिंग सिनेमात झळकणार
Rajkummar Raos Prahaar: कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
कोर्टरूममध्ये कसाबविरोधात निकमांची दमदार लढाई; 'प्रहार' सिनेमाच्या तारखेत बदल, कधी होणार रिलीज?
Sushant Singh Rajput: 'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
'मृत्यूनंतर 'तो' मला भेटायला आला अन् तासन्तास बसून माझ्यासोबत...'; मृत्यूच्या 6 वर्षांनंतर सुशांत सिंह राजपूतच्या बहिणीचा मोठा खुलासा
MHJ Fame Onkar Bhojane in Manjar: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?
'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेता नव्या सिनेमात झळकणार, ‘मांजर’च्या पोस्टरनं कुतूहल वाढवलं, कधी होणार रिलीज?

व्हिडीओ

Shiv Sena SC Hearing Special Report : निवडणूक आयोगावर गंभीर आरोप..शिवसेनेच्या सुनावणीत काय घडलं?
Majha Vishesh:व्हेज-नॉनव्हेजचा ते शुद्धीकरणावरुन काँग्रेस विरुद्ध भाजप,माझा विशेषमध्ये आज काय विशेष?
Buldhana Khamgaon Ajji on FDA : तुकाराम मुंढेंना विनंती करणाऱ्या खामगावातील व्हायरल आजी 'माझा'वर
Sanjay Raut on Amit Shah: अमित शाहांना तातडीने उपपंतप्रधान व्हायचंय, पण मोदींनी नकार दिलाय
Manoj Jarange Patil: आआथातू अरअरअर...अ‍ॅक्शन केली, डायलॉग बोलले; जरांगेंनी बावनकुळेंची बाहुबलीमधील कालकेयशी केली तुलना

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Share Market: निफ्टी 50 सलग तिसऱ्या सत्रात घसरला; सेन्सेक्स 0.15 टक्के वाढीसह बंद
Solapur Crime News : झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
झोपेतून उठवल्याचा राग, बिहारी साथिदाराला हातोड्याने वार करुन संपवलं, करमाळ्यातील धक्कादायक घटना
BAN vs AUS : बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका,  पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला 
बांगलादेशचा बलाढ्य ऑस्ट्रेलियाला दणका, पहिल्या डावात 200 धावांच्या आत गुंडाळलं, कसोटीचा पहिला दिवस गाजवला
Bar Council : बार काऊन्सिलनं निर्णय फिरवला, सरन्यायाधीशांना विरोध करणाऱ्या हैदराबाद येथील कायदा पदवीधर विद्यार्थ्यांच्या नोंदणीवरील स्थगिती मागे
बार काऊन्सिलनं निर्णय बदलला, सरन्यायाधीशांना विरोध विद्यार्थ्यांना दिलासा, कायदा पदवीधरांच्या वकील म्हणून नोंदणीचा मार्ग मोकळा 
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 13 ऑगस्ट 2026 | गुरुवार
Shiv Sena Symbol Case : चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
चंद्रचूड यांच्या घटनापीठाने दिलेल्या शिवसेनेच्या निकालाचा फेरविचार व्हावा, ठाकरेंच्या वकिलांची मोठी मागणी
Sukhbir Badal News:मोठी बातमी, पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
सुखबीर सिंह बादल यांच्यावर नांदेडमध्ये हल्ला, आरोपीला अटक; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौकशीचे आदेश 
IND Vs SL Galle Test: त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
त्रिमूर्ती रिंगणात उतरवत श्रीलंकेला फिरकीच्या जाळ्यात अडकवण्याची तयारी; गोलंदाज प्रशिक्षकांकडून स्पष्ट संकेत
Embed widget